Latest Post

बेलापूरः(प्रतिनिधी  )-सत्तेतून पैसा व पैशातून राजकारण हि विरोधकांची निती आहे. संस्थांच्या बेकायदेशीर कामातून विरोधकांनी मोठी माया कमविली असून त्याचा वापर राजकारणासाठी सत्तेसाठी  केला जात असुन ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा . असे अवाहन  संस्थेचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे व भास्कर बंगाळ यांनी केले आहे .    प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खंडागळे व बंगाळ यांनी पुढे म्हटले आहे की  ,जेथे जावू तेथे खाऊ हे विरोधकांचे  धोरण आहे.आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देवून टक्केवारी करायची  व आपला स्वार्थ साधायचा हे यांचे उद्योग आहेत.सोसायटीच्या पेट्रोल पंपाचा घोटाळा सभासदांना ठाऊक आहे.याबाबत श्री.शरद नवले यांनी तक्रार केली होती.त्याची चौकशीही झाली.चौकशीत पेट्रोल व डीझेल घटीबाबतचे आरोपात तथ्य असल्याचे आढळले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,श्रीरामपूर यांनी २६/१०/२०१८ रोजी याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावली.त्यात पेट्रोल व डीझेल घटीमुळे एकुण ५लाख १ हजार ३७८इतके आर्थिक नुकसान झाले.तसेच संस्थेच्या स्वस्त धान्य दुकान नं २०/१ व नं ९४/२ मध्ये हमालीसाठी एकुण रु.८४,९८९आणि वाहतुक खर्चापोटी एकुण ५३,८१०खर्च बेकायदेशीर दाखविला.सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८(अ) नुसार कारवाई कां करु नये असे स्पष्ट नमूद केले होते.पुढे हे प्रकरण राजकीय दबाव आणि तडजोडी करुन मिटविले.तथापि या प्रकरणी श्री.शरदराव नवले यांनी सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील केलेले आहे कोरोनामुळे खटला चालला नाही नाहीतर केव्हाच कारवाई झाली असती  सदर प्रकरण मिटलेले नाही चूकीच्या कामाची वसुली केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही .सत्ताधा-यांनी आपण साव  असल्याचा आव आणू नये.प्रत्येक ठिकाणी  नाममाञ सरपंच , चेअरमन निवडायचे.त्यांना नाममात्र ठेवायचे अन काम मात्र आपण उरकायचे नावापुरते व सह्यापुरते त्यांना ठेवायचे आणि कारभार माञ रिमोट कंट्रोलने चालवून वेगवेगळे उद्योग करायचे आणि परस्पर मलिदा लाटायचा हि यांची कार्यपध्दती आहे.याच कमाईच्या जोरावर निवडणुकीत पैसे उधळायचे अन मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करायचा पण  तुमच्या काळ्या पिशवीला अन बाकीच्याही प्रलोभनाला मतदार भुलणार नाही हे ग्रामपंचायत निवडणूकीत दाखवून दिले आहे आता सोसायटीतही तेच होणार आहे काही लोक स्वंयः घोषीत नेते होतात जे नेते आहेत तेच निवडणूक लढवितात ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाते ते नेते असतात उमेदवार नसतात हे ही यांना माहीत नाही अशा मतलबी नेत्याचा डाव मतदार उधळून लावतील असा विश्वास गावकरी मंडळाचे  श्री.खंडागळे व श्री बंगाळ यांनी व्यक्त केला आहे.

नवीन नाशिक प्रतिनिधी-अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला आठ लाख रुपये किंमतीचा सोने चांदीचे दागिने दुचाकी, मोबाईल फोन असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने उपायुक्त सोहेल शेख ,अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख , यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.यावेळी राजेंद्र बोरसे ५ लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने,ज्योती चव्हाण ९२ हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड, मंजीरी मांडोळे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत,बाळू खाडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,परशुराम राजभोर ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन,राजु चौधरी २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,रोहीत अहिरे यांची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी,कैलास काळे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी,समीर मांडवडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,ताई पगारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण ८ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आला.सदरच्या कामगिरीमध्ये अंबड पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकुन पो हवा, छबु सानप, पो. ना. समाधान चव्हाण यांनी केली. यावेळी तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरातून राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा राज्यातील सव्वाअकरा लाखांचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर कार्यालयाने काल गुरुवारी छापा टाकून जप्त केला असून याप्रकरणी दोघांवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे काल गुरुवारी घोडेगाव येथून जप्त केला.दामू पुंजाराम जाधव (वय 42) व रामू पुंजाराम जाधव (वय 45) दोघेही राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव या दोघा भावांकडून हा साठा जप्त केला.परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्यावतीने पुढील तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहमदनगर यांनी सांगितले.

श्रीरामपूर- अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची  पतपेढीच्या संचालकांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे पतपेढीचा जिल्हयात मोठा नावलौकिक वाढला आहे.संस्थेच्या सतत "अ"वर्ग ऑडिट असल्याने संस्थेला उज्वल भविष्य प्राप्त झाले आहे संपुर्ण अहवालावरून संस्थेवर सभासद व ठेवीदार यांचा प्रचंड विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते.स्वयंपूर्ण कामकाज व काटकसरीने केलेला व्यवहार हाच  संस्थेचा आत्मा असे उदगार हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची पतपेढीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीरामपूर दूध जिल्हा मध्य सह दूध संघाचे चेअरमन रावसाहेब पा.म्हस्के यांनी काढले

    याप्रसंगी बोलताना हिंद सेवा पतपेढी नियमांचे काटेकोरपणे पालन करणारी संस्था आहे जास्तीत जास्त ठेवी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवल्याने अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे यांनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले.

  हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी आपल्या कडील असणारे विविध प्रकारचे निधीचे चांगले नियोजन करण्यासंदर्भात संचालकांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.

  याकार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी उपनगराध्यक्ष सुनील बोलके, कॉग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे , हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अशोक नाना क्षीरसागर, भि.रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये, क.जे.सोमय्या हायस्कूल चे चेअरमन पुरुषोत्तम मुळे, ज्यू कॉलेज चे चेअरमन रणजित श्रीगोड, बा. ग.कल्याणकर रात्र प्र शाळेचे चेअरमन दीपक कुऱ्हाडे ,शशिकांत कडूस्कर , डॉ नवनीत जोशी, संतोषजी अभंग, सुरेश सोनवणे, प्रा रत्नमाला गाडेकर,  प्राचार्या चित्रा कडू,  रवींद्र पछाडे, गिरीधर सोनवणे, दत्तनगर ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षीताई जगताप, मा संचालक शिवाजी गिरी, मा मुख्याध्यापक भिका कांबळे, सौ. बेबीनंदा बुद्धिवंत, श्री दशरथ भोंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.यप्रसंगी स्वागत गीत सौ उषा गाडेकर, व अवधूत कुलकर्णी सह भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले पाहुण्यांचे स्वागत चेअरमन अधिक जोशी यांनी केले तर प्रास्तविक जेष्ठ संचालक विलास साठे यांनी केले अध्यक्षीय सूचना प्रा.गिरीश पाखरे, यांनी केले तर त्यास अनुमोदन अशोक खैरे  यांनी दिले पुरस्कार प्राप्त यादीचे वाचन पतपेढी चे  विद्यमान अध्यक्ष अधिक जोशी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतपेढीचे संचालक सतीश म्हसे यांनी केले आभार संचालक किशोर खुरंगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  उपाध्यक्ष मिलींद देशपांडे ,पतपेढीचे संचालक सर्वश्री योगेश देशमुख,  अशोक परदेशी, महेश डावरे,मधुकर साबळे,  किशोर संबळे, दीपक आरडे,सेक्रेटरी मार्तंड ठाणगे, किशोर कुलकर्णी,ज्ञानेश भागवत,  राहुल साठे यांनी परिश्रम घेतले....

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) कै.यशवंतराव हाळनोर,चंदु देठे,यादवराव निबे,यशवंत भिमराज देठे,कारभारी पारखे,कीसन गायवळ,काशिनाथ पारखे,आदिंच्या काळात झालेली सोसायटीची  इमारत असून ती इमारत आज मोडकळीस आली असून आज आपण बघतो की कुठे ती सोसायटीचा कारभार मोडक्या पत्र्याच्या खोलीत भरवतो आजच्या इ प्रणालीच्या युगात आपल्याला सोसायटी हायटेक करायची असून राधाकृष्ण विखे पाटील जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना स्टूल या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्या व गावातील कीड लागलेले दलाल गावातुन हद्दपार करा असे प्रतिपादन उमेदवार आबासाहेब पारखे यांनी प्रचार नारळ शुभारंभा प्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले की,सोसायटीच्या परवाना असलेल्या रेषन दुकानात विशेष करून लक्ष घालून सर्व रेशन धारकांना घरपोहच रेशन पुरविण्याची कसे मिळेल व  स्वच्छ व पारदर्शी कारभार करायचा असून भविष्यात ग्रामपंचायतच्या कारभाराकडेही लक्ष द्यायचे आहे.

यावेळी भाऊसाहेब हाळनोर,सखाहरी देठे,हरीभाऊ घोरपडे,दत्तात्रय पारखे,नंदकुमार देठे,गंगाधर गायवाळ,भाऊसाहेब चितळकर,रमेश देठे,बाळासाहेब हाळनोर,वसंत घुले,मधुकर देठे,अशोक देठे,संताराम देठे,राजेंद्र देठे,बाबासाहेब देठे,काशिनाथ चितळकर,भाऊसाहेब निबे,भास्कर देठे,सुभाष देठे,विश्वनाथ निबे,गणेश देठे,चांगदेव देठे,लक्ष्मण काळे,केशव देठे,कचरू गिरी,अजित देठे,शंकर घोरपडे,शरद माळी आदि सभासदांसह उमेदवार उपस्थित होते.यावेळी प्रास्तविक व उमेदवारांची ओळख तान्हाभाऊ देठे यांनी केली.

बेलापूर(प्रतिनिधी)ःसत्ताधा-यांंनी  सोसायटीच्या जुन्या सुंदर व मजबुत अशा इमारतीची दुर्दशा करुन दुरुस्तीच्या नावाखाली पक्के मजबुत बांधकाम तोडण्याचे महापाप केले असुन त्यामुळे ए डी सी सी बँक व पतंजली केंद्राचे नुकसान  झाल्याचा आरोप गावकरी  मंडळाचे ज्येष्ठ नेते जालिंदर कु-हे यांनी केला आहे .    गांवकरी मंडळाचे जेष्ठ नेते जालींदर कुऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की  अशी चुकीची कामे करुन संस्थेचे नुकसान करणारांना आता घरीच बसवायची वेळ आली आहे .  बेलापूर सोसायटीची दुमजली इमारत ही संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सन १९७१ मध्ये उभी राहीलेली  आहे  .ज्यांना बोगस कामे करुन पैसे उकळायची सवय आहे अशा लोकांनी  जनरल मिटींगची परवानगी न घेता  सभासदांना पूर्व कल्पना न देता स्ट्राँगरुमच्या नावाखाली इमारतीला मागच्या बाजूला भगदाड पाडले.भिंत एवढी मजबूत होती की ती तोडायला व्हायब्रेटरचा वापर करावा लागला .सदरचे भगदाड पाडून शेजारी सावञ ईमारत बांधण्यात आली.त्यावर लाखो रुपये खर्च केले गेले.   स्ट्राँगरुमची सावञ इमारत झाली आणि मूळच्या चांगल्या भक्कम इमारतीत गळती सुरु झाली.या गळतीमुळे बँकेच्या साहित्याचे नुकसान झाले.तसेच तळमजल्यावरील पतंजली औषधालयाचेही लाखो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले.सदरचे लिकेज काढण्यासाठी टेंडर काढण्यात आले.वास्तविक दोन इमारतीतील फट बुजविणे एवढेच काम करणे आवश्यक होते.त्याऐवजी संपूर्ण छतच खोलले आणि ओबडधोबड डागडुजी केली गेली.यात संशयास्पद व्यवहार झाल्याची शंका आहे.स्ट्राँगरुम ही संस्थेच्या मुळ इमारतीसाठी राँगरुम ठरल्याची टिका श्री.कु-हे  यांनी केली आहे.अशी चुकीची कामे करुन त्यात गैरव्यवहार करणारांच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची कां असा सवालही त्यांनी केला आहे.ज्यांनी अधिकार नसताना चुकीच्या पध्दतीने ग्रामपंचायत हाकली अधिकार नसताना सोसायटीत चुकीची कामे केली गुपचुप ठराव बदलले हे चुकीचे चालले हे माहीत असुनही काही सुज्ञ जण गप्प बसले मग आपला सुज्ञपणा हरवलेल्या स्वयंघोषीत नेत्याना आपण पुन्हा निवडून देवुन आपल्या कामधेनुचे नुकसान करणार का ?असा सवाल कुऱ्हे यांनी केला असुन आपल्या संस्थेला टोळधाडीपासून वाचविण्यासाठी आता गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या ग्रामपंचायत नतर सेवा संस्थेतही स्वच्छ व पारदर्शी कारभार करु अशी ग्वाही कुऱ्हे यांनी दिली आहे .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाच्या घटीबाबत व नविन केबिन बांधकामाबाबत विरोधकांच्या तक्रारीवरुन सहाय्यक निबंधकांनी काढलेली नोटीस चौकशीअंती वि उ लकवाल सहाय्यक निबंधक यांनीच परत घेतली असुन आमचे कामकाज चोख असल्याचा दावा शेतकरी जनता विकास अघाडीचे नेते सुधीर नवले यांनी केला आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात शेतकरी जनता विकास अघाडीचा नेते सुधीर नवले पुढे म्हणाले की जि प सदस्य शरद नवले यांनी सन २०१८ साली बेलापुर सेवा सोसायटीच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या .पाच हजार लीटर पेट्रोल डिझेल घट दाखविण्यात आली तसेच पेट्रोल पंपाचे केबिन बांधकाम अंदाजपत्रकात साडेसात लाख रुपये असताना १५ लाख रुपये बेकायदेशीर खर्च केला असल्याची खोटी तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेवुन सहाय्यक निबंधकानी नोटीस काढली होती त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक लकवाल यांनी पेट्रोलीयम कंपनीशी चौकशी करुन घटीबाबत पडताळणी केली असता बेलापुर सेवा संस्थेने कंपनीच्या नियमापेक्षाकमी घट दाखवीली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक निबंधक लकवाल यांनी संदर्भ क्रमांक ३ नुसार काढलेली कारणे दाखवा नोटीस परत घेण्यात येत असल्याचा आदेश काढला विरोधक खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत परंतु गेल्या दहा वर्षात संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा झालेला आहे ७०लाख रुपये फंडात जमा आहे स्वभांडवल ५० लाख रुपये जमा आहेत आम्ही आजपर्यंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार चोख सांभाळला आहे त्यामुळे विरोधकांचे पित्त खवळले असल्याचा आरोपही नवले यांनी केला असुन सभासद शेतकरी जनता विकास अघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वासही नवले यांनी व्यक्त केला आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget