श्रीरामपुर लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख - आल्लाहाचे प्रेषित मुहम्मद सल्ल.म्हणतात की" कामगारांची मजुरी त्याच्या घाम सुकण्याआधी चुकती करा,अदा (देऊन टाका) करावी (इब्ने - माझा हा.नं. २४४३),अबू -हुरैरा रजि. म्हणतात की, "हजरत मोहम्मद सल्ल.सांगतात की कायामतच्या दिवशी अल्लाहा त्या माणूष्याशी नाराजी करेल ज्या मनुष्याने एखाद्या मजूर कामगारांकडून दिवसभर मजूरी - काम करुन घेतले आणि त्याने केलेल्या मजुरी कामाचा मोबदला दिला नाही "''(सहीह बुखारी २२२७ ,ईबने माझा २२४७),१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस,महाराष्ट्रचा "महाराष्ट्र दिन" महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळेस मुंबई ही महाराष्ट्रातच रहायला हवे यासाठी १०५ (एकशे पाच) लोकांनी हौतात्म्य पत्कारत आपले बलिदान दिले,आपण या हुतात्म्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रदिन पाळतो,१ मे हा जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष म्हणजे जगभरातील ८० अंशी पेक्षा अधिक देशांमध्ये एक मे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशी हा दिन येतो . खास म्हणजे हा दिवस शिकागोमध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हे Hey हे मार्केट दुर्घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी ,साम्यवादी विचारसरणीचे पक्ष साजरा करतात.१४४० चौदाशे वर्षांपूर्वी अरबस्तानात अमानवी ,रानटी ,क्रुर अशा अनेक अमानुष प्रथा अशी पद्धतीने गुलामगिरीची पद्धत, शोषण पद्धती होती, त्याकाळात मजुरांना दिवसभर राबून गुलामाला दिवसभर गुलामी करून रात्री छळ करीत व. रात्रंभर उपाशी ठेवत , उन्हातानात वाळवंटाच्या वाळूवर भरउन्हात झोपून त्यांची खूप हाल करीत . त्यांचा मोबदला त्यांना दोन वेळेस जेवण सुद्धा देत नव्हते .जगेल येवढं च अन्न देत फक्त, कामगारांचा छळ करून त्यांचे अतोनात हाल करायचे.त्याच काळात प्रेषित हजरत मुहम्मद स्व.यांनी गुलामगिरी समुळ नष्टच केली, गुलामांचे व मजुरांचे संपूर्ण हक्क प्रदान करून, गुलामगिरी प्रथा नष्ट करून गुलामाला कामगारांना मजुरांना .ऐक माणूस म्हणून वागवण्याची , वागणूक देण्याची प्रथा देउन मालकांना तंबीच दिली. # अब्दुल्लाहा बिन उमर रजि.प्रेषितांचे मित्र म्हणतात की , नबी करीम स्व.यांनी सांगितले की " तुमचे -नोकर -चाकर हे तुमचे बंधू आहेत ,तुम्ही जे -जे जेवण खाता ते त्यांना ही जेवण जेवायला घालवा ,' तुम्ही जे कपडे परीधान करतात , त्यामधुन त्यांना ही काही तरी कपडे द्या , त्यांच्यावर आत्याचार करू नका , त्यांना जालीमांच्या हावाली करू नयेत , जो मनुष्य संकटात आपल्या बांधवाची मदत करतात अल्लाहा करिम त्यांच्या संकटात मदत करतात "'(सहीह बुखारी शरीफ ६०७, २४४२,, ईबने माझा ३६१०, मुस्लिम शरीफ १६६१, ) प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामचे पहिले खलिफा हजरत अबूबकर सिद्दिक रजि.हे प्रेषित मुहम्मद स्व.यांचे खास मित्र व सर्वांत अगोदर ईस्लाम कबूल केले व पहिले खलिफा झाले.त्यांच्या खलिफा नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांना त्यांच्या एका मित्रांने विचारले की, # "तुमची महिन्याची मानधन (पगाराचे ) काय असली पाहिजे '.. # त्यावर खलिफा हजरत अबु -बकर रजी .म्हणतात की , " एका मजुराला दिवसभरात जी मजुरी असेल तेवढी , महिन्याचं मानधन असेल , त्यानंतर त्यांचे सहकारी म्हणतात की ते मानधनावर तुमचं , उदरनिर्वाह होईल ,त्यावर हजरत अबु-बकर रजि. म्हणतात की, " मला जर कमी पडलं तर मी सर्वप्रथम दिवसभर मजूर काम करील व त्यांचा पगार व मजुरी वाढविल त्यानंतर माझं मानधन वाढविल , "' # तसेच दुसरे खलिफा हजरत उमर रजि. हे त्यांच्या कार्य काळात , जवळजवळ निम्म्या जगावर राज्य करीत होते . आपल्या सिस्तप्रिय शासनाच्या कार्यपद्धतीने फार प्रसिद्ध होते , त्यांच्या कार्यकाळात त्यांना ही असाच प्रकारे प्रश्न उपस्थित केला , त्यावर ते म्हणतात ," कि यदा कदाचित " दजला " नदी आहे , त्या नदीच्या किनाऱ्यावर एक कुत्रा जरी उपाशी मरून पडला तर त्याची जबाबदारी माझीच ". कुत्र्याची जबाबदारी त्यांची तर , ते किती मोठे शासक असतील ,. ते कसे शासन करीत असतील ,इस्लामची मानव कल्याणकारी शिकवण किती मोठी .,, म्हणूनच इतिहासकार म्हणतात की ," इस्लाम आया ही है गरीबों, बेबसों ,गुलामों , मजदूरों कों ,लाचारों कों इंसाफ दिलाने के लिए ,.....लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपुर ९२७१६४००१४
.
Post a Comment