भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ईरा ढेकणे व ग्रिष्मा करणे यांचा दाढ येथे नागरी सत्कार
दाढ (लोणी) : येथील महात्मा फुले विद्यालय येथे पुणे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा श्री मनोज म्हस्के (उपाध्यक्ष नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्था) यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी श्री नरेंद्र मोरे,श्री खालकर,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे मा अध्यक्ष श्री पार्थ दोशी, पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री दादासाहेब तुपे, राष्ट्रिय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,बारामतीचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री शिवाजी जाधव, आत्मा मलिकचे स्पोर्ट्स डेप्युटी डायरेक्टर श्री शलेंद्र त्रिपाठी,श्री सुनिल चोळके,गौरव डेंगळे,श्रीरामपूरचे क्रीडा रत्न श्री नितीन बलराज, राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ईरा ढेकणे व ग्रिष्मा करणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आज पुणे विभागीय निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा,पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ६५ मुल-मुली उपस्थित होते. यामधून १५ मुलं व १५ मुली यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या मुलांचे शिबिर दाढ येथे पार पडणार आहे तर मुलींचं सराव शिबिर पुणे येथे आयोजित होणार आहे. या सराव शिबिरातून १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात येईल व निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्यावतीने सब ज्युनियर (१६ वर्षाखालील) मुले व मुली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे विभागाचा नेतृत्व करेल.सदर स्पर्धा दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.
Post a Comment