सत्यधर्म रक्षणासाठी हजरत इमाम हुसैन रजि.यांच्यासह ७२ वीरांनी हौतात्मे (शहीदी) पत्कारले

करबला युद्ध " जगातील गावा- गावात शहरात युद्धाच्या आठवणी आपोआपच मोहर्रम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " च्या दिवशी कितीही कठोरमनाच्या माणसात जाग्या होतात.प्रेषित मुहम्मद स्व. यांनी अल्लाह च्या सत्यधर्म ईस्लामचा प्रसार- प्रचार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट सहनशीलतेचे अंत बघून त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले,जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव जंतू च्याही रक्षणासाठी, जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशाही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, (तलवारी च्या जोरावर नव्हेतर) आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन " लोकशाही " व्यवस्था समस्त जगाला दाखवून देवून, अल्लाहच्या पवित्र कुरआन व हादीस नुसार स्वतः पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना करार करून जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या नंतर समस्त जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने  निर्माण करावयास हवेत याचे प्रशिक्षण दिले.यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र, सहाबा यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब (डेप्युटी) ला म्हणतात, खलिफा ईस्लामी व्यवस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. "मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ स्थापून " शुराई - निजाम"च्या माध्यमातून  लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते ,याचे वारंवार उदाहरण प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता. हे सल्ले अल्लाहा प्रत्येकाच्या मस्तिष्कात बुद्धित घालून त्या मार्फतच येत असतात. यालाच लोकशाही म्हणतात.असो.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या मजलिस -ए - शुरांच्या सल्लागार नुसार असे पुण्यवान (राशिदीन) , अनुभवी (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि. या वेगवेगळ्या घराण्यातील  कर्तव्यदक्ष साथीदारांची  क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ (बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या महापरिनिर्वाणानंतर वरील चार खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.. त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही आजरामर आहे  . 

महात्मा गांधी जी व विविध तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त केली आहे ,असो.

चौथ्या खलिफा  हज. अली  रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजि.चे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.

या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मसजिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व यांचेच एक सहकारी ह. आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून  घोषित केले ,परंतु त्यांनी ईस्लामच्या तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली नुसार न करता " राजेशाही बादशहा पध्दतीनुसार राजेशाही राहणे, वागणूक व एक मोठा राजप्रासाद ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. हे इस्लामी संस्कृतीच्या राज्य व्यवस्थानेपला कदापीही मान्य नव्हते. त्यानंतर ह.आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतःचा अपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीनावरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपला अपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले.यजिदच्या राजेपदास व क्रुर शासनपध्दतीस  जनतेचा जागोजागी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. याचे अवडते नातू हजरत इमाम हुसैन रजि. यांची खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्रव्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारांपेक्षाही जास्त पत्रे लिहीली जावून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही देत होते, सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधूं च्या सर्व परीवारासह मदीनावरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना धमकावत,जो ह. इमाम हुसैन यांना साथ,थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यूदंड दिले जाईल अशी धमकी दिली. राजा यजिद कडून कुफा शहरातील त्याच्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 

प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा करण्याच्या सर्व अटी व शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास सांगितले, परंतु जालीम,अत्याचारी,कपटी यजिदला समर्थन देण्यास ह. इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट आव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त,जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तीन प्रस्ताव मांडले, परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरात नदीचे पाणी ह. हुसैन यांच्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात विना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा महिन्याचे बाळ अली असगर यांच्यावर त्रिकोणी बान मारुन त्यांची हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारण्यात आले, त्यांच्याबरोबर जे होते त्यांचे देखील हालहाल करून बहात्तर ७२  लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद, हौतात्म्य झाले. हा दिवस १० मुहर्रम हिजरी ६१ प्रमाणे इंग्रजी दिनांक १० ऑक्टोबर ६८० या दिवशी  ७२ हुतात्म्यांनी फक्त ईस्लामच्या पवित्र कुराण - हादीसच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी  शहीद झाले, हौतात्म्य पत्कारले.

करबलाच्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलीदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 

हजरत इमाम हुसैन यांनी जुलमी यजिदच्या क्रुर, जुलमी, अत्याचारी ,दमनकारी सत्तेपुढे गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता, परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अल्लाहच्या सत्यधर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले,

म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "


लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

 मोबा.नं. 9271640014

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget