Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना  गुप्त बातमी दारा मार्फत माहीती मिळाली की , पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव पंचम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगर येथे एक इसम हा महाराष्ट्र राज्यात सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ कब्जात बाळगणे तसेच विक्री करण्यास प्रतिबंध असतांनातयार मावा विक्री करत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती त्यांना मिळाली होती  कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या आदेशाने पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे हे पथक केडगाव येथील पंचम पान शॉपी मधुन लोकाना पैसे घेवून त्याना पुडी देताना दिसला  २१/३० वा सुमारास छापा टाकुन त्यास पंचम पान शॉप पान टपरी मध्ये बसलेल्या इसमास जागीच पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर असे सांगीतले त्याच वेळी तेथे एका मोपेड गाडीवर काळे रंगाच्या मोपेड गाडीवर एक इसम पांढरे रंगाची मोठी पिशवी घेवून पंचम पान शॉप जवळ आला त्या वेळी तात्काळ सदर इसमास पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर असे सांगीतले व  जवळील पिशवी मध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली आहे ती मशीनवर मावा बनवणे कामी सागर सहाधु कोतकर यांचे जवळ आलो आहे असे सांगीतले त्या वरुन सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांचे कडे सुगंधीत तंबाखु व  माल  अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर यांचे कडुन विकत घेतो असे सांगीतले त्यानंतर सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांनाझडतीचा उददेश समजावुन सांगुन त्याची व पंचम पान शॉप टपरीची व काळे रंगाच्या मोपेड गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुददेमाल मिळुन आला तो १ ) २०,००० / - रु किंमतीचे एक मावा बनविण्याचे लोखंडी मशीन व २ एचपी ची मोटार असलेली जु.वा. कि . अं . ( पंचम पानटपरी मध्ये मिळुन आली ) २ ) १,५०० / - रु किंमतीची एका पांढरे रंगाच्या गोणी मध्ये ३ किलो सुट्टी सुगंधी तंबाखुप्रती ५०० रु किलो दरा प्रमाणे किं . अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ३ ) १२०० / - रु किं ची बारीक कापलेली कत्री ( तुकडा ) सुपारी २ किलो अंदाजे प्रती प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ४ ) ६०० / - रु किंमतीचा तयार केलेला सुगंधीत मावा त्याचे वजन अंदाजे १ किलो व प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ५ ) ७५० / - रु किं ची विमल पान मसाला केसर युक्त असे छापलेला हिरवे रंगाचा पाकीटात प्रती पाकीट छापील दर १ ९ ८ रु व विक्री किंमत २५० रुपये प्रमाणे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) 10५ ) ४०,००० / - रु किं ची एक काळ रंगाची सुझुकी एक्सेस मोपेड मोटार सायकल तीच्या पाठीमागील बाजुस MH १६ CN ४ ९ ४ ९ असा क्रं असलेली जुवाकिअं ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कवज्यात मिळुन आली ) ६ ) ६,००० / - रु किंची सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली अंदाजे १० किलो वजनाची प्रती किलो ६०० रु दरा प्रमाणे ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कबज्यात मिळुन आली ) एकूण ६ ९ , ३०० / किमतीची सुगंधीत तंबाखु व मावा बनविण्याचे मशिन इसम नामे सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्यानेतसेच आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या ताब्यात वरिल मोपेड गाडी व एकत्र केलेली सुपारी सुगंधीत तंबाखु व सुपारी असे मिळुन आल्याने त्याचा पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे यांनी सदरचा  मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे . २१/३० वा सुमारास पचंम वाईन्स समोरील पंचम पान शॉपी केडगाव अ.नगरयेथे इसम नामे १ ) सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर २ ) विशाल संतोष भगत वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर ३ ) अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर ( फरार ) यानी महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होवुन दुखापतीची शक्यता आहे असा सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ खाण्यासाठी अपायकारक आहे हे माहीत असतांनाही देखील त्यानी त्याची विक्री करण्याचे उददेशाने स्वताच्या कब्जात मावा बनविण्याचे मशिन व सुगंधीत तंबाखु , सुपारी , तयार मावा बाळगतांना मिळुन आला आहे . पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांनी त्याचे विरुध्द भा.द.वि.कलम ३२८,१८८ , २७२,२७३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे . सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे या पथकाने ही कारवाई केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.



