विविध गुन्ह्यातील ८ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द,तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
नवीन नाशिक प्रतिनिधी-अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला आठ लाख रुपये किंमतीचा सोने चांदीचे दागिने दुचाकी, मोबाईल फोन असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने उपायुक्त सोहेल शेख ,अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख , यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.यावेळी राजेंद्र बोरसे ५ लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने,ज्योती चव्हाण ९२ हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड, मंजीरी मांडोळे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत,बाळू खाडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,परशुराम राजभोर ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन,राजु चौधरी २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,रोहीत अहिरे यांची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी,कैलास काळे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी,समीर मांडवडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,ताई पगारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण ८ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आला.सदरच्या कामगिरीमध्ये अंबड पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकुन पो हवा, छबु सानप, पो. ना. समाधान चव्हाण यांनी केली. यावेळी तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
Post a Comment