Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार असुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे अवाहन मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे .मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर तालुक्यामध्ये शासकीय विश्रामगृह येथे मनसेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली होती या प्रसंगी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की राज  ठाकरे यांच्या आदेशाने व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर  यांच्या सूचनेने नगर जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेण्याचे काम आम्ही चालू केली आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे काम केले जाईल  येत्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मोठ्या ताकतीने पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम जिल्ह्यातील आम्ही तिन्ही जिल्हाध्यक्ष करत आहोत तसेच श्रीरामपूर तालुक्यामध्ये पक्ष स्थापनेपासून आम्ही काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे गेलो व पक्षाचे काम जोमाने करत आहोत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या सुखात दुखात आम्ही सहभाग घेत असतो  श्रीरामपूर मध्ये मोठे संघटन तयार झाले आहे तसेच प्रत्येक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढलो परंतु पराभवाला सामोरे जावे लागले तरीही नाराज न  होता आम्ही काम करत राहिलो नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये उमेदवार निवडून आले ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता आली राज ठाकरे साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे संघटनेच्या वतीने केले जात आहे , विविध विषय घेऊन  रास्ता रोको मोर्चे अशा विविध प्रकारचे आंदोलने केलेली आहे व हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत असतो व लव जीहाद च्या विरोधात सातत्याने आवाज उठवण्याचे काम आम्ही केलेले आहे  असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे याप्रसंगी म्हणाले या आढावा बैठकी च्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ हे होते तर दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होते त्यांनी उपस्थित असलेल्या  सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून पक्ष संघटन कसे वाढवावे येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तयारी करून सर्व निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी काम करावे याचे मार्गदर्शन केले व कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले उमेदवार निवडूनच आले पाहिजे असे आदेश दिला व येत्या 13 तारखेला नगर येथे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेबांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले

आढावा बैठकीचे नियोजन  जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर,  उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष मनविसे अक्षय सूर्यवंशी कामगार सेना तालुका अध्यक्ष प्रवीण रोकडे यांनी केले होते 

याप्रसंगी बबन महागडी भास्कर सरोदे दीपक सोनवणे मनोज जाधव राजू शिंदे संतोष भालेराव लखन कडवे गणेश राऊत लक्ष्मण लोखंडे अनिल शिंदे दादासाहेब बनकर रोहित जवंजाळ आकाश कापसे सचिन धोत्रे प्रवीण कारले महादेव वहाळ समर्थ सोनार संदीप विषांबर अमोल साबणे निलेश सोनवणे ईश्वर जगताप किरण रणवरे महेश कोलते लक्ष्मण लोखंडे सोमनाथ कासार रतन वर्मा निकेतन रोकडे ज्ञानेश्वर काळे अभंग चेतन दिवटे अक्षय अहिरे संतोष आवटी नितीन खरे अनिल बोरुडे दीपक लांडे अनिल शिंदे लक्ष्मण शिंदे रामदास फिलगर सुदाम गायकवाड

 लखन शिंदे प्रथमेश गायकवाड सुमित गोसावी ओमकार अनाप संदीप देठे सुधीर मोठे कृष्ण पठारे गणेश पठारे नंदू भुजबळ किशोर थोरात रोहित वेताळ कुंदन वेताळ अक्षय गुजर राहुल शिंदे विकी शिंदे अतुल खरात आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते

नवी दिल्ली वृत्तसंस्था-ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने ट्विट करून शोक व्यक्त केला. तसेच काही परदेशी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमकडूनही एक स्टेटमेंट जारी करून याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.शेन वॉर्नच्या बाबतीत एक विचित्र बाब म्हणजे त्याने जे शेवटचं ट्वीट केलं, ते एका माजी क्रिकेटरच्या मृत्यूचं होतं.रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं. त्याच्या आत्म्यास शांती लाभो असं ट्वीट शेन वॉर्नने निधनाच्या १२ तास आधी केलं होतं. पण दुर्दैव म्हणजे, त्याच सायंकाळी शेन वॉर्नचे दु:खद निधन झाले.शेन वॉर्न हा त्याच्या व्हिलामध्ये तो उपचारादरम्यान प्रतिसाद देत नव्हता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही त्याला पुनरुज्जीवित करता आले नाही, असे त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. तसेच, शेन वॉर्नबद्दल सेहवाग शोक व्यक्त करताना म्हणाला, विश्वास बसत नाही. जगातील दिग्गज फिरकीपटू, सुपर स्टार शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-सत्तेतून पैसा व पैशातून राजकारण हि विरोधकांची निती आहे. संस्थांच्या बेकायदेशीर कामातून विरोधकांनी मोठी माया कमविली असून त्याचा वापर राजकारणासाठी सत्तेसाठी  केला जात असुन ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा . असे अवाहन  संस्थेचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे व भास्कर बंगाळ यांनी केले आहे .    प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खंडागळे व बंगाळ यांनी पुढे म्हटले आहे की  ,जेथे जावू तेथे खाऊ हे विरोधकांचे  धोरण आहे.आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देवून टक्केवारी करायची  व आपला स्वार्थ साधायचा हे यांचे उद्योग आहेत.सोसायटीच्या पेट्रोल पंपाचा घोटाळा सभासदांना ठाऊक आहे.याबाबत श्री.शरद नवले यांनी तक्रार केली होती.त्याची चौकशीही झाली.चौकशीत पेट्रोल व डीझेल घटीबाबतचे आरोपात तथ्य असल्याचे आढळले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,श्रीरामपूर यांनी २६/१०/२०१८ रोजी याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावली.त्यात पेट्रोल व डीझेल घटीमुळे एकुण ५लाख १ हजार ३७८इतके आर्थिक नुकसान झाले.तसेच संस्थेच्या स्वस्त धान्य दुकान नं २०/१ व नं ९४/२ मध्ये हमालीसाठी एकुण रु.८४,९८९आणि वाहतुक खर्चापोटी एकुण ५३,८१०खर्च बेकायदेशीर दाखविला.सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८(अ) नुसार कारवाई कां करु नये असे स्पष्ट नमूद केले होते.पुढे हे प्रकरण राजकीय दबाव आणि तडजोडी करुन मिटविले.तथापि या प्रकरणी श्री.शरदराव नवले यांनी सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील केलेले आहे कोरोनामुळे खटला चालला नाही नाहीतर केव्हाच कारवाई झाली असती  सदर प्रकरण मिटलेले नाही चूकीच्या कामाची वसुली केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही .सत्ताधा-यांनी आपण साव  असल्याचा आव आणू नये.प्रत्येक ठिकाणी  नाममाञ सरपंच , चेअरमन निवडायचे.त्यांना नाममात्र ठेवायचे अन काम मात्र आपण उरकायचे नावापुरते व सह्यापुरते त्यांना ठेवायचे आणि कारभार माञ रिमोट कंट्रोलने चालवून वेगवेगळे उद्योग करायचे आणि परस्पर मलिदा लाटायचा हि यांची कार्यपध्दती आहे.याच कमाईच्या जोरावर निवडणुकीत पैसे उधळायचे अन मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करायचा पण  तुमच्या काळ्या पिशवीला अन बाकीच्याही प्रलोभनाला मतदार भुलणार नाही हे ग्रामपंचायत निवडणूकीत दाखवून दिले आहे आता सोसायटीतही तेच होणार आहे काही लोक स्वंयः घोषीत नेते होतात जे नेते आहेत तेच निवडणूक लढवितात ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाते ते नेते असतात उमेदवार नसतात हे ही यांना माहीत नाही अशा मतलबी नेत्याचा डाव मतदार उधळून लावतील असा विश्वास गावकरी मंडळाचे  श्री.खंडागळे व श्री बंगाळ यांनी व्यक्त केला आहे.

नवीन नाशिक प्रतिनिधी-अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला आठ लाख रुपये किंमतीचा सोने चांदीचे दागिने दुचाकी, मोबाईल फोन असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने उपायुक्त सोहेल शेख ,अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख , यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.यावेळी राजेंद्र बोरसे ५ लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने,ज्योती चव्हाण ९२ हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड, मंजीरी मांडोळे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत,बाळू खाडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,परशुराम राजभोर ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन,राजु चौधरी २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,रोहीत अहिरे यांची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी,कैलास काळे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी,समीर मांडवडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,ताई पगारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण ८ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आला.सदरच्या कामगिरीमध्ये अंबड पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकुन पो हवा, छबु सानप, पो. ना. समाधान चव्हाण यांनी केली. यावेळी तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरातून राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा राज्यातील सव्वाअकरा लाखांचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर कार्यालयाने काल गुरुवारी छापा टाकून जप्त केला असून याप्रकरणी दोघांवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे काल गुरुवारी घोडेगाव येथून जप्त केला.दामू पुंजाराम जाधव (वय 42) व रामू पुंजाराम जाधव (वय 45) दोघेही राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव या दोघा भावांकडून हा साठा जप्त केला.परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्यावतीने पुढील तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहमदनगर यांनी सांगितले.

श्रीरामपूर- अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची  पतपेढीच्या संचालकांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पतपेढीचा जिल्हयात मोठा नावलौकिक वाढला आहे.संस्थेच्या सतत "अ"वर्ग ऑडिट असल्याने संस्थेला उज्वल भविष्य प्राप्त झाले आहे संपुर्ण अहवालावरून संस्थेवर सभासद व ठेवीदार यांचा प्रचंड विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते.स्वयंपूर्ण कामकाज व काटकसरीने केलेला व्यवहार हाच  संस्थेचा आत्मा असे उदगार हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची पतपेढीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीरामपूर दूध जिल्हा मध्य सह दूध संघाचे चेअरमन रावसाहेब पा.म्हस्के यांनी काढले

    याप्रसंगी बोलताना हिंद सेवा पतपेढी नियमांचे काटेकोरपणे पालन करणारी संस्था आहे जास्तीत जास्त ठेवी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवल्याने अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे यांनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले.

  हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी आपल्या कडील असणारे विविध प्रकारचे निधीचे चांगले नियोजन करण्यासंदर्भात संचालकांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.

  याकार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी उपनगराध्यक्ष सुनील बोलके, कॉग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे , हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अशोक नाना क्षीरसागर, भि.रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये, क.जे.सोमय्या हायस्कूल चे चेअरमन पुरुषोत्तम मुळे, ज्यू कॉलेज चे चेअरमन रणजित श्रीगोड, बा. ग.कल्याणकर रात्र प्र शाळेचे चेअरमन दीपक कुऱ्हाडे ,शशिकांत कडूस्कर , डॉ नवनीत जोशी, संतोषजी अभंग, सुरेश सोनवणे, प्रा रत्नमाला गाडेकर,  प्राचार्या चित्रा कडू,  रवींद्र पछाडे, गिरीधर सोनवणे, दत्तनगर ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षीताई जगताप, मा संचालक शिवाजी गिरी, मा मुख्याध्यापक भिका कांबळे, सौ. बेबीनंदा बुद्धिवंत, श्री दशरथ भोंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.यप्रसंगी स्वागत गीत सौ उषा गाडेकर, व अवधूत कुलकर्णी सह भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले पाहुण्यांचे स्वागत चेअरमन अधिक जोशी यांनी केले तर प्रास्तविक जेष्ठ संचालक विलास साठे यांनी केले अध्यक्षीय सूचना प्रा.गिरीश पाखरे, यांनी केले तर त्यास अनुमोदन अशोक खैरे  यांनी दिले पुरस्कार प्राप्त यादीचे वाचन पतपेढी चे  विद्यमान अध्यक्ष अधिक जोशी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतपेढीचे संचालक सतीश म्हसे यांनी केले आभार संचालक किशोर खुरंगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  उपाध्यक्ष मिलींद देशपांडे ,पतपेढीचे संचालक सर्वश्री योगेश देशमुख,  अशोक परदेशी, महेश डावरे,मधुकर साबळे,  किशोर संबळे, दीपक आरडे,सेक्रेटरी मार्तंड ठाणगे, किशोर कुलकर्णी,ज्ञानेश भागवत,  राहुल साठे यांनी परिश्रम घेतले....

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) कै.यशवंतराव हाळनोर,चंदु देठे,यादवराव निबे,यशवंत भिमराज देठे,कारभारी पारखे,कीसन गायवळ,काशिनाथ पारखे,आदिंच्या काळात झालेली सोसायटीची  इमारत असून ती इमारत आज मोडकळीस आली असून आज आपण बघतो की कुठे ती सोसायटीचा कारभार मोडक्या पत्र्याच्या खोलीत भरवतो आजच्या इ प्रणालीच्या युगात आपल्याला सोसायटी हायटेक करायची असून राधाकृष्ण विखे पाटील जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना स्टूल या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्या व गावातील कीड लागलेले दलाल गावातुन हद्दपार करा असे प्रतिपादन उमेदवार आबासाहेब पारखे यांनी प्रचार नारळ शुभारंभा प्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले की,सोसायटीच्या परवाना असलेल्या रेषन दुकानात विशेष करून लक्ष घालून सर्व रेशन धारकांना घरपोहच रेशन पुरविण्याची कसे मिळेल व  स्वच्छ व पारदर्शी कारभार करायचा असून भविष्यात ग्रामपंचायतच्या कारभाराकडेही लक्ष द्यायचे आहे.

यावेळी भाऊसाहेब हाळनोर,सखाहरी देठे,हरीभाऊ घोरपडे,दत्तात्रय पारखे,नंदकुमार देठे,गंगाधर गायवाळ,भाऊसाहेब चितळकर,रमेश देठे,बाळासाहेब हाळनोर,वसंत घुले,मधुकर देठे,अशोक देठे,संताराम देठे,राजेंद्र देठे,बाबासाहेब देठे,काशिनाथ चितळकर,भाऊसाहेब निबे,भास्कर देठे,सुभाष देठे,विश्वनाथ निबे,गणेश देठे,चांगदेव देठे,लक्ष्मण काळे,केशव देठे,कचरू गिरी,अजित देठे,शंकर घोरपडे,शरद माळी आदि सभासदांसह उमेदवार उपस्थित होते.यावेळी प्रास्तविक व उमेदवारांची ओळख तान्हाभाऊ देठे यांनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget