Latest Post


अहमदनगर प्रतिनिधी:-जिल्हयात श्रीरामपुर मध्ये  तब्बल ८ गावठी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पकडले.८ गावठी कटयांबरोबर १० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.येत्या दोन-तीन महिन्या नगरपालिकेची निवडणुक होणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ८ गावठी कट्टे सापडल्याने शहरातील नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रस्तुत बातमीतील माहिती अशी की,श्रीरामपुरात काही जणांकडे गावठी कट्टे आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना मिळाली.सदर माहितीची खात्री करत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व पोनि.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक श्रीरामपूर मध्ये गेले  असता पथकात सपोनि/सोमनाथ दिवटे यांच्यासह सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, बापू फौलाणे, देवेंद्र शेलार,भिमराज खरसे, पोना/शंकर चौधरी,सुरेश माळी,रवी सोनटक्के,मयुर गायकवाड,सागर ससाने, चंद्रकांत कुसळकर,आदींचे पथक श्रीरामपुरात आले असताना शहरातील एसटी स्टॅन्ड जवळ असणाऱ्या हॉटेल राधिकाच्या पार्कींगच्या परिसरात आरोपी असल्याची पक्की माहिती समजल्यानंतर याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सापळा लावला असता त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर हेच ते आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर झडप घालून तिघा जणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे झडती घेतली असता ८ गावठी कट्टे सापडून आले आणि त्याचबरोबर १० जिवंत काडतुसही मिळाले.या आरोपींना तातडीने पोलिसांनी गावठी कट्टयांसह ताब्यात घेतले.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. याबाबत सफौ/ राजेंद्र वाघ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.


अहमदनगर प्रतिनिधी-देश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात तेड निर्माण होईल अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सर्तक झाले आहे. यासाठी सायबर पोलीस काम करत आहे. त्यांचे सोशल मीडियावर विशेष लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नुपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात याप्रकरणी एका तरूणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी नगर शहरात एका युवकाने लाल किल्ला व तिरंगा ध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. बजरंग दलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियात अशा तणाव निर्माण करणार्‍या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर सेलसह पोलीस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना, सोशल मीडिया पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करत कंटेनरसह मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. गुरूवारी नगर-पुणे रोडवरील पळवे (ता. पारनेर) शिवारात ही कारवाई करण्यात आली.या कंटेनरमध्ये 750 मिलीचे विदेशी मद्याचे एकूण 600 बॉक्स, तसेच 180 मिलीचे 950 बॉक्स होते. विदेशी मद्यासह कंटेनर (एमएच 04 इएल 6050) असा अंदाजे एक कोटी 21 लाख 50 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंटेनरमधून विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कंटेनरमधून वाहतूक करत असताना वाहन चालक प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त केला आहे. सदर विदेशी मद्यसाठा गोवा राज्यातील महाराष्ट्र सीमेजवळ ताब्यात घेऊन नाशिक येथील टोलनाक्यावर घेऊन जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.बेकायदेशीरपणे परराज्यातील मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ जि. सोलापूर), निखील कोकाटे (रा. तांबोळी ता. मोहोळ जि. सोलापूर) यांचा गुन्ह्यात सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक ओ.बी. बनकर करत आहेत. सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपअधीक्षक बी. टी. घोरतळे, निरीक्षक बनकर, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, दुय्यम निरीक्षक ढोले, सहा. दुय्यम निरीक्षक संजय विधाते, तुळशीराम करंजुले, जवान निहाल उके, सुरज पवार, एन. आर. ठोकळ, शुभांगी आठरे यांच्या पथकाने ही करवाई केली.


बेलापुर (प्रतिनिधी  )-रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीने आयोजित केलेल्या कर्मयोगी मुरलीधर खटोड चषकाचा बहुमान व रुपये २१ हजार रुपयाचे पारितोषिक   कोपरगावच्या येसगाव संघाने मिळवीले            रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीच्या वतीने बेलापूरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकाचे (रुपये२१००० )एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर योगेश पाटील नाईक मित्रमंडळाच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे (रुपये ११०००)अकरा हजार रुपयाचे तसेच तृतीय क्रमांकाचे (रुपये ७०००)सात हजार रुपयाचे पारितोषिक किरण औटी मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ (रुपये ५००० )पाच हजार रुपयाचे पारितोषिक किरण गंगवाल व आनंद दायमा यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण सोळा संघांनी सहभाग नोंदवीला. बेलापूरचा डीटीडीसी व कोपरगावचा येसगाव संघ यांच्यात अतिम लढत झाली. येसगाव संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात ६४ धावा केल्या. परंतु डीटीडीसी संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही. प्रथम क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक येसगाव संघाने मिळवीले तर बेलापूरच्या डीटीडीसी संघाने दुसऱ्या क्रमांकाचे रुपये अकरा हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले. पढेगाव संघाने तिसरा तर एसडी लाईव्ह बेलापुर या संघाला चौथे बक्षिस देण्यात आले. या वेळी अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा वेळोवेळी भरविल्या जाव्यात जेणे करुन मोबाईल तसेच व्यसनाच्या अहारी गेलेली तरुण पिढी खेळाकडे तसेच व्यायामाकडे वळेल असे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले. या वेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,माजी सरपंच भरत साळूंके ,अजय डाकले, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, अभिजित राका ,योगेश नाईक ,प्रसाद खरात, मुन्ना खरात ,गणेश मगर,जयेश अमोलीक , रफीक शेख , किरण भांड ,भूषण चंगेडीया, अँड.  यशवंत नाईक आदिच्या उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न झाले या सर्व सामन्याचे फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते त्या करीता निखिल ढमाले व विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम  घेतले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी  रामभाऊ मगर ,सुनिल ढमाळे, फिरोज पठाण, किरण साळूंके, संकेत कुमावत, साई पवार, शकील शेख, सनी जगताप,  प्रतिक कर्पे, जितेश साळूंके, ब्रिजेश कर्पे, अजय धनवटे आदिंनी विशेष प्रयत्न केले शाहरुख पठाण यांनी सर्व सामन्याचे सुंदर असे  समालोचन केले होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असुन समाजवादी पक्षाचे देखील महाविकास आघाडीस खुले समर्थन आहे,याकरीता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आमदार आबु आझमी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्ष प्रदेशाध्यक्षांसह पक्ष प्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणी आ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असल्याने सर्वत्र खुपच चांगले आणि प्रशंसनीय विकासकामे होत आहे,तथा या आघाडीस पाठिंबा म्हणून समाजवादी पक्षाने देखील खुले सर्मथन दिलेले आहे,सोबतच समाजवादी पार्टी नेहमी आपल्या बरोबरीने कामे करण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असतेच याकरीता आमच्या समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आजमी यांना आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात समावून घेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी आम्हा सर्व समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति

ना.उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) शिवसेना पक्ष प्रमुख मुंबई,ना.जयंत पाटील,मंत्री.जलसंपदा व लाभक्षेत्र प्राधिकरण, प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मुंबई,आ.नानासाहेब पटोले,

प्रदेशाध्यक्ष : अ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, मुंबई,मा.खा.शरद पवार,

पक्ष प्रमुख: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तथा सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रसार माध्यमांना पाठविण्यात आल्या असल्याचेही जोएफ जमादार म्हणाले.


श्रीरामपूर प्रतिनिधी- उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या, कोपरगाव हद्दीतील रेल्वे मालधक्क्यावर जेव्हा जेव्हा रॅक येतो, त्यावेळी काही हुंडेकरी जाणीवपूर्वक, स्थानिक कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांना डावलून. साईराजा रोडवेज व  साईचैतन्य रोड लाईन्सच्या .७० ते ८० गाडया क्षमतेपेक्षा जास्त माल घेवून वाहतुक करीत आहे. या ओव्हरलोड वाहतुक करून, स्थानिक युनियनवर अन्याय करीत असल्याने. अशा प्रकारच्या ओव्हरलोड वाहतूकीवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधितांवर व  त्यांचे गाडयांवर कडक कारवाई करून. शासकीय नियमानुसार दंडासह, जप्तीची कारवाई करावी. अशी मागणी कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास ,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे डी डगळे यांना, निवेदनाद्वारे युनियनने दिला आहे. सदरचे निवेदन देण्या वेळी, कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची,अनिल हरकल,किरण वैद्य,वसीम सय्यद,प्रशांत पानकडे,संदीप कु-र्हे आदींसह कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


श्रीरामपूर(प्रतिनिधी) :अहमदनगर पोखर्डी येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेमध्ये संस्कार स्पोर्ट्स क्लब,श्रीरामपूरच्या खेळाडूंनी यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज बारहाते (सुवर्ण),अनन्या शिंदे (रोप्य),अर्णव पगारे  (कास्य),सम्राट फंड(कास्य),प्रेमकुमार आठरे (कास्य) यांनी पदक प्राप्त केले . सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी   अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून श्रीरामपूर शहराचे व परिसराचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ३०० ते ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा आयोजकांनी विशेष करून संस्कार स्पोर्ट्स क्लबचे अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंचे ह.भ. प.आचार्य शुभम महाराज कांडेकर,श्री करणदादा ससाणे, दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक श्री करण नवले,ॲड.गावडे ,श्री विजय खरात, श्री सचिन बडदे,श्री गणेश शिंदे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या जोरावर खेळाडू आपले करिअर घडू शकतो,असे मोलाचे मार्गदर्शन महाराजांनी खेळाडूंना केले.शिवकालीन खेळ व शिवकालीन बालसंस्कार खऱ्या अर्थाने संस्कार स्पोर्ट्स क्लब मध्ये दिले जाते,असे प्रतिपादन श्री करणदादा ससाणे यांनी केले. संस्कार स्पोर्ट्स क्लब गेल्या ७ वर्षापासून शिवकालीन खेळ संस्कृती व बाल संस्कार याची खऱ्या अर्थाने जोपासना करीत आहे.श्रीरामपूरातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी,विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशिक्षक श्री प्रवीण कुदळे यांनी केले.सर्व यशस्वी खेळाडूंना गणेश कुदळे व मुख्य प्रशिक्षक शिवभक्त श्री प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget