Latest Post

श्रीरामपूर : शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,शेळके हॉस्पिटल, साईबाबा मंदिर वार्ड नंबर ६ परिसरात, एक युवक विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने. यासंदर्भातील माहितीची खतीरजमा करून, कारवाईचे आदेश दिल्याने ,शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गोतम लगड,रमिजराजा आत्तार,गौरव दुर्गुळे आदींच्या पथकाने,८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडे १२ वाजेच्या सुमारास, मिळालेल्या माहितीतील वर्णनाशी मिळत असलेला, एक इसम संशयास्पद रित्या फिरत असतांना. कारवाईस गेलेल्या पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले असता. त्याने आपले नाव दिपक बबन जाधव राहणार, शेळके हॉस्पिटल मागे असे सांगितले असून. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता. सदरच्या २१ वर्षीय युवकाच्या कमरेला लावलेला ,एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचे मुद्देमाल पोलिसांनी आरोपीसह  ताब्यात घेतला असून. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सपोनि जिवन बोरसे, पोना पंकज गोसावी,पोना बिरप्पा करमल, पोको राहुल नरवडे, पोकॉ गीतम लगड, पोकॉ रमिज़ आत्तार, पोकॉ/ल गौरव दुर्गुळे, पोकों महेश पवार आदींनी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या कर्नाटक या ठिकाणी हिजाब बंदी व त्या ठिकाणी झालेली काही समाजकंटकांकडून निंदनीय घटना याचा श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी अहमद भाई जागीरदार, हाजी मुजफ्फर शेख, हाजी अंजुम मुसा शेख, मुनीर इमाम पठाण, मुक्तार शाह, शकूर भाई, असलम बिनसाद , साजिद मिर्झा, रियाज खान पठाण, गफार शाह, जफर शाह हे उपस्थित होते निवेदनात म्हणण्यात आले होते हिजाब हा कायद्याने दिलेला प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाराचा वापर करून त्या पद्धतीने राहणे कपडे परिधान करणे म्हणजे काही गुन्हा होत नाही म्हणून सर्व मुस्लिम समाज सदर घटनेचा निषेध करून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देण्यात आले. 


श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौक येथील जय हिंद करिअर अकॅडमी चे संचालक सुयोग सस्कर यांचे पुतणे चिरंजीव शौर्य अण्णासाहेब सस्कर या सहा वर्षाच्या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2022 साठी नोंद झालेली आहे. शौर्य दोन वर्षाचा असल्यापासूनच जनरल नॉलेज ची संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पणे  लक्षात ठेवतो व जसेकी प्रश्न  भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या, भारता शेजारील देश, तसेच विज्ञानातील पिरॉडिक टेबल व विज्ञानातील शोध याची संपूर्णपणे अचूक माहिती सांगतो. सुरवातीला या गोष्टी शिकवण्यासाठी त्याची आई अमृता सस्कर तसेच आजोबा विठ्ठल सस्कर व घरातील इतर सदस्यांबरोबर आत्या,मामा यांचे योगदान मोलाचे ठरते.आज अमृत जवान सन्मान या तहसील कार्यालयातील आजी-माजी सैनिकांच्या अभियानाच्या निमित्ताने शौर्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी त्याने काही क्षणात सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवरांना अचंबित करणारी ठरली. जमलेल्या सर्वच मान्यवरांनी शौर्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत शेवटी शौर्य ने ही आय ए एस होण्याचे  सांगितले. शौर्य सध्या महाले पोतदार शाळेमध्ये सिनियर के जी मध्ये शिकत आहे. त्याच बरोबर जय हिंद मध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी सैनिक मेजर सचिन सत्रे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रसंगी आमदार लहू कानडे साहेब ,सचिन गुजर ,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे माननीय न्यायाधीश नांदगावकर साहेब ,दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर माननीय न्यायाधीश कासट साहेब ,श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम ,प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, नगरपालिकेचे सी ओ गणेश शिंदे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय  सानप ,तालुका पोलिस स्टेशनचे पीआय खाडे ,श्रीरामपूर पंचायत समितीचे बी डी ओ तलाठी राजेश घोरपडे सैनिक संघाचे मेजर सरदार, मेजर शन्खेश पांडव,विट्ठलराव सस्कर, मेजर उंडे , सुनिल गवळी,तांबे,भालेराव, तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक जय हिंद चे संचालक सुयोग सस्कर ,अजय बत्तीसे, बाळासाहेब वाणी, कृष्णा वाघ त्याचबरोबर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

नाशिक प्रतिनिधी- जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग  क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्याने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ  यांच्या अडवलेल्या फाइली जिल्हा परिषदेसह कार्यकारी अभियंत्यांच्या अंगलट आलेल्या असतानाच, आता जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्याविरोधात लेखी तक्रारी दिल्या आहेत  . त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी मंत्रालयात बुधवारी (दि.9) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कार्यकारी अभियंत्यांनाही बोलविण्यात आले आहे.मागील दोन-तीन आठवड्यांपासून बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांच्या व्हीआयपी संस्कृती विरोधात सदस्य, पदाधिकार्‍यांसह ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कार्यकारी अभियंता भेटत नाही, कार्यालयात येत नाही, फाइली काढत नाही, पंचायत समितीत बसून कामकाज करतात, सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे मोबाइल घेत नाहीत, अशा तक्रारी अभियंत्याविरोधात सुरू होत्या. यातच एक ठेकेदार अन् विभाग एकचे कार्यकारी अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद थेट विभागीय आयुक्तांपर्यंत पोहचला होता.यातच विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील फाइलीही कार्यकारी अभियंता यांनी अडवल्या. या फाइली काढण्यासाठी स्वतः झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना केल्या. मात्र, त्यांच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवल्याने विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी थेट मंत्रालयात या कार्यकारी अभियंत्यांविरोधात तक्रार केली होती.अशा तक्रारी असतानाच जिल्ह्यातील चार आमदारांनीही कार्यकारी अभियंत्यांविरोधात लेखी तक्रारी केल्याचे असल्याचे समजते. कार्यकारी अभियंत्यांच्या कामकाजाविरोधात या तक्रारी असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीवरून अडचणीत सापडलेले कार्यकारी अभियंता अजुनच अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कर्जत प्रतिनिधी-शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची  चोरी करून ते भंगारात विकणाऱ्यांविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या मागील उघड्या असलेल्या गोडाऊनमधून वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे, वय- १९ (सर्व रा. राशीन ) व आदींनी चोरल्या. नंतर त्या इबारत मुस्तकीम शेख, वय -३० ( रा.भिगवण ता. इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या.याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर वय-३० वर्षे (रा. जांभळकरवस्ती, राशिन) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३७९, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली.

बेलापूर(वार्ताहर)  समाजसेवेसाठी सतत अग्रेसर असणाऱ्या व नावातही जनसेवा असणाऱ्या  जनसेवा पतसंस्थेच्या वतीने येथील अंथुरुणावर खिळून पडलेल्या सत्यम बाळासाहेब काळे या तरुण रुग्णाला पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची प्रदान करण्यात आली असुन या खुर्चीमुळे त्या तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .


चार दिवसांपूर्वी गावातील निलेश कुलकर्णी या तरुणाने मतिमंद सत्यम या गॅंगरिंगमुळे पाय काढलेल्या रुग्णाला व्हील चेअरच्या मदतीची मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास चायल यांच्याकडे केली होती. त्यानुसार चायल यांनी  मित्रांकडून निधी संकलन सुरु केले होते. मात्र दरम्यान त्यांनी हा विषय येथील प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांना भेटुन यासंबंधी विनंती केली. त्यावर लुंकड यांनी लागलीच पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची देण्याची तयारी दर्शविली.त्यानुसार  कैलास चायल यांच्या प्रयत्नाने अखेर निराधार आणि अंथरुणावर खिळून पडलेल्या सत्यमला जनसेवा पतसंस्थेच्या वतीने ही दुचाकी खुर्ची   पतसंस्थेचे संचालक प्रवीण लुंकड, अमित लुंकड,कैलास चायल, व्यवस्थापक राहुल दायमा,प्रा. ज्ञानेश गवले,प्रा. डॉ. माधव पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली.

या खुर्चीमध्ये कमोड सुविधा असुन झोपण्यासाठी बेड, आराम करण्यासाठी गरजेनुसार खाली वर करण्याची सुविधा आहे.जनसेवा पतसंस्थेच्या वतीने सत्यमला दाखविलेल्या मदतीमुळे त्याचे जिवन नक्कीच उजळुन निघणार आहे

यावेळी सर्वश्री निलेश कुलकर्णी, रोहित गागरे ,बाळासाहेब काळे बंधु आदी उपस्थित होते.या सुविधेबद्दल ग्रामस्थांनी जनसेवा पतसंस्थेला धन्यवाद दिले आहेत.

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - येथील मोरया डान्स ॲकेडमी मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो स्पर्धेत कुु. अवनी सलालकर हिने लहानगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑनलाईन डान्स स्पर्धेमध्ये देखील यश संपादन केले.

मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद यांनी श्रीरामपूरात डान्स क्लास सुरू करून मुलामुलींच्या कलागुणाला संधी निर्माण करून दिली आहे. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी अर्जूनभाऊ दाभाडे, मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद, बाळासाहेब गायकवाड, राहूल शिरसाठ, शिक्षक नेते नवनाथ अकोलकर, शेख, सौ. प्रतिमा साळुंके, सौ प्रियंका गंगवाल, सौ वैशाली गायकवाड, सौ. विना सुखदरे, सौ संगिता अकोलकर, श्रीमती अमृता अकोलकर आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. सौ प्रियंका गंगवाल यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget