विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चर्मकार संघर्ष समितीसह विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा समता कार्यालयात सत्कार

श्रीरामपुर प्रतिनिधी:पत्रकारिते सोबतच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यासह येथील विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ हा राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना तर   राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती रेहाना गणी मुजावर- शेख यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार तसेच अ.भा.लहुजी सेनेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार असलमभाई

बिनसाद यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर समाज प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल व तालुक्यातील सराला गोवर्धनपूरचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रुबाब पटेल यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,त्रिदल सेवा संघ,परिवर्तन फाऊंडेशन,समता फाऊंडेशन,परिवर्तन शिक्षक संघ,पेन्शन शिक्षक संघ यांच्यावतीने येथील समता कार्यालयात पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांचा  शॉल,पुस्तक आणि पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली,चर्मकार संघर्ष समिती अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदा दिलीप शेंडे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे सर,तालुका खजिनदार नामदेव कानडे,ज्येष्ठ सल्लागार नामदेव नन्नवरे, संघटक अशोकराव खैरे सर, सुभाष पोटे, कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.सोनल प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपसचिव सौ.आशाताई संजय दळवी, सौ.अर्चनाताई सतिशराव जाधव, परिवर्तन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष (माजी नायब तहसीलदार) उत्तमराव दाभाडे, त्रिदल सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार,परिवर्तन शिक्षक संघाचे सतिश जाधव सर,पेन्शन शिक्षक संघाचे सुरेश कांबळे सर, शाकिर शेख सर,गुलाबभाई शेख, ग्रामसेवक श्री.मनियार भाऊसाहेब,समता फाऊंडेशनचे इंजि मोहसिन शौकत शेख, सौ.सलवा मोहसीन शेख, सरताज शौकत शेख,अफजल मेमन, मतीन शेख,कु.पुजा सकट, रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना शौकतभाई शेख म्हणाले की, दोस्ती फाऊंडेशनमध्ये वकील, इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक, साहित्यिक अशी विद्वान सदस्य मंडळी आहेत,त्यांनी राज्यभरातील विविध क्षेत्रात सामाजाभिमुख आणि  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे,इतर पुरस्कारार्थींच्या तुलनेत माझे योगदान आगदी नगण्य असे आहे,तरी देखील मला दिला गेलेला राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराबद्दल तसेच आपण सर्वांनी केलेल्या आम्हा सर्वांच्या सत्कारबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, सदरील पुरस्कार आणि आपण केलेला सत्कार यातुन मोठे बळ प्राप्त झाले आहे, पुढे हेच पुरस्कार आणि आपले प्रेम व सदिच्छा प्रेरणास्वरुप आम्हास बळ देण्याकामी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले.या वेळी इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप शेंडे (सर) यांनी केले तर ॲड.मोहसिन शेख यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget