Latest Post

राहुरी प्रतिनिधी-प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं ॥ ११५६/ २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे.

     नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे, सफौ/चंद्रकांत ब-हाटे, पोहेकॉ/दिनकर चव्हाण, पोहेकॉ / सोमनाथ जायभाय, पोना/ अमित राठोड, पोकों / अदिनाथ पाखरे, पोकों/सचिन ताजणे, पोकों / संतोष राठोड, पोकों/गणेश लिपणे, पोकॉ/नदिम शेख .पोकॉ/ अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते.सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १) अभिषेक बाबासाहेब हुडे २) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अ.नगर श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.


श्रीरामपूर : शहरा नजीक असलेल्या, जिल्हा परिषद शाळेतील एका लिंग पिसाट शिक्षकाने, शाळेतील अल्पवयीन मुलीच्या मोबाईल वर अश्लील मेसेज पाठविल्याचे,मुलीच्या  पालकांच्या लक्षात आल्याने. संताप झालेल्या पालकांनी, जिल्हा परिषद वस्ती शाळेतील लिंग पिसाट शिक्षकाला एकदा नाहीतर सलग २ दिवस चांगलाच चोप दिल्याने. गावात चर्चेला उधाण आले असून. शिक्षकी पेशास काळिमा फासणा-या, शिक्षका विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली जात असून. या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारचा तक्रार दाखल झाली नसून. या लिंग पिसाट शिक्षकला चोप दिल्याने, इतर चांगल्या शिक्षकांकडे देखील. पाहण्याचा दृष्टिकोन बदल असल्याने, अशा सडक्या कांद्यांमुळे पवित्र समजल्या जाणारा शिक्षकी पेशा बदनाम होत असून. अशा नितीहीन आणि लिंग पिसाटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, महिला वर्गातून केली जात आहे.

श्रीरामपूर : लग्नाचा बनावा करून, एका विशिष्ट समाजाच्या मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या, युवराज शिंदे या जिम मालका विरोधात, पीडित मुलीच्या तक्रारीवरून १० डिसेंबर रोजी भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०,३२३, ५०४, ५०६ अन्वये, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार होता. सदर आरोपीस अटक करून, कठोर कारवाईच्या मागणी करिता. विविध संघटनांनी मोर्चा देखील काढला होता. या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे,पोलीस नाईक गौतम लगड,राहुल नरवडे, रमीज अत्तार, गणेश गावडे,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक प्रमोद जाधव फुरकान शेख आदींच्या पथकाने, पुणे जिल्ह्यातील खडक वासला येथुन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी युवराज शिंदे यास, सायंकाळी जेरबंद करून. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजार केले असून. मुलीवरील अत्याचार प्रकरणी १० डिसेंबर रोजी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): पालकांनी आपल्या पाल्याला बालपणापासून सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रतीक्षित टेकावडे, बाळासाहेब ओझा, विधीज्ञ बाळासाहेब औताडे, शाळेचे प्राचार्य डॉ योगेश  पुंड तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्युनिअर के जी व सिनियर के जी वर्गातील विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वडीतके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अस्मिता परदेशी, यास्मिन पटेल, वैष्णवी इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेस यांच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स युवा श्री या किताबाचा मानकरी आदम बागवान, बेस्ट पोझरचा मानकरी सद्दाम शेख तर बेस्ट इम्प्रूमेंटचा मानकरी सेजम मणियार हे ठरले.तर अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच वुमेन फिजिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुप्रिया इल्हे हिने वुमेन फिजिकचा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून १४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री मयूर दरंदले, श्री कैलास रणसिंग, श्री सतीश रासकरसोहेल शेख प्रतीक पाटील आदीनी काम बघितले. तर स्पर्धेचं स्टेज मार्शल म्हणून राहुल पैलवान, किरण पोटे, चेतन होंडे, अमोल एखंडे, भीमा जाधव, शुभम बोर्डे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व स्पर्धा आयोजक सागर दुपाटी यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

५५  किलो गट ललित घुले - प्रथम,

सिद्धेश गडगे - द्वितीय,

विजय घोरपडे - तृतीय

अशांत जाधव - चतुर्थ 

श्रीकांत जाधव - पाचवा


६० किलो गट


सद्दाम शेख- प्रथम

धीरज सोनावणे-द्वितीय

निलेश म्हस्के- तृतीय

राजू साबळे- चतुर्थ

शाहबाज पठाण- पाचवा


६५ किलो गट

नागेश शेवाळे - प्रथम

अजय बोर्डे- द्वितीय

तॊसिफ पठाण -तृतीत

संजय भोसले -चतुर्थ

तेजस वैध्य -पाचवा


७० किलो गट


संतोष जरे- प्रथम

ओंकार पंदीकर - द्वितीय

अस्लम सय्यद- तृतीय

प्रकाश दुधमल- चतुर्थ 

रोहित आव्हाड - पाचवा


७५ किलो गट


सैजल मणियार- प्रथम

वैभव सुरशे- द्वितीय

फिरोज पठाण -तृतीय

विवेक गुप्ता- चतुर्थ

किरण सरोदे -पाचवा


८० किलो गट 

आदम बागवान- प्रथम

इम्रान शेख- द्वितीय

सुलतान शेख -तृतीय

मनोज जाधव- चतुर्थ

पवन ललवानी -पाचवा


मेन्स फिजिक 

१) ललित घुले (शिर्डी)

२) नागेश शेवाळे (नगर)

३) अस्लम सय्यद (श्रीगोदा)

४) राजू साबळे (श्रीरामपुर) 

५) अजीम शेख (कोपरगांव)

श्रीरामपूर (प्रतिनिधी) संभाजीनगर - औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या  राज्यस्तरीय मास्टर्स वेटलिफ्टींग स्पर्धेत येथील यशवंत हार्डकोअर जिमच्या खेळाडूंनी सलग तिसऱ्यांदा यश संपादन करीत नऊ  सुवर्ण पदकांसह  करंडक मिळऊन विजयाची हॅ्ट्रिक केली आहे. तर  येत्या जानेवारीत वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जीमच्या नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे  पॉवर वेटलिफ्टर खेळाडू प्रा. सुभाष देशमुख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. पुढील महिन्यात दि.११ रोजी वाराणसी येथे आयोजित राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी या जिमच्या सर्वश्री. महेश निंबाळकर, विजय देशमुख, राजु सोनवणे, सतीश रासकर, गणेश कुलथे , युनुस शेख, अल्ताफ शेख,सौ. भारती रासकर व सौ. पवार यांची महाराष्ट्राच्या राज्य संघात निवड झाली आहे.या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवीत श्रीरामपूरचे नाव थेट देशपातळीवर घेऊन जात नगर जिल्हा आणि श्रीरामपूरच्या क्रीडाविश्वातील शिरोपेचात मानाचा तुरा खोवला ही कौतुकास्पद बाब आहे. या सूयशाबद्दल मार्गदर्शक प्रा. सुभाष देशमुख आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बेलापूर - (प्रतिनिधी  )-येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच  पारनेर साहित्य साधना मंच व आडवाटेचे पारनेर संस्थेंच्यावतीने कै.अण्णासाहेब ठुबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय "साहित्यरत्न" पुरस्कार जाहिर झाला आहे.                   पारनेर तालुक्यातील पळशीसारख्या दुर्गम भागातून डॉ.कोकाटे यांनी एम.ए.एम.फिल,नेट,पीएचडी असे शिक्षण मराठी साहित्यातून पूर्ण केले आहे.त्यांनी "रानभरारी","मी सूर्याच्या कुळाची","वादळांना झेलताना", "यमुनाबाई कोकाटे यांच्या मौखिक ओवीगीतांचे स्वरुप", "सावित्रीबाई फुले यांच्या कवितेचे स्वरुप","सानिया यांच्या साहित्याचे स्त्रीवादी स्वरुप",वांझोटे वार","सावू उजेडाच्या दिशा","कविता: तुझ्या माझ्या" ,"मी जिंकत गेले आयुष्य" अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या या ग्रंथसंपदेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी आणि महाराष्ट्र कामगार परिषद पिंपरी पुणे यांचा राज्यस्तरीय"ग.दि.माडगूळकर शब्दसृष्टी पुरस्कार","संत कबीर काव्यसरिता राज्य स्तरीय पुरस्कार","शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार",शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक संस्थांचे २३ पुरस्कार मिळाले आहेत .त्या बेलापूर महाविद्यालयाच्या पहिल्या प्रोफेसर आहेत.त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे ,कायम संलग्नीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या या शैक्षणिक ,संशोधन व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन वर्ल्ड पार्लमेंट अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श प्राचार्य राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.या पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आतापर्यंत खूप मान, सन्मान, पुरस्कार मिळाले पण पारनेरच्या मातीतला पुरस्कार घेताना एक वेगळे संवेदन जाणवते आहे कारण हा पुरस्कार म्हणजे माहेरवाशीणीला पांघरलेली मायेची शाल आहे.या पारनेरच्या मातीत मी लहानाची मोठी झाले.खूप संघर्ष वाट्याला आला पण खंबीरपणे लढले.हे लढण्याचे बळ मला पारनेरच्या मातीने दिले आहे असेही त्या म्हणाल्या  .त्यांचे मराठी साहित्यात राज्यस्तरीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अँड.शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, रविंद्र खटोड, भरत साळुंके,हंबीरराव नाईक, राजेंद्र सिकची,अॅड.विजय साळुंके, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्र खटोड, हरिश्चंद्र पाटील महाडिक,  तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी , समस्त बेलापूरकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget