श्रीरामपूर येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळा वर उपचार करण्यास नकार दिला.
वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट कमीशन प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सदर अन्यायग्रस्ताने बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर ही घटना घातली.
सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत मुंदडा यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून महागड्या उपचाराकरीता खर्च करतात सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून... याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा. जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टरांनीही घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यातअसे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशा मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात अशा प्रकारचा अन्याय रुग्णांवर झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भादवी 166 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे..
Post a Comment