Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर या ठिकाणी सवाऱ्याचे विसर्जन होत आहे गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोहरम ची मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर शहरातील सर्वधर्मीयांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूर शहरात कित्येक वर्षांपासून ची परंपरा असलेले हजरत सैलानी बाबा दरबार मौलाअली यांची सवारी आठ मोहरम रोजी श्रीरामपूर शहरातील मेन रोड भागातून हजरत सय्यद शाह कादरी बाबा तसेच काजी बाबा व बारा इमान दर्गा या ठिकाणी भेट देऊन पुन्हा छत्रपती शिवाजी रोड

मार्गे हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये सावरींची  स्थापना केली जाते श्रीरामपूर शहरात वर्षानुवर्षांपासून सवारी मिरवणूक व इराणीं धर्मीयांचा मातम हे लोकांचं आकर्षण ठरत आहे शहरातील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्गेजवळ भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी व पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात यावेळी पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आले होते 

श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी सावरींची स्थापना केली जाते त्यामध्ये हुसेन नगर हेही प्रसिद्ध आहे तसेच डावखर रोड येथील तृतीयपंथी इमामे कासीम यांची सवारी ही आकर्षण ठरली जाते यामध्ये मिलत नगर,ईदगाह परिसर, सूतगिरणी फाटा, गोंदवणी रोड,बेलापूर रोड वार्ड क्रमांक ७, बेलापूर, अशोक नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवारी चे स्थापना केली जाते हे सर्व सवारी मोहरम १०ला शहरातून मुख्य मार्गावरून  विसर्जन मिरवणूक होतात परंपरेप्रमाणे याही वर्षी सावरींची मिरवणूक शहरातून व परिसरातून करण्यात आली,


बेलापूर याठिकाणी मुख्य बाजार पेठेतून सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्ती भावाने सर्व धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व काही ठिकाणी प्रसाद शरबत याचंही वाटप करण्यात आलं या सर्व सवाऱ्या हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी येऊन विसर्जन होतात तर काही आपापल्या ठिकाणी विसर्जन केले जाते गेल्या दोन वर्षानंतर आज श्रीरामपूरकरांना याचा लाभ मिळाला यावेळी हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणची सवारी शहरवासीयांना आकर्षण ठरले हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी खिचडा महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आलेला आहे याकरता सर्व शहरवासीयांना  हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेले आहे. या सर्व मोहरम मिरवणुका शहर भर आंनदात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी शान-ए-करबला कमेटीचे पदाधिकारी असलम बिनसाद,तमन्ना सुरय्या नायक,कलीम बिनसाद,ऍडव्हकेट अजित डोखे,अजीज अहेमद शेख(बेलापूर )तसेच पोलीस प्रशासन यांनी अधिक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम शहर वासियांच्या सहकार्याने वेवस्थित पार पडल्याणे सर्वांना यश मिळाले. 

नाशिक प्रतिनिधी-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वरिष्ठ गटाच्या 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेला  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांतून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडू अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळवले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून 16 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील 20 पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅटप्रमुख म्हणून काम बघत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैंद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापुरात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले                                                    नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापूरातील मुख्य चौकात शरदराव मित्र मंडळाच्या वतीने फटाक्याची अतिषबाजी करुन मिठाईचे विटप करण्यात आले बेलापूरातील शरदराव नवले मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे भाजपाचे युवा नेते प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे हाजी ईस्माईल शेख ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक स्वाती अमोलीक रावसाहेब अमोलीक सागर ढवळे राकेश कुंभकर्ण मोहसीन सय्यद रत्नेश गुलदगड जाकीर हासन शेख प्रभात कुऱ्हे अरुण शिंदे जिना शेख अनवर शेख ज्ञानेश्वर वाबळे अजिज शेख प्रविण बाठीया शफीक आतार रमेश लगे राजेंद्र काळे शफीक बागवान कुमार नावंदर रमेश कुमावत आली शेख अमोल तेलोरे अफजल शेख मयुर खरात कृष्णाजी गाढे सिराज कुरेशीआदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

करबला युद्ध " जगातील गावा- गावात शहरात युद्धाच्या आठवणी आपोआपच मोहर्रम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " च्या दिवशी कितीही कठोरमनाच्या माणसात जाग्या होतात.प्रेषित मुहम्मद स्व. यांनी अल्लाह च्या सत्यधर्म ईस्लामचा प्रसार- प्रचार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट सहनशीलतेचे अंत बघून त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले,जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव जंतू च्याही रक्षणासाठी, जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशाही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, (तलवारी च्या जोरावर नव्हेतर) आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन " लोकशाही " व्यवस्था समस्त जगाला दाखवून देवून, अल्लाहच्या पवित्र कुरआन व हादीस नुसार स्वतः पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना करार करून जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या नंतर समस्त जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने  निर्माण करावयास हवेत याचे प्रशिक्षण दिले.यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र, सहाबा यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब (डेप्युटी) ला म्हणतात, खलिफा ईस्लामी व्यवस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. "मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ स्थापून " शुराई - निजाम"च्या माध्यमातून  लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते ,याचे वारंवार उदाहरण प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता. हे सल्ले अल्लाहा प्रत्येकाच्या मस्तिष्कात बुद्धित घालून त्या मार्फतच येत असतात. यालाच लोकशाही म्हणतात.असो.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या मजलिस -ए - शुरांच्या सल्लागार नुसार असे पुण्यवान (राशिदीन) , अनुभवी (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि. या वेगवेगळ्या घराण्यातील  कर्तव्यदक्ष साथीदारांची  क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ (बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या महापरिनिर्वाणानंतर वरील चार खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.. त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही आजरामर आहे  . 

महात्मा गांधी जी व विविध तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त केली आहे ,असो.

चौथ्या खलिफा  हज. अली  रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजि.चे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.

या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मसजिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व यांचेच एक सहकारी ह. आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून  घोषित केले ,परंतु त्यांनी ईस्लामच्या तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली नुसार न करता " राजेशाही बादशहा पध्दतीनुसार राजेशाही राहणे, वागणूक व एक मोठा राजप्रासाद ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. हे इस्लामी संस्कृतीच्या राज्य व्यवस्थानेपला कदापीही मान्य नव्हते. त्यानंतर ह.आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतःचा अपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीनावरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपला अपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले.यजिदच्या राजेपदास व क्रुर शासनपध्दतीस  जनतेचा जागोजागी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. याचे अवडते नातू हजरत इमाम हुसैन रजि. यांची खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्रव्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारांपेक्षाही जास्त पत्रे लिहीली जावून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही देत होते, सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधूं च्या सर्व परीवारासह मदीनावरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना धमकावत,जो ह. इमाम हुसैन यांना साथ,थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यूदंड दिले जाईल अशी धमकी दिली. राजा यजिद कडून कुफा शहरातील त्याच्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 

प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा करण्याच्या सर्व अटी व शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास सांगितले, परंतु जालीम,अत्याचारी,कपटी यजिदला समर्थन देण्यास ह. इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट आव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त,जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तीन प्रस्ताव मांडले, परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरात नदीचे पाणी ह. हुसैन यांच्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात विना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा महिन्याचे बाळ अली असगर यांच्यावर त्रिकोणी बान मारुन त्यांची हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारण्यात आले, त्यांच्याबरोबर जे होते त्यांचे देखील हालहाल करून बहात्तर ७२  लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद, हौतात्म्य झाले. हा दिवस १० मुहर्रम हिजरी ६१ प्रमाणे इंग्रजी दिनांक १० ऑक्टोबर ६८० या दिवशी  ७२ हुतात्म्यांनी फक्त ईस्लामच्या पवित्र कुराण - हादीसच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी  शहीद झाले, हौतात्म्य पत्कारले.

करबलाच्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलीदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 

हजरत इमाम हुसैन यांनी जुलमी यजिदच्या क्रुर, जुलमी, अत्याचारी ,दमनकारी सत्तेपुढे गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता, परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अल्लाहच्या सत्यधर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले,

म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "


लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

 मोबा.नं. 9271640014

अहमदनगर प्रतिनिधी-नगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पकडली. त्यांच्याकडून सहा लाख 85 हजार रूपये किंमतीच्या 17 दुचाकीं हस्तगत करण्यात आल्या आहेत.शेख अकिल शेख खलील (वय 49), शेख मंजुर अनिस अहमद (वय 31), मुकर्रस मुस्तफा सय्यद (तिघे रा. भवानीनगर, औरंगाबाद), आयुब याकुब सय्यद (रा. विळद ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेख अकिल व त्याचा साथीदार चोरीच्या दुचाकी औरंगाबादरोडने नगरकडे घेवून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे, संभाजी कोतकर व संजय काळे यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे सापळा लावुन संशयीत शेख अकिल शेख खलील, शेख मंजुर अनिस अहमद यांना ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातील विना नंबर मोपेड ही नगरच्या स्टेट बॅक येथुन दोघांनी मिळुन चोरी केली बाबत माहिती दिली. या दोन्ही दुचाकी चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार मुकर्रम मुस्तफा सय्यद, आयुव याकुब सय्यद (फिटर) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौघांनी चोरीच्या 17 दुचाकी दिल्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. नगर जिल्हा व औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्ह्यांची माहिती घेतली असता या आरोपींनी दिलेल्या माहिती वरून एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे पकडलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळुन केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील अन संत समजले म्हणजे भगवंत समजतील. त्यामुळे ग्रंथाचा भावार्थ समजुन त्या प्रमाणे आचरण करा असे अवाहन पंढरपूर च्या पहिल्या पायी दिंडीचे मानकरी . ह. भ. प.भानुदास महाराज { हिरवे } बेलापूरकर यांनी केले.

-येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,व किर्तन महोत्सवाचे  ३ रे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पूढे म्हणाले—देव ओळखण्यासाठी गुरु करावा लागतो,गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.  देवाचे प्रेम आपणाला सांगता येत नाही.देव कोणालाच दिसत नाही.संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना देव समोर आले असतांही ते त्यांना समजले नाही.

साधू, संताचे जीवन आपणाला जगता येणार नाही.आचाराने, विचाराने प्रत्येकाने आपले जीवन जगावे यासाठी संताच्या दिंड्या निघतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत दुःखावर प्रेम करतात.संताचे चरण घरात आले तिथेच आनंद मिळतो.देव,देश, आणि धर्माची सेवा करा! मी वयाच्या १९ व्या वर्षापासून किर्तन सेवा करतो.माझ्या वडींलाच्या व राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बेलापूरकर यांच्या जन्मभूमीत किर्तन करण्याचा " योग" मला आला यांचा आनंद होतो.परमार्थ हा सुखाचा सागर आहे त्याचा अंगीकार करा जिवन आनंदी व सुखमय होईल असेही ते म्हणाले

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील स्थानाकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांनी स्थानकाच्या केलेल्या इमारतीच्या प्लॅनला नगरपालिकेकडून गेल्या 15-20 वर्षांत कायदेशीर मंजुरी न घेता बांधकाम केले आहे. नगरपालिकेने प्लॅन मंजूर करावा किंवा विश्वस्तांनी मंजुरीच्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम नियमित करावे अन्यथा अध्यक्ष व विश्वस्त यांचेविरुध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समाजिक कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी काल गुरुवारी सकाळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपोषणार्थी व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना सायंकाळी 5 वा. नगरपालिका कार्यालयामध्ये चर्चेसाठी बोलावून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी समाजातील ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी म्हणाले, जैन स्थानकाची होत असलेली वास्तू ही कायदेशीर वास्तू असावी. भविष्यात तरुण पिढीला त्यासंदर्भात काहीही बेकायदेशीरपणासाठी प्रयत्नांची वेळ येऊ नये. आम्ही व अमित मुथ्था यांनी बांधकाम प्लॅन मंजुरीसाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झाली नाही. स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.मुख्याधिकारी गणेश शिंदे यावेळी म्हणाले, अमित मुथ्था यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त आहे.स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांना आम्ही वेळोवेळी पत्र दिले. समक्ष बोलावले परंतु अद्याप त्यांचेकडून पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्थानक बांधकाम मंजुरीचे प्रकल्प प्रलंबित आहे. आम्ही त्यांना मंजुरीच्या कामासाठी व कागद पत्रासाठी 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्यात ही पूर्तता झाली नाही तर नगरपालिका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करील, त्यामुळे अमित मुथ्थांनी उपोषण मागे घ्यावे तसे लेखी आश्वासन दिले.आश्वासनानंतर अमित मुथ्था यांचे उपोषण मुख्याधिकारी शिंदे यांनी सरबत देऊन सोडले.यावेळी मुथ्था यांचे समवेत अभय मुथ्था, सतीश चोरडिया, किरण लुणिया, रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, राजेंद भंडारी, हेमंत खाबिया, मनसुख चोरडिया, प्रकाश समदडिया, दिलीप लोढा, दीपक गांधी, दीपक संघवी, सचिन गुंदेचा, रोहित भंडारी, सुमित गांधी, सचिन समदडीया, गिरीश बाठिया, महेश सोनी,हर्ष चोरडिया, मनोज बोरा आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget