Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-गायरान जमीनीवरील अतिक्रमण न काढता ते कायम स्वरुपी करण्यात यावे अशी मागणी मांडवे तालुका श्रीरामपुर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडे केली आहे                               न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असुन श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे येथील एकुण ९१ कुटुंबाला या बाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मांडवे येथील गट नंबर१८० मधील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन गेल्या अनेक वर्षापासून ९० ते १०० कुटुंब वास्तव्यास आहेत  त्यांनी वेळोवेळी नियमानुसार घरपट्टी पाणी पट्टी विज बिल भरलेले आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्याकरी सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोवींद ताबे मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य  शहाजी वडीतके गोकुळ पवार साहेबराव चितळकर संतोष चितळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्विकारले या वेळी बोलताना आण्णासाहेब गेठे म्हणाले की मांडवे येथील गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षापासून शंभर कुटुंब राहत असुन त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत त्यांची अतिक्रमण कायमस्वरुपी करुन देण्यात यावी या करीता शासन दरबारी अनेक वेळा निवेदने दिली ग्रामसभेचे ठरावही दिले तसेच महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे तरी देखील येथील नागरीकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत आता लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे सर्व नागरीकांची रास्त मागणी आहे तरी शासनाने कुणालाही बेघर करु नये असे गेठे म्हणाले आम्हाला कुणालाही बेघर न करता  आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा .जिल्हाधिकारी  मा उपविभागीय अधिकारी आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर मायकल साळवी साहेबराव चितळकर गोकुळ पवार विठ्ठल अनारसे सुनिल तुपे नामदेव रजपुत बाबासाहेब अनारसे नामदेव अनारसे एकनाथ पोकळे कचरु गांगुर्डे मंदा भुजबळ बाळासाहेब पोकळे बाळू पवार भिवसेन मोरे छबु बर्डे मल्हारी माळी संतोष माळी सुरेश मोरे मंगल मोरे सुभाष गांगुर्डे सोमनाथ पवार किरण गायकवाड उषा पवार विष्णू सोनवणे बेबी संसारे माया माळी दत्तू माळी आदिसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत

दाढ (लोणी) : येथील महात्मा फुले विद्यालय येथे पुणे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा श्री मनोज म्हस्के (उपाध्यक्ष नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्था) यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी श्री नरेंद्र मोरे,श्री खालकर,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे मा अध्यक्ष श्री पार्थ दोशी, पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री दादासाहेब तुपे, राष्ट्रिय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,बारामतीचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री शिवाजी जाधव, आत्मा मलिकचे स्पोर्ट्स डेप्युटी डायरेक्टर श्री शलेंद्र त्रिपाठी,श्री सुनिल चोळके,गौरव डेंगळे,श्रीरामपूरचे क्रीडा रत्न श्री नितीन बलराज, राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ईरा ढेकणे व ग्रिष्मा करणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आज पुणे विभागीय निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा,पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ६५ मुल-मुली उपस्थित होते. यामधून १५ मुलं व १५ मुली यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या मुलांचे शिबिर दाढ येथे पार पडणार आहे तर मुलींचं सराव शिबिर पुणे येथे आयोजित होणार आहे. या सराव शिबिरातून १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात येईल व निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्यावतीने सब ज्युनियर (१६ वर्षाखालील) मुले व मुली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे विभागाचा नेतृत्व करेल.सदर स्पर्धा दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी-देविदास देसाई)-   बेलापुरचा आठवडे बाजार वेळ सायंकाळची एक जण पुलावरुन प्रवरा पात्रात उडी घेतो त्याला वाचविण्यासाठी अनेक तरुण जिवाची पर्वा न करता नदीत उड्या मारतात त्याला सहीसलामत बाहेर काढतात अन तो निघतो बेवडा             बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार असतो येथुन जवळच असलेल्या केसापुर येथील तिन जण सायंकाळच्या वेळेस पुलावरुन चालले असता पुलाच्या कोपऱ्यावरच गाडीचे पेट्रोल संपते अन मग काय करायचे अशा विचारातच आणखी थोडी टाकुन येवु असे करुन तिघेही निघाले अन मौज मस्ती करता करता एकाने अचानक पुलावरुन नदी पात्रात उडी घेतली काही क्षणात अनेक जण मदतीला धावले काही तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचविण्यासाठी नदी पात्रात उड्या घेतल्या पुलावर मोठी गर्दी जमली पोलीसही आले त्याला सुखरुप बाहेर काढले त्याची चौकशी केली असता तो केसापुरातील निघाला त्याचे साथीदारही आले खरी गंमत समजल्यावर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरीष पानसंबळ भरत तमनर संपत बडे यांनी त्यास  पोलीस स्टेशनला नेले पोलीसी भाषेत समजावुन सांगीतले अन त्या सर्वांना त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले गंमत करायला गेले अन अंगाशी आले अशी अवस्था त्यांची झाली

