सेवानिवृत्त शिक्षकांनी ज्ञानदानासाठी सहकार्य करावे- पटारे अरुणा प्रकाश माने यांना भावपूर्ण निरोप*
सौ अरुणा प्रकाश माने यांनी श्रीरामपुरातच शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली. नगरपालिकेच्या विविध शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या सेवा काळात कधीही मुलांना शिक्षा केली नाही किंवा हातात छडी घेतली नाही याचा अनेक मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी विद्यार्थीनी सविता मोरे, दीप लोखंडे, मृण्मयी लोखंडे, तसेच पोपटराव वाघचौरे, अजय शिंदे, लता आवटी, मंदाकिनी गायकवाड, सचिन शिंदे आदींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सर्वश्री. लतीफ शेख, शब्बीर शेख, अशोकराव कानडे, संजय तुपे, सचिन डोळस, सचिन दळवी, मुख्याध्यापिका कृष्णा थोरे, कल्पना गायकवाड, प्रतिभा जयकर, आशाबाई शिंदे, नवनाथ अकोलकर, ताराचंद पगारे,अशोक गायकवाड, हर्षल माने, कल्पेश माने, वर्षा वाकचौरे, अमोल कल्हापुरे, संतोष लोखंडे, मंगेश लोखंडे, शुभांगी माने, सुरेखा डांगे, दिपाली शेळके, दिलावर भाई शेख, गणेश कानडे, विठ्ठल तुपे, नंदू तुपे, विनोद चतुर्भुज, मुख्याध्यापक बाबासाहेब पिलगर, दिगंबर तुपे, शंकरराव डहाळे, राजेंद्र तुपे, धनंजय तुपे, प्रकाश क्षीरसागर, योगेश शिरसागर, सविता मोरे, शरद नागरगोजे, भरत गिरी, संभाजी त्रिभुवन, सुरेश दळवी, गणेश वाकचौरे, सुमित माने, श्रीमंत चव्हाण, अजय धाकतोडे, सतीश खामकर, कांबळे टेलर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मदने यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन मुसळे, यास्मिन शेख, मनीषा सांगळे, सुनीता हंडाळ, मंदाकिनी गायकवाड, लता आवटी, अनिता बडे, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.