श्रीरामपूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर या ठिकाणी सवाऱ्याचे विसर्जन होत आहे गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोहरम ची मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर शहरातील सर्वधर्मीयांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूर शहरात कित्येक वर्षांपासून ची परंपरा असलेले हजरत सैलानी बाबा दरबार मौलाअली यांची सवारी आठ मोहरम रोजी श्रीरामपूर शहरातील मेन रोड भागातून हजरत सय्यद शाह कादरी बाबा तसेच काजी बाबा व बारा इमान दर्गा या ठिकाणी भेट देऊन पुन्हा छत्रपती शिवाजी रोड
मार्गे हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये सावरींची स्थापना केली जाते श्रीरामपूर शहरात वर्षानुवर्षांपासून सवारी मिरवणूक व इराणीं धर्मीयांचा मातम हे लोकांचं आकर्षण ठरत आहे शहरातील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्गेजवळ भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी व पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात यावेळी पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आले होते
श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी सावरींची स्थापना केली जाते त्यामध्ये हुसेन नगर हेही प्रसिद्ध आहे तसेच डावखर रोड येथील तृतीयपंथी इमामे कासीम यांची सवारी ही आकर्षण ठरली जाते यामध्ये मिलत नगर,ईदगाह परिसर, सूतगिरणी फाटा, गोंदवणी रोड,बेलापूर रोड वार्ड क्रमांक ७, बेलापूर, अशोक नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवारी चे स्थापना केली जाते हे सर्व सवारी मोहरम १०ला शहरातून मुख्य मार्गावरून विसर्जन मिरवणूक होतात परंपरेप्रमाणे याही वर्षी सावरींची मिरवणूक शहरातून व परिसरातून करण्यात आली,
बेलापूर याठिकाणी मुख्य बाजार पेठेतून सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्ती भावाने सर्व धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व काही ठिकाणी प्रसाद शरबत याचंही वाटप करण्यात आलं या सर्व सवाऱ्या हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी येऊन विसर्जन होतात तर काही आपापल्या ठिकाणी विसर्जन केले जाते गेल्या दोन वर्षानंतर आज श्रीरामपूरकरांना याचा लाभ मिळाला यावेळी हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणची सवारी शहरवासीयांना आकर्षण ठरले हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी खिचडा महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आलेला आहे याकरता सर्व शहरवासीयांना हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेले आहे. या सर्व मोहरम मिरवणुका शहर भर आंनदात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी शान-ए-करबला कमेटीचे पदाधिकारी असलम बिनसाद,तमन्ना सुरय्या नायक,कलीम बिनसाद,ऍडव्हकेट अजित डोखे,अजीज अहेमद शेख(बेलापूर )तसेच पोलीस प्रशासन यांनी अधिक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम शहर वासियांच्या सहकार्याने वेवस्थित पार पडल्याणे सर्वांना यश मिळाले.

Post a Comment