बेलापुर (प्रतिनिधी )-अहमदनगर येथील वाडीया पार्क मैदानावर पार पडलेल्या १५ वर्ष वयोगटातील मुलीच्या क्रिकेट चाचणीमध्ये बेलापुरची कन्या मिसबा जावेद शेख हीची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघात मिसबा हीची निवड झाली आहे श्रीरामपुर येथील साई अँकेदमीकडून खेळताना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण उत्तम फलंदाज म्हणून तीची निवड करण्यात आलेली आहे मिसबा ही विद्यानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कूल ऐनतपुर येथे झाले आहे बेलापुरच्या माजी उपसरपंच शिरीन शेख व माजी क्रिकेट खेळाडू जावेद शेख यांच्या त्या कन्या आहेत तिला साई क्रिकेट अँकेडमीचे महेश बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिच्या निवडी बद्दल मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे पत्रकार देविदास देसाई कैलास चायल कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेषौठ नेते सुनिल मुथा विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे
यावेळी पुढे बोलताना फाटक म्हणले की युवा मुलींनी या सर्व शिबिरासाठी आलेल्या मुलींचा खेळ बघून आपण देखील या खेळामध्ये प्राविण्य मिळवावे जेणेकरून आपल्या राज्याचा संघ बलाढ्य होईल व तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवेल. मला आशा आहे की चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणारा पुणे विभागीय मुलींचा संघ निश्चित सुवर्णपदकास गवसणी घालेल यात शंकाच नाही असे ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी मिलेनियम नॅशनल स्कुलचे क्रीडा अधिकारी रामदास लेकावळे यांनीही संघास शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप
कोंडे, सचिन चव्हाण, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे यांनी केले.
श्रीरामपूर येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळा वर उपचार करण्यास नकार दिला.
वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट कमीशन प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सदर अन्यायग्रस्ताने बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर ही घटना घातली.
सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत मुंदडा यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून महागड्या उपचाराकरीता खर्च करतात सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून... याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा. जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टरांनीही घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यातअसे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशा मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात अशा प्रकारचा अन्याय रुग्णांवर झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भादवी 166 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे..