श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - येथील मोरया डान्स ॲकेडमी मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो स्पर्धेत कुु. अवनी सलालकर हिने लहानगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑनलाईन डान्स स्पर्धेमध्ये देखील यश संपादन केले.
मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद यांनी श्रीरामपूरात डान्स क्लास सुरू करून मुलामुलींच्या कलागुणाला संधी निर्माण करून दिली आहे. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रमासाठी अर्जूनभाऊ दाभाडे, मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद, बाळासाहेब गायकवाड, राहूल शिरसाठ, शिक्षक नेते नवनाथ अकोलकर, शेख, सौ. प्रतिमा साळुंके, सौ प्रियंका गंगवाल, सौ वैशाली गायकवाड, सौ. विना सुखदरे, सौ संगिता अकोलकर, श्रीमती अमृता अकोलकर आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. सौ प्रियंका गंगवाल यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Post a Comment