श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख -आगदी १५००ं वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक (ईश्वरा),अल्लाहाची शिकवण देवून फक्त एकच  अल्लाहा समस्त सृष्टीचा नायक  आहे,एकाच अल्लाहाची प्रार्थना करा.कोणीही व्यक्ती शुद्र-उच्च-नीच नाही,कोणीही काळा - गोरा नाही, सर्व मानव जात ही एकच अल्लाहाची लेकरे आहोत ती मग ती शुद्रही असेल ती सुध्दा इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज ईस्लामने नाकारला,

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान म्हणजे फक्त धार्मिक ज्ञान असणं हे ईस्लाम मानत नाही,उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर इ.आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली.चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत देश होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी "तुम्ही चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी चिनला जा असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

अल्लाह समोर  मानव एकसमान आहेत,आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो राज कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच त्यांनी नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून दिले, समतेचा संदेश देणारा ईस्लाम व पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.हेच.आपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून मानसाला मानसाप्रमाणे कसे वागवावे याची दिशा दाखवून दिली .

 त्याकाळी अरब देशात काळा - गोरा हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता, काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,ती गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोऱ्यांचा भेदभावच नष्ट केला.

हजरत बिलाल या आफ्रिकन निग्रो (त्याकाळी गुलाम,तुच्छ समजले जाणारे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून नंतर मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देत  समस्त जगाला दाखवून दिले की, कोणीही अपवित्र नसते. इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहा (इश्वर) ची  संतान आहेत. सर्व रंगाचे, वर्णाचे, वंशाचे,एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला, 

तसेच स्त्रियांना, वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे,तो हक्क देणारा जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. विश्वातील पहिला घटस्फोटीत, विधवा,महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला.

 भारतात आजही घटस्फोटीत विधवा महिलांसाठी समाजातील विविध ठिकाणी स्थान नाही, आजही घटस्फोटी महीलांना वेगवेगळ्या भावनेने बघितले, वागविले जाते,इस्लामने १४०० वर्षांपासून घटस्फोटीत,विधवा, महिला विवाहाला चालना देऊन त्या महीलांना मान- सन्मान मिळवून दिला.आजही इस्लाममधे घटस्फोटीत विधवा महिलांसाठी पुनर्विवाह लावून त्यांचा मान सन्मान केला जातो. स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली,पवित्र कुराणात सांगितले की,जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा.तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागल्या,हे आम्ही काय मोठे पातक केलेत म्हणून,

प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी,मनुष्याने प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण,संगोपन करून नंतर उत्तम वर बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस मधे (स्वर्गात) महाल भेटेल व ज्या व्यक्तींना दोन,तीन पेक्षाही अधिक मुली असेल, त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे शिक्षण संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नतुल फिरदौसमधे (स्वर्गात) माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल,

अशाप्रकारे त्यांना सत्य आणि वास्तविकतेचे दर्शन घडवत,तथा अल्लाहा (इश्वर) कडे प्रियजन होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे सांगितले.यामुळे ज्यांच्या घरात मुली होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर हसु दिसून,त्यांचे चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून शपथेवर "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही,चोरी,व्यभिचार करणार नाही,मुलींची,कन्यावध करणार नाही.( हादीस - सहीह - बुखारी ).या सर्वांचा परिणाम खुप जबरदस्त झाला .स्वतः ही घटस्फोटीत विधवा बरोबर विवाह करून चार मुलींचे पालनपोषण संगोपन करून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. 

दहा मोहर्रमला सर्व जगात करबलाचा "यौमे शहीद" दिवसांच्या आठवणी जाग्या होतात आशा समस्त मानव कल्याणासाठी आपल्या परीवारासह एकूण ७२ लोकं शहीद झालेले हजरत हुसैन रजि.हे सर्वात लहान आवडती कन्या हजरत फातिमा रजि.यांचे मुलं, प्रेषित मुहम्मद स्व.यांचे (मुलीचा मुलगा) आवडते नातु होते.

स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत त्या शिकल्या पाहिजेत हे प्रेषितांनी दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्तीतुन, पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहे, हा क्रांतिकारी विचार प्रेषितांनी अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम (पुढील वर्षी  महानिर्वाण झाले)  प्रवचनात (भाषणातून) महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले,बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा,कठोर निष्ठुर होवू नये,त्यांच्या प्रती दयाळु रहा,तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर तीची काळजी घ्यावी,पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे, तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे ,तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका,तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या) दिवशी अल्लाहा समोर आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

(अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली),

प्रेषित  स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिले "व कायम असे म्हणत की मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेखबैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४

श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख - आल्लाहाचे  प्रेषित मुहम्मद सल्ल.म्हणतात की" कामगारांची मजुरी त्याच्या घाम   सुकण्याआधी चुकती करा,अदा  (देऊन टाका) करावी (इब्ने - माझा हा.नं. २४४३),अबू -हुरैरा रजि. म्हणतात की, "हजरत मोहम्मद सल्ल.सांगतात की कायामतच्या दिवशी अल्लाहा  त्या माणूष्याशी नाराजी करेल ज्या मनुष्याने एखाद्या मजूर कामगारांकडून दिवसभर मजूरी - काम करुन घेतले आणि त्याने केलेल्या मजुरी कामाचा   मोबदला दिला नाही "''(सहीह बुखारी २२२७ ,ईबने माझा २२४७),१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस,महाराष्ट्रचा "महाराष्ट्र दिन" महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळेस मुंबई ही महाराष्ट्रातच रहायला हवे यासाठी  १०५ (एकशे पाच) लोकांनी हौतात्म्य पत्कारत आपले बलिदान दिले,आपण या हुतात्म्यांना मानवंदना देऊन  महाराष्ट्रदिन पाळतो,१ मे हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष म्हणजे जगभरातील ८० अंशी पेक्षा अधिक देशांमध्ये एक मे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशी हा  दिन येतो . खास म्हणजे हा दिवस शिकागोमध्ये ४  मे १८८६  मध्ये घडलेल्या हे Hey हे  मार्केट दुर्घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी ,साम्यवादी विचारसरणीचे पक्ष साजरा करतात.१४४०  चौदाशे वर्षांपूर्वी  अरबस्तानात अमानवी  ,रानटी ,क्रुर अशा अनेक  अमानुष  प्रथा अशी पद्धतीने गुलामगिरीची पद्धत, शोषण पद्धती होती,  त्याकाळात मजुरांना दिवसभर राबून गुलामाला दिवसभर गुलामी करून रात्री छळ करीत व. रात्रंभर उपाशी ठेवत , उन्हातानात  वाळवंटाच्या वाळूवर भरउन्हात झोपून त्यांची खूप हाल करीत .  त्यांचा मोबदला त्यांना दोन वेळेस जेवण सुद्धा देत नव्हते .जगेल येवढं च अन्न देत फक्त,  कामगारांचा छळ करून त्यांचे अतोनात हाल करायचे.त्याच काळात  प्रेषित हजरत मुहम्मद  स्व.यांनी गुलामगिरी समुळ नष्टच केली,  गुलामांचे व मजुरांचे संपूर्ण हक्क प्रदान करून, गुलामगिरी प्रथा नष्ट करून गुलामाला कामगारांना मजुरांना .ऐक  माणूस म्हणून वागवण्याची  , वागणूक देण्याची प्रथा देउन मालकांना   तंबीच दिली.  #   अब्दुल्लाहा बिन उमर  रजि.प्रेषितांचे मित्र म्हणतात की , नबी करीम स्व.यांनी सांगितले की " तुमचे -नोकर -चाकर हे तुमचे बंधू आहेत ,तुम्ही जे -जे जेवण खाता ते त्यांना ही  जेवण  जेवायला घालवा ,'  तुम्ही जे कपडे परीधान करतात , त्यामधुन  त्यांना ही काही तरी  कपडे द्या , त्यांच्यावर आत्याचार करू नका , त्यांना जालीमांच्या हावाली  करू नयेत , जो मनुष्य संकटात आपल्या बांधवाची मदत करतात अल्लाहा करिम त्यांच्या संकटात मदत करतात "'(सहीह बुखारी शरीफ ६०७, २४४२,, ईबने माझा ३६१०, मुस्लिम शरीफ १६६१, ) प्रेषित मुहम्मद सल्ल.  यांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामचे पहिले खलिफा हजरत अबूबकर सिद्दिक रजि.हे  प्रेषित मुहम्मद स्व.यांचे खास मित्र व  सर्वांत अगोदर ईस्लाम कबूल केले व  पहिले खलिफा झाले.त्यांच्या  खलिफा  नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांना त्यांच्या एका मित्रांने विचारले की, #  "तुमची महिन्याची मानधन (पगाराचे ) काय असली  पाहिजे '..       #  त्यावर  खलिफा हजरत अबु -बकर रजी .म्हणतात की , " एका मजुराला दिवसभरात जी मजुरी असेल तेवढी , महिन्याचं मानधन असेल , त्यानंतर त्यांचे  सहकारी म्हणतात की ते मानधनावर तुमचं , उदरनिर्वाह  होईल ,त्यावर हजरत अबु-बकर रजि. म्हणतात की, "  मला जर  कमी पडलं तर मी सर्वप्रथम  दिवसभर मजूर काम करील व  त्यांचा पगार व मजुरी वाढविल त्यानंतर माझं मानधन वाढविल , "'          #   तसेच दुसरे खलिफा हजरत उमर रजि. हे त्यांच्या कार्य काळात , जवळजवळ निम्म्या जगावर राज्य करीत होते . आपल्या सिस्तप्रिय शासनाच्या  कार्यपद्धतीने फार प्रसिद्ध होते ,   त्यांच्या कार्यकाळात त्यांना ही असाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला ,   त्यावर ते म्हणतात ,"    कि यदा कदाचित " दजला " नदी  आहे ,  त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कुत्रा जरी उपाशी मरून पडला तर त्याची जबाबदारी माझीच ".           कुत्र्याची जबाबदारी त्यांची तर ,      ‌‌ते किती मोठे शासक  असतील  ,.  ते कसे शासन करीत असतील ,इस्लामची  मानव कल्याणकारी शिकवण किती मोठी .,, म्हणूनच  इतिहासकार म्हणतात की ,"  इस्लाम  आया ही है  गरीबों, बेबसों ,गुलामों , मजदूरों कों ,लाचारों कों इंसाफ दिलाने के लिए ,.....लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपुर ९२७१६४००१४


.

अहमदनगर प्रतिनिधी- मोपेड दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यातील तीन लाख १५ हजार रुपये रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपी रमेश रामु कोळी (वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश ह. रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) याला २४ तासात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दरम्यान त्याच्या सोबतचा अशोक राम गाजवार (रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश) हा पसार झाला आहे.अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी शुक्रवारी दुपारी त्यांची मोपेड पार्क केली होती. यामध्ये तीन लाख 30 हजाराची रक्कम ठेवली होती. त्यांना ती रक्कम त्यांचे नातेवाईक सुनील कांडेकर यांच्या ऑपरेशनसाठी भरायची होती.दुपारी एक ते अडीच यावेळेत चोरट्यांनी दुचाकी डिक्कीचे लॉक तोडून रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, पोकॉ जालिंदर माने, योगेश सातपुते व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने २४ तासात आरोपीला अटक केले आहे.आरोपी कोळी याच्याकडील तीन लाख १५ हजार रुपये, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


अहमदनगर प्रतिनिधी- चेक बाऊन्स प्रकरणात चार गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले अटक अटक केलेला इसम नामे विजय मुरली नरवाल , रा . सदर बाजार , पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार अहमदनगर याने उसनवार घेतलेल्या ३,४८,००० / - रु.या रकमेसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने सदर इसमा विरुध्द Negotiable Instruments Act १३८ प्रमाणे मा . अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर याचे न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला क्र . १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ , ४ ) ६३७/२०१२ असे चार खटले मा . न्यायालयात चालवुन सदर इसमास खटला क्रमांक १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ यामध्ये एकत्रितरित्या फिर्यादीस ३,४८,००० / - रु . नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सक्षम कारावास भोगण्याचा आदेश करण्यात आलेले आहे . इसम नामे विजय मुरली नरवाला याने मा . न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने त्याचे विरुध्द Conviction Warrant काढुन विशेष पथकामार्फत बजावणी करणे बाबतचे आदेश दिले होते . नमुद आदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली कन्व्हेशन वॉरंट मधील इसमाचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , इसम नामे विजय मुरली नरवाल हा जामखेड रोड येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल फकिर शेख , संदीप घोडके , विश्वास बेरड , दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार , देवेंद्र शेलार , दिनेश मोरे , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक दिपक शिंदे अशांनी मिळुन जामखेड रोड , मुठ्ठी चौक येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेता त्याने त्याचे नाव विजय मुरली नरवाल , वय ३ ९ , रा . सदर बाजार पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार कॅम्प असे असल्याचे सांगितले . नमुद कन्व्हेशन वॉरंटमधील आरोपी हाच असलेबाबत खात्री झ आल्याने त्यास ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील  पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल  अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व  अनिल कातकाडे  , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



अहमदनगर प्रतिनिधी - सोनई येथे राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यात आला आहे. ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ऋषीकेश शेटे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव व चापाहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) व संतोष भिंगारदिवे (रा. घोडेगांव, ता. नेवासा) यांनी आरोपी ऋषीकेश वसंत शेटे

(रा. सोनई, ता. नेवासा) याचे सांगणेवरुन, मागील जुने भांडणाचे कारणावरुन, गैरकायद्याची मंडळी जमवुन भाऊ राहुल जनार्धन राजळे (वय २९, रा. लोहगांव, ता. नेवासा) यास शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरींग व जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या विकास जनार्धन राजळे (वय २७, रा. लोहगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२३ / २२ भादविक ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, ९४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ व मपोकाक ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन विलास शिरसाठ व त्याचा साथीदार संतोष उत्तम भिंगारदिवे अशा दोघांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते.या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेश शेटे हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. पण आरोपी ऋषीकेश शेटे हा त्याचे राहते घरी हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे जाऊन आजुबाजूस सापळा लावून आरोपी शेटे यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सोनई पोलीस ठाण्यात हजर केले.गुन्ह्याचा तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे आहे. त्यांचे कार्यालयातील पोनि विजय क-हे यांनी गुन्ह्याचे तपासात व आरोपी अटकेमध्ये सहकार्य केले आहे. आरोपी ऋषीकेश वसंत शेटे वर या गुन्ह्या व्यतीरिक्त सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करून जातीवाचक शिवीगाळ, जबरी चोरी करुन जातीवाचक शिवीगाळ व दंगा असे एकूण ४ गुन्हे दाखल असुन दोन गुन्ह्यात तो फरार आहे.



श्रीरामपूर-लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-पवित्र कुराण सांगितले की , (१)" पृथ्वीवर सुधारणा घडवून आणा , सुधारणा केल्या नंतर कलह , उपद्रव माजवू नका , अल्लाहा चे भय बाळगुन सत्कर्मे करीत राहा , अल्लाहा सत्कर्म करणाऱ्यां बरोबर आहे "( अल-आराफ -५६).

(२) अगर तुमच्या वर कोणी आक्रमक केले ,तर तुम्ही सुद्धात्यांच्यावर अक्रमण करा , परंतु  त्यांनी केले तितकेच , पण मर्यादित , मर्यादांचे उल्लंघन करू नयेत ,  अल्लाहला मर्यादांचे उल्लंघन करणारे पसंद नाहीत .( अल -बकरा अ.नं. ९४,१९०,).

(३) त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे  कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल.आणि ,त्या ठिकाणांहून त्यांना हाकलून लावा ,जिथून त्यांनी तुम्हाला हाकलून लावले आहेत.(अल- बकराह आ.नं.१९१).

(४) "परवानगी दिली गेली युद्ध करण्याची ,ज्या लोकांवर वर अत्याचार केले गेले आहेत ,कारण ते अत्याचार पीडित आहेत " (सुरह नं.२२ अल- हशर -आ.नं.३९).

     आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री स्वातंत्र्य मिळवून ,देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना दिली  , ती रात्र  ,हो ती रात्र  रमजान मुबारक ची लैलतुल -कद्र ची २७ वी रात्र व दिवस शुक्रवार च  व तराविह मधील खत्मुल कुराण ( समाप्ती) ही होती ..

 दिव्य कुरआन च्या संदेशानुसार एक गोष्ट लक्षात घेतली तर स्पष्ट होते की ,

   आम्ही ज्या मातृभुमी मधे ( वतन ) देशात  राहतात,त्या( भुमीशी ) , देशाशी ,वतनाशी , प्रामाणिक एकनिष्ठ , वचनबद्ध राहावे ..व त्या देशाशी वतनाशी प्राणपणाने लढावे व त्याचा लढता - लढता वीर मरण ( शहीद ) जरी आले तर वीरश्री( शहीदी ) पत्करावे .शहीद जरी झाले तर शहीद व्हावे ....हे पवित्र दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सांगितले आहे ..

" वतनाशी , देशांशी , मातृभूमी साठी मरण आले तर शहीद म्हणून मरताल , संबोधले जातिल.".

प्रेषित मुहम्मद स्व , सांगितले की , " शहीद " हा तात्काळ स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस) मधे मोठं जागा भेटते , " शहीदां" चा रक्ताचा फक्त एक थेंब जमिनीवर पडण्या आगोदर अल्लाहा ( ईश्वर)  त्या व्यक्तीस स्वर्गाचे दरवाजे ताबडतोब उघडताच." . शहीदांना पवित्र दिव्य कुरआन मधे खुप मोठा गौरव पुरस्कार असतो ..असे दिव्य कुरआन व हादिस मधे पुष्कळ ठिकाणी नमुद केलेले आहे.

पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या मातृभुमी (आम्ही त्याला वतनपरस्ती  म्हणतात.) च्या शिकवणीनुसार , भारतीय स्वातंत्र्य चळवळीत , लढ्यात , लाखों मुस्लिमांनी भाग घेतला .भारत मातेच्या रक्षणासाठी लाखों मुस्लिमांनी (बलिदान)शहीद झाले आहेत .

अल्लाह (ईश्वरा)च्या आदेशानुसार मातृभुमी (वतन ) ना जो कोणी अत्याचार करेल , गिळंकृत करेल , लोकांना नाहक बळी,त्रास देतील , नाहक अत्याचार करतील त्यांच्या विरोधात लढुन ,  इंग्रजांच्या अत्याचार , आतोनात त्रासातून मुक्तता करण्यासाठी , 

 अल्लाहा च्या आदेशानुसार बलिदान शहीद झाले तर बक्षीस म्हणून मुस्लिम लोकांनी स्वीकार केला. 

१८५७ च्या पहील्या लढ्याचे नेतृत्व शेवटचे मुघल सम्राट बहादुरशहा जफर यांच्या कडे ,विरगंणा राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे , शिंदे , ई. भारतातील बहुतेक राजांनी त्यांच्या कडे नेतृत्व बहाल केले असताना , त्यांना रगुन जेल मधे काळया पाण्याची सजा सुनावली गेली, त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या दोन मुलांची मुंडके  कलम करुन त्यांच्या समोर आणुन  बहादुरशहा जफर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वारंवार केली परंतु त्या ब्लॅकमेल चा काहीच परिणाम आपल्या वतनपरस्ती ,मातृभुमीसाठी न होता त्यांनी सजा चा स्विकार केला परंतु देशाशी गद्दारी केली नाही .ऱगून मधील जेल मध्येच मृत्यू पत्करला.

.त्यांची इच्छा होती की , मातृभुमीच्या मातीतच  माझा देह  दफन करण्यात यावे ..

 परंतु इंग्रजांनी ही अट मान्य केली नाही ... बहादूरशहा जफर आजही रंगुनच्या मातीत दफन आहेत .मा.राजीवजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्या दफनभूमीतील माती आणुन भारतीय मातीत दफन करून त्यांची इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे... 

अल्लाहा च्या शिकवणीचे महत्व बहादुरशहा जफर यांनी मातृभुमीसाठी " शहीद" होवून जन्नतुल फिरदौस चे हकदार झालेच असतील.

  जालियनवाला बाग च्या  जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडात , मृत्यू मुखी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात  मुस्लिमांची संख्या जास्त प्रमाणात होती .ं

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात, साठ टक्के मुस्लिम मोठ मोठ्या पदावर कार्यरत होते त्या सर्व मुस्लिम सरदारांनी आपल्या राजा बरोबरील वतन परस्ती ईमानदारी ने निभावून शहीद झाले ..

               म्हैसूर येथील टिपु सुलतान हे कट्टर देशभक्ती निभावताना इंग्रजांनीं त्यांना शहीद केले .

           नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौज मधे ही प्रमुख पदाधिकारी बहुतेक मुस्लिम सैनिक होते .

  राजस्थान मधे महाराजा महाराणा प्रताप  , महाराजा पृथ्वीराज चौहान व विविध राजांच्या सैन्यात प्रमुख सरदार हे मुस्लिम होते .

      #हा इतिहास आहे , परंतु मुस्लिम विरोधी इतिहास लेखकांनी मुस्लिम द्वेष फैलावण्यासाठी इतिहास ची मांडणी त्यांच्या पध्दतीने केली असो.

जगातील प्रत्येक देशात जिथे  मुस्लिम स्थानिक आहे त्या प्रत्येक देशात मुस्लिमांनी आपल्या देशाशी वतन परस्ती  प्रमाणिक निभावली आहे .

     भारतीय मुस्लिमांनी  पारतंत्र्यातील इंग्रजांच्या अत्याचाराला ,त्रास ,छळाचा , कडाडून विरोध करून मुह तोड जबाब उत्तर वेळोवेळी देउन इंग्रजांच्या जोखडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी लोखों ,कोटीं मुस्लिमांनी बलिदान देऊन भारतीय मातीतच दफन झाले. आहेत .

    आज  लैलतुल कद्र  २७  रात्र ,व शुक्रवार च्या योगा योगाने , भारतीय स्वातंत्र्यच्या आठवणी जाग्या होऊन .. भारतीय शहीदांना सलाम करावासा वाटतो.

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 9271640014

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget