एक कोटी 21 लाख 50 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त,विदेशी मद्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला

अहमदनगर प्रतिनिधी-गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करत कंटेनरसह मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. गुरूवारी नगर-पुणे रोडवरील पळवे (ता. पारनेर) शिवारात ही कारवाई करण्यात आली.या कंटेनरमध्ये 750 मिलीचे विदेशी मद्याचे एकूण 600 बॉक्स, तसेच 180 मिलीचे 950 बॉक्स होते. विदेशी मद्यासह कंटेनर (एमएच 04 इएल 6050) असा अंदाजे एक कोटी 21 लाख 50 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंटेनरमधून विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कंटेनरमधून वाहतूक करत असताना वाहन चालक प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त केला आहे. सदर विदेशी मद्यसाठा गोवा राज्यातील महाराष्ट्र सीमेजवळ ताब्यात घेऊन नाशिक येथील टोलनाक्यावर घेऊन जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.बेकायदेशीरपणे परराज्यातील मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ जि. सोलापूर), निखील कोकाटे (रा. तांबोळी ता. मोहोळ जि. सोलापूर) यांचा गुन्ह्यात सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक ओ.बी. बनकर करत आहेत. सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपअधीक्षक बी. टी. घोरतळे, निरीक्षक बनकर, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, दुय्यम निरीक्षक ढोले, सहा. दुय्यम निरीक्षक संजय विधाते, तुळशीराम करंजुले, जवान निहाल उके, सुरज पवार, एन. आर. ठोकळ, शुभांगी आठरे यांच्या पथकाने ही करवाई केली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget