राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत श्रीरामपूरच्या यशवंत हार्डकोअर जिमची हॅटट्रिक नऊ खेळाडूंची सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
श्रीरामपूर (प्रतिनिधी) संभाजीनगर - औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स वेटलिफ्टींग स्पर्धेत येथील यशवंत हार्डकोअर जिमच्या खेळाडूंनी सलग तिसऱ्यांदा यश संपादन करीत नऊ सुवर्ण पदकांसह करंडक मिळऊन विजयाची हॅ्ट्रिक केली आहे. तर येत्या जानेवारीत वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जीमच्या नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पॉवर वेटलिफ्टर खेळाडू प्रा. सुभाष देशमुख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. पुढील महिन्यात दि.११ रोजी वाराणसी येथे आयोजित राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी या जिमच्या सर्वश्री. महेश निंबाळकर, विजय देशमुख, राजु सोनवणे, सतीश रासकर, गणेश कुलथे , युनुस शेख, अल्ताफ शेख,सौ. भारती रासकर व सौ. पवार यांची महाराष्ट्राच्या राज्य संघात निवड झाली आहे.या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवीत श्रीरामपूरचे नाव थेट देशपातळीवर घेऊन जात नगर जिल्हा आणि श्रीरामपूरच्या क्रीडाविश्वातील शिरोपेचात मानाचा तुरा खोवला ही कौतुकास्पद बाब आहे. या सूयशाबद्दल मार्गदर्शक प्रा. सुभाष देशमुख आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Post a Comment