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी भागवत लुटे तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बेलापुर येथील रविंद्र कर्पे तसेच अहमदनगर  जिल्हा निरीक्षक पदी चंद्रकांत शेजुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे                                                 प्रदेश तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली महासंघाची  बैठक संपन्न झाली या वेळी मार्गदर्शन करताना मांजी मंत्री तथा राज्याध्यक्ष  जयदत्त क्षिरसागर म्हणाले की प्रदेश तेली महासंघाच्या  माध्यमातून  समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटीत करुन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील समाजानेही संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले पाहीजे तरुण पिढीने परंपरागत व्यवसाया व्यतिरिक्त  शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करुन समाजाचे नाव मोठे करावे असे अवाहनही क्षिरसागर यांनी केले या वेळी सागर बाळासाहेब भगत यांची नाशिक युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .या वेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश सेक्रेटरी विजयराव काळे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष अरविंद दारुणकर अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नरहरी नागले जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ देवकर अहमदनगर शहर युवा अध्यक्ष नितीनराव फल्ले जेष्ठ मार्गदर्शक दिलीप साळूंके बाळकृष्ण दारुणकर संतोष मेहेत्रे आदि मान्यवरासह तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी शेवटी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अपघात टाळण्यासाठी ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांना तातडीने रेडीयम व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .                                प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देविदास देसाई यांनी पुढे म्हटले आहे की ऊस वहातुक करणारी वाहने भरधाव वेगाने चाललेली असतात एका ट्रक्टरला दोन दोन ट्राँली जोडलेली असतात रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे ऊस वहातुक करणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते तसेच ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते पाठीमागे असणाऱ्या वाहनाने हाँर्न वाजविला तरी मोठ्या आवाजात असलेल्या गाण्यामुळे चालकाच्या ते लक्षात येत नाही तो चालक केवळ गाण्याच्या तालातच वाहन चालवत असतो त्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनावर मोठा स्पिकर लावण्यास परवानगी देवु नये ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठाले स्पिकर असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी तसेच परिवहन कार्यालयाने तसे लेखी पत्र संबधीत साखर कारखान्यांना द्यावे  असेही देसाई यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :श्रीरामपूर शहर व तालुकाभर सुरु असलेले सर्वच अवैध व्यावसाय त्वरित बंद करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देत सदरील व्यावसाय बंद न झाल्यास येत्या ५ डिसेंबर रोजी उपोषण करणार असल्याबाबत पोलिसांत निवेदन दिल्याचा राग मनात धरुन येथील समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी तसेच समाजवादी पक्ष नेत्यांविषयी व्हॅटसअप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी तथा तक्रारदार श्री.जमादार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदरील अवैध  व्यावसायिकास त्वरीत अटक करण्यात यावी अशा अशयाची तक्रार त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत दाखल केली असून या तक्रारपत्रांच्या प्रती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठविण्यात आल्या आहे.

श्री.जमादार यांनी या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, व्हॅटसअप ग्रुपवर एका अवैध गुटखा व्यावसायिकाने आमच्या समाजवादी या राजकीय पक्षाच्या आणि पक्ष नेत्यांच्या बाबतीत नकली समाजवादी नेता अशी पोस्ट टाकून आमच्यासह सर्वच समाजवादी पक्ष नेत्यांची बदनामी केली आहे,

या लोकांचा श्रीरामपुर शहर व तालूक्यात अवैध गुटखा तसेच मावा तसेच त्याचबरोबर अंमली पदार्थाचा मोठा अवैध व्यवसाय असल्याने या व्यवसायला संरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे गुंड लोक त्याचबरोबर स्त्रीयांचाही मोठा सहभाग या लोकांनी घेतलेला आहे.सादर गुंड लोकांना व स्त्रियांना हाताशी धरून जातिवाचक शिवीगाळ ,विनयभंग वगैरे स्वरुपाच्या बनावट केसेस आमचे व आमच्या कुटुंबाचे तसेच आमच्या संघटने च्या पदाधिकार्या विरुद्ध हे लोक करनारे आहेत. तसेच आम्ही रहात असलेल्या ठिकानी काही अनोळखी तरुण हे घराची टेहाळनी करीत असल्याचे आम्हांला समजते आहे, तसेच हे लोकं नेहमीच म्हणत असतात की आम्ही मेमन जमातीचे लोकं असुन संपूर्ण देश मेमन लोकांना घाबरतो कारण आमचे शेजारील देशासी देखील जवळचे संबंध आहे,तथा शेजारील देशात आमचे बहुसंख्य नातेवाईकही आहेत असे म्हणत नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,तसेच रस्त्याने जाता- येता वाहने अंगावर घालण्याचा देखील प्रकार करत जीवे मारण्याची धमकी देतात यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबायांच्या जीवीतास यामुळे धोकाही निर्माण झाला आहे, करीता सदरील व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा या आक्षेपार्ह पोस्टमुळे आमचेही कार्यकर्त्यांच्या मनात चिड निर्माण होऊन  यापासून मोठा वाद निर्माण होत परिस्थिती हाताबाहेरही जावू शकते,करीता आपण या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन या महाभागावर वेळेतच उचित व योग्य कारवाई करावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, गांभीर्याने दखल घेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना कारवाईचे आदेश देताच.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून,सी.सी.टी.व्ही. फुटेज,गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींच्या आधारे, वार्ड नंबर २ बीफ मार्केट येथील, इब्राहिम गणी शहा नावाच्या आरोपीस ताब्यात घेऊन. त्याच्या ताब्यातून ९ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या, २० चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, श्रीरामपूर पोलिसांचे कौतुक करत,पकडलेल्या आरोपीने अनेक गाड्या चोरून, भंगार मध्ये विकल्याची कबुली दिल्याने, पोलीस इतर आरोपीचा शोध घेत असून.आरोपीने केलेल्या आणखीन गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी  दिली आहे. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे,भैरव अडागळे,रघुवीर कारखेले,सोमनाथ गाडेकर, विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,मच्छिंद्र कातखडे, प्रविण क्षिरसागर,गौतम लगड,रमिझराजा अत्तार, गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget