Latest Post

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): पालकांनी आपल्या पाल्याला बालपणापासून सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रतीक्षित टेकावडे, बाळासाहेब ओझा, विधीज्ञ बाळासाहेब औताडे, शाळेचे प्राचार्य डॉ योगेश  पुंड तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्युनिअर के जी व सिनियर के जी वर्गातील विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वडीतके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अस्मिता परदेशी, यास्मिन पटेल, वैष्णवी इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेस यांच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स युवा श्री या किताबाचा मानकरी आदम बागवान, बेस्ट पोझरचा मानकरी सद्दाम शेख तर बेस्ट इम्प्रूमेंटचा मानकरी सेजम मणियार हे ठरले.तर अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच वुमेन फिजिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुप्रिया इल्हे हिने वुमेन फिजिकचा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून १४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री मयूर दरंदले, श्री कैलास रणसिंग, श्री सतीश रासकरसोहेल शेख प्रतीक पाटील आदीनी काम बघितले. तर स्पर्धेचं स्टेज मार्शल म्हणून राहुल पैलवान, किरण पोटे, चेतन होंडे, अमोल एखंडे, भीमा जाधव, शुभम बोर्डे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व स्पर्धा आयोजक सागर दुपाटी यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

५५  किलो गट ललित घुले - प्रथम,

सिद्धेश गडगे - द्वितीय,

विजय घोरपडे - तृतीय

अशांत जाधव - चतुर्थ 

श्रीकांत जाधव - पाचवा


६० किलो गट


सद्दाम शेख- प्रथम

धीरज सोनावणे-द्वितीय

निलेश म्हस्के- तृतीय

राजू साबळे- चतुर्थ

शाहबाज पठाण- पाचवा


६५ किलो गट

नागेश शेवाळे - प्रथम

अजय बोर्डे- द्वितीय

तॊसिफ पठाण -तृतीत

संजय भोसले -चतुर्थ

तेजस वैध्य -पाचवा


७० किलो गट


संतोष जरे- प्रथम

ओंकार पंदीकर - द्वितीय

अस्लम सय्यद- तृतीय

प्रकाश दुधमल- चतुर्थ 

रोहित आव्हाड - पाचवा


७५ किलो गट


सैजल मणियार- प्रथम

वैभव सुरशे- द्वितीय

फिरोज पठाण -तृतीय

विवेक गुप्ता- चतुर्थ

किरण सरोदे -पाचवा


८० किलो गट 

आदम बागवान- प्रथम

इम्रान शेख- द्वितीय

सुलतान शेख -तृतीय

मनोज जाधव- चतुर्थ

पवन ललवानी -पाचवा


मेन्स फिजिक 

१) ललित घुले (शिर्डी)

२) नागेश शेवाळे (नगर)

३) अस्लम सय्यद (श्रीगोदा)

४) राजू साबळे (श्रीरामपुर) 

५) अजीम शेख (कोपरगांव)

श्रीरामपूर (प्रतिनिधी) संभाजीनगर - औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या  राज्यस्तरीय मास्टर्स वेटलिफ्टींग स्पर्धेत येथील यशवंत हार्डकोअर जिमच्या खेळाडूंनी सलग तिसऱ्यांदा यश संपादन करीत नऊ  सुवर्ण पदकांसह  करंडक मिळऊन विजयाची हॅ्ट्रिक केली आहे. तर  येत्या जानेवारीत वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जीमच्या नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे  पॉवर वेटलिफ्टर खेळाडू प्रा. सुभाष देशमुख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. पुढील महिन्यात दि.११ रोजी वाराणसी येथे आयोजित राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी या जिमच्या सर्वश्री. महेश निंबाळकर, विजय देशमुख, राजु सोनवणे, सतीश रासकर, गणेश कुलथे , युनुस शेख, अल्ताफ शेख,सौ. भारती रासकर व सौ. पवार यांची महाराष्ट्राच्या राज्य संघात निवड झाली आहे.या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवीत श्रीरामपूरचे नाव थेट देशपातळीवर घेऊन जात नगर जिल्हा आणि श्रीरामपूरच्या क्रीडाविश्वातील शिरोपेचात मानाचा तुरा खोवला ही कौतुकास्पद बाब आहे. या सूयशाबद्दल मार्गदर्शक प्रा. सुभाष देशमुख आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बेलापूर - (प्रतिनिधी  )-येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच  पारनेर साहित्य साधना मंच व आडवाटेचे पारनेर संस्थेंच्यावतीने कै.अण्णासाहेब ठुबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय "साहित्यरत्न" पुरस्कार जाहिर झाला आहे.                   पारनेर तालुक्यातील पळशीसारख्या दुर्गम भागातून डॉ.कोकाटे यांनी एम.ए.एम.फिल,नेट,पीएचडी असे शिक्षण मराठी साहित्यातून पूर्ण केले आहे.त्यांनी "रानभरारी","मी सूर्याच्या कुळाची","वादळांना झेलताना", "यमुनाबाई कोकाटे यांच्या मौखिक ओवीगीतांचे स्वरुप", "सावित्रीबाई फुले यांच्या कवितेचे स्वरुप","सानिया यांच्या साहित्याचे स्त्रीवादी स्वरुप",वांझोटे वार","सावू उजेडाच्या दिशा","कविता: तुझ्या माझ्या" ,"मी जिंकत गेले आयुष्य" अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या या ग्रंथसंपदेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी आणि महाराष्ट्र कामगार परिषद पिंपरी पुणे यांचा राज्यस्तरीय"ग.दि.माडगूळकर शब्दसृष्टी पुरस्कार","संत कबीर काव्यसरिता राज्य स्तरीय पुरस्कार","शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार",शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक संस्थांचे २३ पुरस्कार मिळाले आहेत .त्या बेलापूर महाविद्यालयाच्या पहिल्या प्रोफेसर आहेत.त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे ,कायम संलग्नीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या या शैक्षणिक ,संशोधन व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन वर्ल्ड पार्लमेंट अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श प्राचार्य राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.या पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आतापर्यंत खूप मान, सन्मान, पुरस्कार मिळाले पण पारनेरच्या मातीतला पुरस्कार घेताना एक वेगळे संवेदन जाणवते आहे कारण हा पुरस्कार म्हणजे माहेरवाशीणीला पांघरलेली मायेची शाल आहे.या पारनेरच्या मातीत मी लहानाची मोठी झाले.खूप संघर्ष वाट्याला आला पण खंबीरपणे लढले.हे लढण्याचे बळ मला पारनेरच्या मातीने दिले आहे असेही त्या म्हणाल्या  .त्यांचे मराठी साहित्यात राज्यस्तरीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अँड.शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, रविंद्र खटोड, भरत साळुंके,हंबीरराव नाईक, राजेंद्र सिकची,अॅड.विजय साळुंके, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्र खटोड, हरिश्चंद्र पाटील महाडिक,  तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी , समस्त बेलापूरकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपुर प्रतिनिधी:पत्रकारिते सोबतच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यासह येथील विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ हा राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना तर   राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती रेहाना गणी मुजावर- शेख यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार तसेच अ.भा.लहुजी सेनेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार असलमभाई

बिनसाद यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर समाज प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल व तालुक्यातील सराला गोवर्धनपूरचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रुबाब पटेल यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,त्रिदल सेवा संघ,परिवर्तन फाऊंडेशन,समता फाऊंडेशन,परिवर्तन शिक्षक संघ,पेन्शन शिक्षक संघ यांच्यावतीने येथील समता कार्यालयात पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांचा  शॉल,पुस्तक आणि पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली,चर्मकार संघर्ष समिती अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदा दिलीप शेंडे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे सर,तालुका खजिनदार नामदेव कानडे,ज्येष्ठ सल्लागार नामदेव नन्नवरे, संघटक अशोकराव खैरे सर, सुभाष पोटे, कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.सोनल प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपसचिव सौ.आशाताई संजय दळवी, सौ.अर्चनाताई सतिशराव जाधव, परिवर्तन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष (माजी नायब तहसीलदार) उत्तमराव दाभाडे, त्रिदल सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार,परिवर्तन शिक्षक संघाचे सतिश जाधव सर,पेन्शन शिक्षक संघाचे सुरेश कांबळे सर, शाकिर शेख सर,गुलाबभाई शेख, ग्रामसेवक श्री.मनियार भाऊसाहेब,समता फाऊंडेशनचे इंजि मोहसिन शौकत शेख, सौ.सलवा मोहसीन शेख, सरताज शौकत शेख,अफजल मेमन, मतीन शेख,कु.पुजा सकट, रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना शौकतभाई शेख म्हणाले की, दोस्ती फाऊंडेशनमध्ये वकील, इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक, साहित्यिक अशी विद्वान सदस्य मंडळी आहेत,त्यांनी राज्यभरातील विविध क्षेत्रात सामाजाभिमुख आणि  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे,इतर पुरस्कारार्थींच्या तुलनेत माझे योगदान आगदी नगण्य असे आहे,तरी देखील मला दिला गेलेला राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराबद्दल तसेच आपण सर्वांनी केलेल्या आम्हा सर्वांच्या सत्कारबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, सदरील पुरस्कार आणि आपण केलेला सत्कार यातुन मोठे बळ प्राप्त झाले आहे, पुढे हेच पुरस्कार आणि आपले प्रेम व सदिच्छा प्रेरणास्वरुप आम्हास बळ देण्याकामी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले.या वेळी इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप शेंडे (सर) यांनी केले तर ॲड.मोहसिन शेख यांनी आभार मानले.

अहमदनगर येथे १४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या,हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान, सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी,केलेल्या भाषणा दरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन. मुस्लिम समाजा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र निंबाळकर यांच्या वादग्रस्त विधानाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. मुस्लिम समाजाच्या भावना दुखल्याने,श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिकांसह, युवकांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देऊन. सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात,व आयोजक तसेच संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. सदरचे निवेदन स्वीकारून, वरिष्ठांच्या आदेशानुसार , श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिल्याने.

बेलापुर (प्रतिनिधी  )दळण वळणाच्या दृष्टीने  राहुरी व श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडणारा  प्रवरा नदीवरील कान्हेगाव पुलाच्या बांधकामास राज्याचे  महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांनी बारा कोटी रुपये मंजुर केले असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले यांनी दिली आहे               या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मा जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील केंदळ मानोरी टाकळीमीया जातप करजगाव मुसळवाडी दरडगाव खुडसरगाव पाथरे लाख त्रींबकपुर आदिसह पंधरा ते विस गावे व श्रीरामपुर  तालुक्यातील लाडगाव कान्हेगाव पढेगाव वांगी उंबरगाव वळदगाव बेलापुर कारेगाव अशी श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावे जोडणारा प्रवरा नदीवर पुल असावा अशी दोन्ही तालुक्यातील नागरीकांची अनेक वर्षापासून मागणी होती प्रवरा नदीला पाणी असल्यास  दोन्ही तालुक्यातील गावांचा संपर्क तुटत होता केवळ उन्हाळ्यात प्रवरा नदीला पाणी नसेल तरच प्रवरा काठावरील गावांचा संपर्क होत होता दोन्ही तालुक्याला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे हा पुल होता त्यामुळे नागरीक प्रवरा नदीवर पुल व्हावा अशी वारवार मागणी करत होते दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन माझ्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे  उपसभापती बाळासाहेब तोरणे रामभाऊ लिप्टे गीरीधर आसने महेश खरात मुकुंद लबडे अर्जुन खरात हनुमान खरात प्रविण लिप्टे आदिंनी नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी प्रवरा नदीवरील दोन तालुक्याच्या दृष्टीने दळणवळणा करीता महत्वाचा ठरणारा  कान्हेगाव पुलास बारा कोटी रुपये इतका निधी मंजुर केला असुन या पुलामुळे अनेक गावे आपापसात जोडली जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget