Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-मुस्लीम धर्माचे संस्थापक मोहंम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात जश़्ने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्सहात संपन्न झाली   ईदगाह मैदान अ्लाउद्दीन बाबा चॉक पासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक बेलापुरच्या मुख्य झेंडा चौकात येताच नागरीकांच्या वतीने जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड मा,सरपंच भरत साळूंके तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी केले या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. तुळजा भवानी मंदीर चौकातही मिरवणूक आल्यानंतर तेथेही मुस्ली बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर मिरवणूक जामा मस्जिद येथे आली तेथे मिरवणूकीचे रुपांतर सभेत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे मुख्य ट्रस्टी जाफरभाई आतार हे होते या वेळी विद्यार्थ्यांनी मोहंम्मद पैगंबर यांच्या जिवनावर भाषणे केली .या वेळी जिं प सदस्य शरद नवले ,जामा मस्जिदचे ट्रस्टी हाजी बहोद्दीन सय्यद सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे नियोजनजामा मस्जिद ट्रस्ट व अंजुमन कमीटी बेलापुर यांनी केले होते कार्याक्रम यशस्वीतेसाठी मोहसीन बहोद्दीन सय्यद जब्बार  आतार शफीक बागवान असीफ शेख शफीक आतार कौसर सय्यद जब्बार बागवाले अजीज शेख सर्फराज सय्यद जुबेर आतार कैफ काझी वसीम शेख समीर शेख सुलतान शेख मुख्तार सय्यद आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी ईस्माईल शेख यांनी केले तर सूत्रसंचलन मोहसीन सय्यद यांनी केले मुनीर बागवान यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर-आगदी १५००ं वर्षांपूर्वी  रानटी -क्रुर-अमानवीय प्रथा- रितीरिवाजांनी व्यापलेला  वाळवंटातील व जगातील जनसमुदायाला एक अल्लाहा( ईश्वरा)ची शिकवण देत समस्त जगाने एका अल्लाहाची प्रार्थना करावी . त्यामध्ये कोणीही शुद्र-उच्च-नीच - काळा - गोरा नाही,  जगातील सर्व मानव जात ही एकच आदम ची लेकरे आहोत . 

म्हणुनच ती इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जाती जमातीत जन्माला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज  प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांनी नाकारला, त्यांनी प्रत्येक 

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान-ज्ञानी  फक्त धार्मिक ज्ञान हेच फक्त महत्त्वाचे नसून  सर्व समावेशक ज्ञान  महत्वाचे आहे उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर ई. विविध क्षेत्रातील विद्वान , तत्वज्ञ, ज्ञानी असलेल्यांना  ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली. चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या,ज्ञानाच्या,  क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत  होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी,  ज्ञान घेण्यासाठी चिनला जा", असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाचा  सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

 ज्ञानाच्या, कौशल्याच्या , तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो . पुढे जावू शकतो.

त्यामध्ये , राज्य कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच हजरत मुहम्मद पैगंबरांनी नाहीसा करून टाकून प्रत्येक्षात आचरणातून दाखवून दिले. 

समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.नींआपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीतच समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून माणसाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे कसे वागवावे याचे उदाहरण समस्त जगाला दाखवून दिले . अरब देशात काळा - गोरा  भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, गुलामगिरी च्या प्रथेने कळस गाठलेला .काळ्या निग्रो लोकांना माणूस म्हणून जगताना मान्यताच नव्हती , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,  गुलामगिरीला हद्दपार-नष्ट करून एका जैद नावाच्या काळया निग्रो  गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणी चा विवाह लावून काळ्या-गोऱ्यांचा भेदभाव नष्ट केला.

हजरत बिलाल रजि. (काळ्या  वर्णाचे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून  मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देऊन  समस्त जगाला कोणीही अपवित्र नसते हे दृश्य दाखवून दिले. इस्लामच्या सिद्धांतानुसार एकाच अल्लाहा (ईश्वरा) ची , आदम ची संतान आहेत. सर्व रंगाचे-वर्णाचे- वंशाचे , सर्व एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा पुरोगामी क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला.

जगातील स्त्रियांनाही आपल्या वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे. तो वारसा हक्क  मिळवून देणारा जगभरात पहिला  क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. त्याकाळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसतं . विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे शब्दात वर्णन करणे अवघड होते .     हे सर्व बघुन विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबरांनी आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर ज्ञाय 

- हक्क स्वाधीन करून  काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला दाखवले.

     🌺कन्यावध - स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.

पवित्र कुराणात सांगितले की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा" 

तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलीत ,हे आम्ही काय मोठे पातक -पाप केलीत म्हणून,

    प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. तर ,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल . तसेच ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल..

अशाप्रकारे वास्तविकतेचे धडे देत  अल्लाहा (इश्वर) चे  प्रिय  होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे  सांगितले.

प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब २)हज.रुकैयया,३) उममे कुलसूम ४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत.त्यामध्ये " करबला युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या सर्वांत छोट्या मुलीचा समावेश ही होतो .

हे स्वकर्तृत्वाने जगाला दाखवले.

यामुळे ज्यांच्या घरात मुली जन्माला  होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर  चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून  जगप्रसिद्ध  आराफात च्या अंतिम संबोधनात  शपथेवर , "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही , चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहेत. तो द्यावा.  बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,." ..🌹

असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वत्र अभेद-समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली.

प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिलेत.असे म्हणत की, " मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"


लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेख

बैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

९२७१६४००१४.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-हज़रत मोहम्मद पैगंबर  जयंतीच्या ( ईद मिलाद )निमित्ताने  गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा मुले , बेलापुर, येथे विकलांग विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप  करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने  पैगंबर जयंती साजरी करण्यात आली           या वेळी मां.जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर  सोसायटीचे चेअरमन  सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान मुस्ताक शेख हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद हवालदार अतुल लोटके आदि मान्यवर उपस्थित होते  यावेळी पंचायत समिती सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटिल नाईक आपल्या भाषणात म्हणाले की  मोहम्मद पैगंबरएक थोर समाज सुधारक होते यांनी समाजत असणाऱ्या  अनेक रूढी परंपरा स्री भ्रुण हत्या तसेच  महिलावर होणारे  अत्याचार यावर आळा घातला मोहम्मद पैगंबर यांनी जीवनात सर्वात जास्त शिक्षणाला महत्व दिले गौसे आजम ही सेवाभावी संस्थाही अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करत आहे .अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहीले पाहीजे असेही नाईक म्हणाले  या वेळी जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे  चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्यक्त करताना  गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या या वेळी मान्यवरांच्या हस्ते विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले , मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, मोहसिन सय्यद, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटेके , जीना शेख,जिल्हा परिषद मराठी शाळा मुळे पालक समती अध्यक्ष राजू भाई सय्यद मुख्यधापक कांबले मैडम, व सर्व शिक्षक वर्ग,गौसे आजम सेवा भावी संस्था संस्थापक  मुख़्तार भाई सय्यद, अध्यक्ष सुल्तानभाई शेख, महा सचिव नौसाद भाई शेख, तालुका अध्यक्ष सोनू भाई शेख, सईद सय्यद, भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक भाई शाह, मोहसिन ख्वाजा भाई शेख,इ उपस्थित होते गौसे आजम सेवा भावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष मुख़्तार सय्यद यांनी  आभार व्यक्त केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रखर राष्ट्रवाद, देशभक्ती, सामाजिक समरसता जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत असुन सर्वाना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी गेल्या ९७ वर्षापासून संघाचे कार्य अविरतपणे चालु आहे असे   प्रतिपादन रा स्व.संघाचे नासिक विभाग प्रचारक सुवेदजी देशमूख यांनी केले.

बेलापूर येथील रा.स्व. संघाच्या विजय दशमी दसरा उत्सवात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माऊली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुडे हे होते,तर तालुका सहकार्यवाह निलेशजी हरदास, देविदासजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपेंद्र कुलकर्णी यांच्या 

।"संघ विजयी पथ पर बढ चले."। या गीताने करण्यात आली.

आपल्या भाषणात देशमुख म्हणाले भारताची गौरवशाली संस्कृती,परंपरा आहे. आपल्यातील शौर्य,शक्ती,तेजाची उपासना करण्यासाठी या दिवशी शस्राचे पूजन केले जाते असेही ते म्हणाले

अध्यक्षीय भाषणात सुभाष वाघुंडे म्हणाले—देशात वृद्धाश्रमे ही समाजासाठी कलंकित बाब आहे.वृद्धाश्रमे असू नये हे जरी अपेक्षीत असले तरी निराधारांना आधार देणे.ह्याच मुळ उद्देशाने मी वृद्धाश्रम सुरु केलेला आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळे जिवनाता शिस्त लागते आपल्यातील राष्ट्र प्रेम जागृत होते समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतुन सुरु केलेल्या माऊली आश्रमात सध्या १९ आजी आजोबा सेवा घेत आहे .सुमारे २८ आजी आजोबांना मी घरवापसी केल्याचे त्यांनी सांगितले..

यावेळी रा.स्व.संघाचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले.संघस्थानावर सुर्य नमस्कार,नियुद्ध, अग्र्निप्रलय,प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सुञसंचलंन देवेंद्र गोरे यांनी तर आभार रविंद्र कोळपकर यांनी  मानले.कार्यक्रमास परिसरातील संघप्रेमी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते,

बेलापुर  (प्रतिनिधी  )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन महेबुब शेख हे होते या वेळी सजंय जगताप यांनी मयत सभासदाचे सभासदत्व रद्द करुन वारसास सभासद करुन घ्यावे तसेच सातबारा नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची सुचना केली त्यास कल्याणराव जगताप यांनी अनुमोदन दिले ऐनवेळच्या विषयात तोट्यात असणारी संस्था उर्जितावस्थेत कशी येईल या करीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनावर चर्चा झाली .गावात सुरु असलेले धान्य दुकान शेजारच्या गावास जोडले असुन कार्डधारकांना चार किलोमीटर दुर अंतरावर धान्य नेण्याकरीता जावे लागते त्यातच मशिन बंद असल्यास माघारी यावे लागते ही कार्डधारकांची, गोरगरीबांची होणारी हेळसांड थांबविण्याकरीता गावाचे धान्य दुकान गावातच सुरु करण्याची मागणी ऐन वेळच्या विषयात करण्यात आली .संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली .संस्थेचे चेअरमन  महेबुब शेख यांनी लांडेवाडी ते देवळाली चिंचोली या एक किलोमीटर  रस्त्याच्या दुरुस्तीचे काम स्वः खर्चाने केल्याबद्दल सभासदांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले . या वेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक उपसभापती योगीता चव्हाण यांनी केले तर सचिव गीताराम काळे यांनी अहवाल वाचन केले प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले शेवटी संचालक देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )-संक्रापुर तालुका राहुरी येथील लांडेवाडी ते देवळाली चिंचोली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संक्रापुर सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी स्वःखर्चाने केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला            संक्रापुर ग्रामस्थांना राहुरी,  देवळालीला जाण्याकरीता लांडेवाडी ते चिंचोली देवळाली हाच ऐकमेव रस्ता आहे मात्र पावसामुळे या रास्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले होते या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला होता परंतु शासन स्तरावर काहीच हालचाल झाली नाही संक्रापुर सहकारी संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांना या रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांचे हाल पहावेना मग त्यांनी पदरमोड करुन या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला लांडेवाडी ते चिंचोली देवळाली फाटा या एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने करुन नागरीकांची गैरसोय दुर केली त्याबद्दल संस्थेचे संचालक जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला या वेळी संस्थेचे माजी चेअरमन नबाजी जगताप संजय जगताप कल्याणराव होन भरतरीनाथ सालबंदे बाजीराव जगताप त्रींबक गताप विजय रोकडेकुंडलीक खेमनर बाळासाहेब गुंड भाऊसाहेब जगताप बबन खेमनर राजेंद्र जगताप रोहीदास खपके सुभाष दाते बाळासाहेब जगताप डाँक्टर सुरेश जगताप दावल शेख आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापूर(प्रतिनिधी )--विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही हरवु शकत नाही असे उद़्गार नाशिकच्या प्राईम अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. विकास मालकर यांनी व्यक्त केले. बेलापूर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर गायडन्स चर्चासत्रात  बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समीतीचे चेअरमन राजेश खटोड होते तर संस्थेचे विश्वस्त रविंद्र खटोड शेखर डावरे हे प्रमुख उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम , मानसन्मान प्रतिष्ठा ,पारितोषिके, बक्षीसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते.त्यामुळे सरळ सेवा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी.सिलेक्शन कमिशन , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात .उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात सर्वात जास्त लोक भारतीय रेल्वेमध्ये काम करतात. त्या खालोखाल नंबर लागतो तो भारतीय सैन्य दलाचा. सरकारी नोकरीमध्ये ठराविक कालावधीनंतर तसेच विभागीय परीक्षा द्वारे बढतीच्या संधी देखील प्राप्त होतात. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते .त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.दुस-या सत्रात न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य योगेश पुंड यांनी मोटिव्हेशनल स्पीच दिले. करियर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.खुल्या सत्रामधे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व मान्यवरांनी निराकरण केले, अध्यक्षीय सूचना विजया फलके हिने मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन पुजा सोनवणे  हिने दिले..चर्चासत्राचे संयोजन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. विठ्ठल सदाफुले,करीअर गायडन्सचे समन्वयक डॉ.अशोक माने ,अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. बाबासाहेब पवार,प्रा विकास नालकर यांनी केले.या चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक केले .पायल म्हस्के हीने सूत्रसंचलन केले तर मनीषा मुसमाडे हीने आभार मानले .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget