संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षीक सभा खेळीमेळीत संपन्न
बेलापुर (प्रतिनिधी )-संक्रापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन महेबुब शेख हे होते या वेळी सजंय जगताप यांनी मयत सभासदाचे सभासदत्व रद्द करुन वारसास सभासद करुन घ्यावे तसेच सातबारा नसलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची सुचना केली त्यास कल्याणराव जगताप यांनी अनुमोदन दिले ऐनवेळच्या विषयात तोट्यात असणारी संस्था उर्जितावस्थेत कशी येईल या करीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनावर चर्चा झाली .गावात सुरु असलेले धान्य दुकान शेजारच्या गावास जोडले असुन कार्डधारकांना चार किलोमीटर दुर अंतरावर धान्य नेण्याकरीता जावे लागते त्यातच मशिन बंद असल्यास माघारी यावे लागते ही कार्डधारकांची, गोरगरीबांची होणारी हेळसांड थांबविण्याकरीता गावाचे धान्य दुकान गावातच सुरु करण्याची मागणी ऐन वेळच्या विषयात करण्यात आली .संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली .संस्थेचे चेअरमन महेबुब शेख यांनी लांडेवाडी ते देवळाली चिंचोली या एक किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम स्वः खर्चाने केल्याबद्दल सभासदांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले . या वेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक उपसभापती योगीता चव्हाण यांनी केले तर सचिव गीताराम काळे यांनी अहवाल वाचन केले प्रकाश नलगे यांनी सहकार्य केले शेवटी संचालक देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले
Post a Comment