जनसेवा पतसंस्थेच्या रुपाने सत्यम काळेला मिळाला जिवन जगण्याचा आधार.

बेलापूर(वार्ताहर)  समाजसेवेसाठी सतत अग्रेसर असणाऱ्या व नावातही जनसेवा असणाऱ्या  जनसेवा पतसंस्थेच्या वतीने येथील अंथुरुणावर खिळून पडलेल्या सत्यम बाळासाहेब काळे या तरुण रुग्णाला पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची प्रदान करण्यात आली असुन या खुर्चीमुळे त्या तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .


चार दिवसांपूर्वी गावातील निलेश कुलकर्णी या तरुणाने मतिमंद सत्यम या गॅंगरिंगमुळे पाय काढलेल्या रुग्णाला व्हील चेअरच्या मदतीची मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास चायल यांच्याकडे केली होती. त्यानुसार चायल यांनी  मित्रांकडून निधी संकलन सुरु केले होते. मात्र दरम्यान त्यांनी हा विषय येथील प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांना भेटुन यासंबंधी विनंती केली. त्यावर लुंकड यांनी लागलीच पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची देण्याची तयारी दर्शविली.त्यानुसार  कैलास चायल यांच्या प्रयत्नाने अखेर निराधार आणि अंथरुणावर खिळून पडलेल्या सत्यमला जनसेवा पतसंस्थेच्या वतीने ही दुचाकी खुर्ची   पतसंस्थेचे संचालक प्रवीण लुंकड, अमित लुंकड,कैलास चायल, व्यवस्थापक राहुल दायमा,प्रा. ज्ञानेश गवले,प्रा. डॉ. माधव पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली.

या खुर्चीमध्ये कमोड सुविधा असुन झोपण्यासाठी बेड, आराम करण्यासाठी गरजेनुसार खाली वर करण्याची सुविधा आहे.जनसेवा पतसंस्थेच्या वतीने सत्यमला दाखविलेल्या मदतीमुळे त्याचे जिवन नक्कीच उजळुन निघणार आहे

यावेळी सर्वश्री निलेश कुलकर्णी, रोहित गागरे ,बाळासाहेब काळे बंधु आदी उपस्थित होते.या सुविधेबद्दल ग्रामस्थांनी जनसेवा पतसंस्थेला धन्यवाद दिले आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget