नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरातून राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा राज्यातील सव्वाअकरा लाखांचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर कार्यालयाने काल गुरुवारी छापा टाकून जप्त केला असून याप्रकरणी दोघांवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे काल गुरुवारी घोडेगाव येथून जप्त केला.दामू पुंजाराम जाधव (वय 42) व रामू पुंजाराम जाधव (वय 45) दोघेही राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव या दोघा भावांकडून हा साठा जप्त केला.परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्यावतीने पुढील तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहमदनगर यांनी सांगितले.
Post a Comment