श्रीरामपुरात मुस्लिम समाजाच्या वतीने कर्नाटक मध्ये झालेल्या हिजाब बंदी विरुद्ध आंदोलनाचा निषेध.
श्रीरामपूर प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या कर्नाटक या ठिकाणी हिजाब बंदी व त्या ठिकाणी झालेली काही समाजकंटकांकडून निंदनीय घटना याचा श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले यावेळी अहमद भाई जागीरदार, हाजी मुजफ्फर शेख, हाजी अंजुम मुसा शेख, मुनीर इमाम पठाण, मुक्तार शाह, शकूर भाई, असलम बिनसाद , साजिद मिर्झा, रियाज खान पठाण, गफार शाह, जफर शाह हे उपस्थित होते निवेदनात म्हणण्यात आले होते हिजाब हा कायद्याने दिलेला प्रत्येक नागरिकास मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाराचा वापर करून त्या पद्धतीने राहणे कपडे परिधान करणे म्हणजे काही गुन्हा होत नाही म्हणून सर्व मुस्लिम समाज सदर घटनेचा निषेध करून मुस्लिम समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन देण्यात आले.