Latest Post

रामगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व  मराठी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी, चित्रकला ,नींबू चमचा,धावणे स्पर्धात विजेते,त्यानिमित्ताने त्यांना प्रमाणपत्र,मेडल,वितरण करण्यात आले,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद नवले  ,बेलापूर ग्रामपंचायत सरपंच ,महेंद्र साळवी ,बेलापूर पोलीस स्टेशनचे ,पोलीस नाईक, ढोकणे दादा, महावितरणचे, जाधव साहेब ,केंद्रप्रमुख, राजाबाई कांबळे मॅडम, मुख्याध्यापक अनिल ओहोळ सर ,गोखलेवाडी, ग्रामपंचायत सदस्य,  मुस्ताक शेख ,भैया भाई ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,हरिहर नगर मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब होते , या कार्यक्रमात स्पर्धेत प्रथम क्रमांक येणारे  मराठी शाळेचे विद्यार्थी, धावणे स्पर्धेसाठी, फिरोज शेख अतिश बबन लगे ,चमचा लिंबू स्पर्धा, धावणे प्रथम ,तयबा गुलाब शेख ,सार्थक मिथुन दोडके, असद जावेद शेख ,तेजल संतोष जाधव ,चित्रकला स्पर्धा ,आयशा वाहिद शेख, तेजल संतोष जाधव ,मुन्नी मकसूद शेख ,संगीत खुर्ची, इरम नवाज शेख, सारा मोसिम शेख ,हुमेरा मुस्ताक बागवान, अलीम निसार बागवान, स्मार्ट स्टुडन्ट विजेते ,हुजेब फिरोज शेख ,तोसीन नवाज शेख, श्रद्धा शाम जाधव, साद  नदीम शेख, तसेच उर्दू शाळेचे विद्यार्थी ,धावणे स्पर्धा, तालीबअसलम शेख, जैद अजीम बागवान,  चमचा लिंबू स्पर्धा, जैदआरिफ बागवान, शोयबअजिम शेख,  चित्रकला स्पर्धा ,आरिफ बागवान  आयशा नजीर शेख, रेश्मा आरिफ शेख, शिक्षक स्टॉप ,मराठी शाळा, कारले सर ,जरे मॅडम तसेच उर्दू शाळेचे शिक्षक , शाळेचे मुख्याध्यापक इमाम सर, आकील सर, हूर बानो मॅडम, समिना मॅडम,   आमिनामॅडम,  बक्षिसे विशेष सहकार्य ,बक्षिसे (प्रमाणपत्र,मेडल,)वाटणे कामी  शा,व्यवस्थापण समीती,चे  श्री समद शेख ,विद्यार्थ्यांना खाऊ केळी वाटपासाठी योगदान ,श्री गणेश शिंदे, विद्यार्थांना पाणी जार, सद्दाम जाकीर शेख, सर्व सदस्य व्यवस्थापन समिती हरिहर नगर  मराठी व उर्दू शाळा, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार शफिक शेख, पत्रकार कासम शेख ,व रामगड ग्रामस्थ आदी उपस्थित होते,

बेलापुर  (प्रतिनिधी  )-त्याग संयम प्रेम करुणा शील सदाचार सत्य व अहींसा याचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तिर्थकर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती बेलापूरात मोठ्या उत्सहात संपन्न झाली सकाळीच जैन स्थानकापासुन मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला पुरुषांनी एक सारखा गणवेश  व महीलांनी एका रंगाच्या साड्या परिधान केल्येल्या साड्या यामुळे कोरोनानंतर दोन वर्षांनी निघालेली ही मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली झेंडा चौकात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर गावातून ही मिरवणूक पुन्हा जैन स्थानकात आली तेथे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक बाजारा समीतीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड विलास मेहेत्रे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी संतोष डाकले व

अजय डाकले परिवाराच्या वतीने पक्षाकरीता  पाणी व दाणे ठेवण्याकरीता पात्र भेट देण्यात आले .महावीर जयंती निमित्त आर्य अनिल डाकले व जान्हवी अतिश देसर्डा यांनी नृत्य व गीत सादर केले तर पुर्वा मुथा दिव्या लुक्कड काव्या लुक्कड विधी लुंक्कड गौरव ललवाणी तिर्थ कोठारी आरण लुक्कड आदित्य लुक्कड यांनी भगवान महावीर जयंती निमित्त मनोगत व्यक्त केले या वेळी सुवालाल लुक्कड किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शातीलाल हिरण विजय कटारीया अजय डाकले सुभाष मुथा सचिन कोठारी बाळू संचेती प्रकाश देसर्डा प्रविण लुंक्कड संतोष ताथेड प्रमोद बोरा अमित लुक्कड शितल गंगवाल डाँक्टर गंगवाल हेमंत मुथा गणेश संचेती आदिसह आनेक बांधव उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-तालुक्यातील उक्कलगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी मध्यरात्री येथील प्रगतशिल शेतकरी आबासाहेब सोन्याबापू थोरात यांच्या पटेलवाडी जवळील वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून त्यांच्या दोन शेळ्या व एका गिर जातीच्या कालवडीला ठार केले.दरम्यान ही घटना ताजी असतानाच परवा पुन्हा बिबट्याने सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान याच वस्तीवर हल्ला चढवून आबासाहेब सोन्याबापू थोरात यांचा नातू शुभम संदीप थोरात यास चावा घेऊन जखमी केले. मात्र शेतातील महिलांचा आरडाओरडा व प्रसंगावधान राखत शुभमने सावध पवित्रा घेतल्याने तो बालंबाल बचावला.त्याच्यावर शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी वनक्षेत्रपाल यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन मृत शेळ्या व वासरांचा पंचनामा केला असला तरी मुलावर हल्ला झाल्यानंतर मात्र वनखात्याचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही.जखमी शुभमला ताबडतोब लस देणे आवश्यक असताना स्थानिक पातळीवर कुठेही लस उपलब्ध झाली नसल्याचे समजते. या भागात द्राक्ष बागा आणि उसाचे मोठे आगार असून बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यातच ऊसतोड होत असल्याने बिबटे मानवी वस्तीकडे कूच करत आहेत. हे बिबटे संख्येने तीन पेक्षा अधिक असून त्यांचा सातत्याने याच भागात वावर असल्याने या भागात त्वरित पिंजरा लावून हे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-सण- उत्सव काळात सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करून अफवा पसरविल्या जात असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात जिल्ह्यामध्ये विविध सण उत्सव साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये काही चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात अयोजित पत्र परिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले की, जिल्ह्यात येत्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, महावीर जयंती आदी विविध सण- उत्सव साजरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी नेवासा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. असे प्रकार आढळल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रामनवमी उत्सवादरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून, गुंडांविरोधातही कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यासंदर्भातही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी कुठलेही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नयेत. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणे, त्याला लाईक करणे, कमेंट करणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजकंटकांनी एकत्र येवून तेढ निर्माण होणारे व्हिडिओ तयार केले तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. समाजात काही अफवा निर्माण झाल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. नागरिकांनी अफवांवरती विश्‍वास ठेऊ नये.


बेलापूर(प्रतिनिधी)ःयेथील अभिषेक देविदास देसाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जलसंधारण अधिकारी (वर्ग २)पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.                              श्री.अभिषेक देसाई हे ज्येष्ठ पञकार बिनदास न्युज 24 चे उप संपादक व बेलापूर पञकार संघाचे सचिव देवीदास देसाई यांचे चिरंजीव आहेत.श्री.अभिषेक हे नुकतीच जलसंधारण अधिकारी (वर्ग२)पदासाठी माहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.त्यात त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. त्यांच्या या यशाबद्दल बिनदास न्युज 24 चे संपादक तसेच महाराष्ट्र लघु व्रत्त पत्र व पत्रकार संघ ईलेक्ट्राँनिक मिडिया चे जिल्हाध्यक्ष आसलम बिनसाद व महाराष्ट्र बेलापूर पञकार संघाचेवतीने सर्वश्री भास्कर खंडागळे ,सुनिल मुथा,रणजीत श्रोगोड,मारुती राशिनकर,सुनिल नवले,ज्ञानेश्वर गव्हले,नवनाथ कुताळ,अरविंद शहाणे,दिपक काळे,राम पोळ,भिमराज हुडे,सदाशिव नागले,दिपक क्षञिय,रुपेश सिकची,शरद पुजारी, आदिंनी अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी -श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीच्या सहायााने हत्या केली. तसेच चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने फास देवून हत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नाराधम माणसाने घरगुती वादातून काल सकाळी त्याची पत्नी अक्षता (वय 35) हिच्या डोक्यात कुदळीच्या वार करून तिची हत्या केली. तसेच मुलगा शिवतेज (वय 4 वर्ष) याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले रामनवमी या पवित्र दिनी दोन जणांची हत्या केल्यामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ माजली असून समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

नेवासा  प्रतिनिधी -नेवासा शहरात रामनवमीच्या  पूर्वसंध्येला निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुण झेंडा फडकवत असल्याने समोरासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीला गालबोट लागले असल्याने राम भक्तांमधून संताप व्यक्त केला गेला. काही वेळानंतर पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला सदरील प्रकाराबाबत पोलीस हवालदार तुळशिराम भानुदास गिते (वय ५१) यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि. ९ रोजी नेवासा शहरात शोभा यात्रेमध्ये रात्री १००० ते १२०० लोक हजर होते व डिजे लावण्यात आलेला होता. सदर शोभायात्रेबाबत आयोजक मनोज पारखे यांना शोभायात्रेची परवानगी घेतली किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले, सदर शोभायात्रेचे आयोजक अंकुश पंढरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप इ. असल्याचे सांगितले. सदर शोभायात्रेमध्ये स्थावरती प्रभू रामचंद्राचा फोटो लावण्यात आलेला होता. शोभायात्रा एसटी स्टॅण्ड येथून खोलेश्वर गणपतीकडे घेवून जात असताना रस्त्याच्या उत्तरेकडीलबाजूस असलेल्या किस्मत टी व ज्युस या दुकानासमोरील रस्त्यावर काही मुस्लीम तरुण हातामध्ये हिरव्या रंगाचे कापड बांबूला बांधून जोरजोराने हालवत होते. ते पाहुन शोभायात्रेतील हिंदू तरुण त्यांचेकडे धावत जाऊन वाद घालू लागले तेवढ्यात मी व इतर स्टाफ तेथे पोहचलो. झेंडा घेतलेल्या मुलांना मी ओळखले. ते रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार हे होते. आम्ही त्या मुलांचे हातातून झेंडा काढून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मला धक्काबुक्की केली म्हणून मी माझे मोबाईलमधून त्यांचे चित्रण करीत असताना त्या तरुणांपैकी रेहान शेख याने माझा मोबाईल हिसकावून घेऊन मोबाईल फोडून नुकसान केले व माझे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. त्यानंतर ते सर्वजण तो झेंडा घेऊन तेथून पळून गेले. त्यावेळी मला समजले की जमावातील कोणीतरी अल्ताफ ख्वाजा बागवान (वय १५) रा. लक्ष्मीनगर नेवासा यास कोणीतरी काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले असून त्यास काही लोक परस्पर दवाखान्यात घेऊन गेले आहेत. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर जोरदार गोंधळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दुकानादारांनी आपआपली दुकाने भितीने बंद केली. त्याचवेळी रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने व रस्त्यावरील लोक यांचेमध्ये प्रचंड पळापळ झाली त्यानंतर पोलिसांनी जमलेल्या जमावाला तेथून पांगवले आयोजक मनोज पारखे, अंकुश पंढुरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप यांनी विनापरवाना श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रा काढून त्यामध्ये डीजे लावण्यात आला तसेच इसम नामे रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून हिरव्या रंगाचा झेडा फडकावून सार्वजनीक रस्त्यावर हिंदू समाजातील तरुणाबरोबर वाद निर्माण केला व मी सरकारी कर्तव्य करत असताना माझे बरोबर वाद घालून धक्काबुक्की केली तसेच माझा मोबाईल फोडून नुकसान केले आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणला तसेच हिंदू समाजातील ओंकार जोशी, दीपक परदेशी, कष्णा डहाळे, बाळासाहेब कोकणे व इतर ६० ते ७० लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर गोंधळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३, ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ३२३, १८८ सह क्रिमीनल अमनमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत. सदरील घटनेनंतर शहरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget