Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 या ठिकाणी एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केला. याबाबतची माहिती मिळताच वाढदिवस साजरा करणारा तरुण व ज्याची तलवार आहे तो तरुण अशा दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गळे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार हे शहरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांना माहिती मिळाली की, सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर एकजण तलवारीने केक कापत असताना दिसत होता. याबाबतची माहिती घेतली असता शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 येथील ऋषिकेश सुनील गडाख असे नाव असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस ऋषीकेश गडाख याच्या घरी जावून या व्हीडिओबाबतची विचारपूस केली असता ही तलवार माझ्या वाढदिवसाला माझा मित्र प्रशांत शिवाजी भोसले (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याने आणली होती. त्यानुसार पोलीस ऋषिकेश गडाख याला घेऊन शिरसगाव येथे प्रशांत भोसले याच्या घरी गेले. त्यास व्हीडिओमध्ये वापरलेल्या तलवारीबाबतची विचारपूस केली असता त्याने सदरची तलवार माझ्या घरातच आहे.असे सांगितले व सदरची तलवार घरातून काढून दिली. सदरची तलवार 1 हजार रुपये किंमतीची असून तिची लांबी मुठीसह 2 फूट 9 इंच लोखंडी मुठ, पुढील धारदार टोक अशा वर्णनाची ही तलवार मिळून आली. सदरची तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.दि. 7 मे 2022 रोजी रात्री 8.15 वा. इंदिरानगर, शिरसगाव हद्द, अशोकनगर भागात प्रशांत शिवाजी भोसले याने विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगतांना आढळून आला व त्याचा मित्र ऋषिकेश सुनील गडाख याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला असून या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 317/2022 प्रमाणे प्रशांत भोसले, ऋषिकेश गडाख यांचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरण पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे हे करत आहेत.


संगमनेर प्रतिनिधी-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.संगमनेर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला संतोष अशोक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने फुस लावून पळवून नेले. याबाबत सदर मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळंदे यांनी केला. यामध्ये सदर आरोपीने मुलीला दमण येथे नेले होते. तिथे तो मानलेल्या बहिणेकडे राहिला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत संगमनेर येथे आणले.सदर पिडीत मुलीचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यामध्ये आरोपी संतोष वाडेकर याने सदर मुलीला बळजबरीने पळवून नेले. प्रथम ते वणी येथे गेले. तेथे बनावट मंगळसुत्र घेवून पिडीतेच्या गळ्यात घातले. वणी येथून नाशिक येथे घेवून आला व नाशिकहून दमण येथे घेवून गेला. दमण येथे आरोपीने मानलेली बहिण हिचेकडे पिडीत मुलीला 3 ते 4 दिवस तिच्या खोलीत ठेवले. तेथेच आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.या जबाबावरुन सदर आरोपीविरुद्ध वाढीव कलम 362, 366 (अ), 376 (2) (क) (एन) लावण्यात आले. तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 5(8) 6, तसेच पिडीता अनुसूचित जाती-जमातीची असल्याने अनुसूचित जाती जमाती प्र. का. क 3(1), (12),3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळंदे यांनी केला. गुन्ह्याचे अंतिम दोषारोपपत्र राकेश ओला यांनी दाखल केले.सदर खटला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या पुढे चालला. सदर खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 363 नुसार 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, 376 (2) नुसार 10 वर्षे शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, 376 (2) (एन) नुसार 10 वर्ष शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार 10 वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 9 महिने कैद. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत, असा निकाल न्यायालयाने दिला.


शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी शहरात अवैध गुटख्याची चोरून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 2 लाख 39 हजार 580 रुपयांच्या मुद्देमालासह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना शहरातील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. तसेच त्या गुटख्याबरोबरच मध्यप्रदेशातून हत्यारे पाठवली जातात आणि त्याची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दातरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धडक दिली. पथकाला खोलीच्या झडतीत ठिकाणी गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला मिळून आले.याठिकाणी राहाणार्‍या आयुष सुनील कशीष (वय 19) रा.राजमोहला कॉलनी, इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन अधिक झडती घेतली असता त्याच्या खोलीतून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मालात विविध कंपन्यांचे गुटखा व पानमसाल्यासह विना नंबरची पांढर्‍या रंगाची दुचाकी आणि देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस असा एकूण 2 लाख 39 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गु.र. नं.204/2022 प्रमाणे आयुष सुनिल कशीष, आशिष अशोकलाल खाबिया, (रा.साईसावली निवास, गोवर्धन नगर, शिर्डी), अभय रामेश्वर गुप्ता (रा.इंदोर) यांच्याविरोधात भादंवि कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 आणि त्याखाली नियम 2011 चे कलम 26 (2) (4) सह भारतीय हत्यार कायदा 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभय गुप्ता हा पसार झाला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहा पोलीस निरिक्षक दातरे करत आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी - राज्यभरात  चालू असलेले भोंगा प्रकारा मुळे श्रद्धे पोटी देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या करिता मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनदेण्यात आले या निवेदनात श्रीक्षेत्र शिर्डी येथील ओराईबाबांची पहाटेची काकडआरती व शेजआरती, तसेच श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल मंदिराची दैनंदिन आरती गेल्या दोन दिवसांपासून जनीक्षेपकांवरून करण्याचे बंद करण्यात आलेले आहे श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. श्रीसाईबाबांवरील श्रद्धेपोटी दूर अंतरावरून पाया भाविकांची गैरसोय होतु नये, तसेच अवघ्या महाराष्ट्राटे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल चरणी नतमस्तक होणासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांचा ओघ लक्षात घेता या दोन्हीही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दैनंदिन आरतीचा भक्तजणांना लाभ व्हावा व गैरसोय दुर हावी म्हणून परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारी दैनंदिन आरती यापुढेही ध्वनीक्षेपकावरून चालु ठेवण्यारा यावी. हे दोन्हीही तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच श्रीसाईबाबा व श्रीविठ्ठल-रुमीगी है दोन्हीही दैवत राष्ट्रिय एकात्मतेची प्रतिक मानली जातात. परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे आरती सुरू असतांना असंख्य भाविक मनोमन भक्तीभावाने सहभागी होवून, आहे त्या ठिकाणावरून परनेश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात. भाविक भक्तांचा तो अधिकार ध्वनीक्षेरकांमुळे संपुष्टात येवु नये, यासाठी दोन्हीही तिर्थक्षेत्राचे ठिकाणी परंपरेनुसार होणारी आरती यापुढेही छनी वोपळांवरुनच करण्यात यावी, याबाबत आमच्या भावना लक्षात घेवुन प्रशासनाने योग्य ती दखल घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी  श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली या वेळी अहमदभाई जहागीरदार,मुक्तारभाई शाह,महेबूबभाई कुरेशी ,कलीम भाई कुरेशी ,रियाजखान पठाण ,यासिनभाई सय्यद ,रमजानशाह हैदरशाह,अहेमद शाह  सिकंदर शाह ,रहिमभाई शेख ,फयाज जब्बार कुरेशी ,रज्जाकभाई पठाण ,ताराचंद रणदिवे ,राहुल काशिनाथ लिहिणार ,शेख बदर बनेसाहब ,शाह अकबर वजीर सह मुस्लिम जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 


अहमदनगर प्रतिनिधी:- प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की मौजे वाकडी.ता.राहाता शिवारातील वाकडी-राहता जाणारे लगत हॉटेल न्यू आनंद येथे ४ इसम जेवण करण्यासाठी दि.५/०५/२०२२ रोजी २.३० च्या सुमारास आले होते.जेवण उशिरा दिले असे मुद्दाम कारण पुढे करून हॉटेल चालक श्री.विजय हरिभाऊ चोळके यांच्या डोक्याला गावठी कट्ट्याचा तुंबा मारून त्यांना जखमी केले तसेच रुपये ५ लाखाची संध्याकाळपर्यंत व्यवस्था करा असे सांगून गावठी कट्टा मधून फायर करत असताना हॉटेलचालक विजय चाळके याने आरोपीचा हात पकडल्याने पुढील अनर्थ टळला,सदरची घटना ४.३० वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल चालक विजय हरिभाऊ चोळके यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर I १३९/२०२२ भादविक ३९७,३८६,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी १) सतीश रावसाहेब वायदंडे(राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) २) रमेश तानाजी वायदंडे (राहणार गणेश नगर वाकडी शिवार तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ३) गोरक्षनाथ लक्ष्मण भुसाळ(राहणार रामपूरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) ४) दत्तात्रय रामदास जगताप (राहणार रामपुरवाडी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून त्यांना त्यांची ओळख पटवून अल्पावधीतच अटक करण्यात आली आहे यातील आरोपी रमेश तानाजी वायदंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,मा.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,आणि श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे,पोसई/संजय निकम,श्री.अतुल बोरसे,पोहेकॉ/राजेंद्र लवांडे पोहेकॉ/मोहन शिंदे,पोहेकॉ/अशोक आढागळे,पोना/प्रशांत रणवरे,पोना/आबासाहेब गोरे,पोना/दादा लोंढे,पोना/अनिल शेंगाळे,चापोना/ साजीद पठाण,पोकॉ/ सुनील दिघे,पोकॉ/ईप्तीकार सय्यद यांनी केली आहे.


कर्जत प्रतिनिधी – सर्वसामान्य नागरीकांवर दहशत करून शिवीगाळ करणे,मारहाण करणे, अल्पवयीन मुलींची छेड काढणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मिरजगावमधील तिघांना कर्जत पोलिसांनी आता चांगलाच दणका दिला आहे.अशा गुन्हेगारांच्या विरोधात आता कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी मोहीम उभारली असून कोणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा अल्टिमेटमच त्यांनी दिला आहे.अविनाश महादेव मराळ (रा.मिरजगाव पिरगल्ली), प्रशांत दामोधर सोनवणे,निलेश कान्हू नवले (दोघे रा.मिरजगाव) कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस हवालदार बबन दहिफळे, प्रबोध हांचे, रवी वाघ, जितेंद्र सरोदे आदींनी ही कारवाई केली आहे.तिघां आरोपींवर विविध कलमान्वये कारवाई करून कर्जत पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.विशेष म्हणजे या तिघांमधील एक आरोपी गेली दीड वर्षांपासून फरार झाला होता. त्यास देखील कर्जत पोलिसांनी अटक केली असून तो मागील दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला अविनाश महादेव मराळ (रा.मिरजगाव पिरगल्ली) हा विनाकारण त्रास देत होता. मुलगी ही आपल्या घरासमोरून जात असताना आरोपीने तिची गाडी थांबवून तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने तो तिला ओरडू नको, नाहीतर मी तुला सोडणार नाही असे म्हणून तो निघून गेला. आरोपी अविनाश मराळ यावर भा.द.वी कलम २२३,३५४ बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.तर करण ईश्वर पवार (रा.मिरजगाव) यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत दामोधर सोनवणे (रा.मिरजगाव) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीची आई मीरा ईश्वर पवार हिस विनाकारण अश्लील शिवीगाळ केली.शिवीगाळ का करतो?,असे विचारल्याने आरोपीला राग आल्याने त्याने त्याने फिर्यादिस शिव्या देत जवळ पडलेला दगड हातामध्ये घेऊन फिर्यादीच्या डाव्या पायावर व पाठीवर मारला.फिर्यादी घाबरून घरात गेला असता आरोपी त्याच्या मागे पळत जाऊन घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची आईमध्ये आली असता तिलाही चापटाने मारहाण करत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. माझ्या नादी लागाल तर कोयत्याने हातपाय तोडीन अशी धमकी दिली.आरोपीवर भादवि कलम ३२४,४५२,३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-शेतातील पाणी वाटपावरून 22 वर्षापूर्वी खून करणारा सुधाकर पुंजाराम ढाकणे (वय 55 रा. ढाकणे वस्ती, शेवगााव) यास न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगत असताना गेल्या आठ वर्षांपासून सुधाकर हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला. तो अक्षयतृतीये सणासाठी आला असता, त्यास पथकाने जेरबंद केले.ढाकणेवस्ती येथे राहणारे सूर्यभान मोहन ढाकणे आणि सुधाकर पुंजाराम ढाकणे यांच्यात शेतातील पाणी वाटपाचे कारणावरून वाद होत होते. सुधाकर याने या वादातून 21 डिसेंबर 1998 रोजी सूर्यभान यास चाकुने वार करून जखमी केले होते. जखमी सूर्यभान यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे उपचारा दरम्यान अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. या गुन्ह्यात खुनाचे वाढील कलम लावण्यात आले होते.अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. आरोपी सुधाकर पुंजाराम ढाकणे याच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.सुधाकर याने शिक्षेविरूध्द औरंगाबाद खंडपीठात आपिल दाखल केले होते. खंडपीठात 28 जुलै 2014 रोजी आपिलात जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती. तो तेव्हापासून फरार होता. उच्च न्यायालयाने आरोपीचा शोध घेण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिला होता. पोलीस निरीक्षक अनिल कटके विशेष पथकाची स्थापना केली होती.आरोपीचे मूळ गावी शेवगाव येथे जाऊन माहिती घेतली असताना तो पुणे किंवा मुंबई येथे राहत आहे. तो वारंवार वास्तव्याचे टिकाणे बदलून राहतो, अशी माहिती मिळाली. खबर्‍याकडून माहिती मिळाली की, तो अक्षय तृतीयाचे दिवशी वडिलांचे पित्र जेवू घालणे करिता आलेला आहे. परंतु, तो घरात थांबत नसून शेतात लपवून राहत आहे. अक्षय तृतीयेचा कार्यक्रम होताच पळून जाण्याच्या तयारीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शेतात लपलेल्या अवस्थेत पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, दत्तात्रय गव्हाणे, फकीर शेख, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget