बालपणापासून विद्यार्थ्यांना स्पर्धेची सवय असली पाहिजे - राम टेकावडे
श्रीरामपूर(गौरव डेंगळे): पालकांनी आपल्या पाल्याला बालपणापासून सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रतीक्षित टेकावडे, बाळासाहेब ओझा, विधीज्ञ बाळासाहेब औताडे, शाळेचे प्राचार्य डॉ योगेश पुंड तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्युनिअर के जी व सिनियर के जी वर्गातील विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वडीतके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अस्मिता परदेशी, यास्मिन पटेल, वैष्णवी इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment