Latest Post

कर्जत प्रतिनिधी-शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची  चोरी करून ते भंगारात विकणाऱ्यांविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या मागील उघड्या असलेल्या गोडाऊनमधून वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे, वय- १९ (सर्व रा. राशीन ) व आदींनी चोरल्या. नंतर त्या इबारत मुस्तकीम शेख, वय -३० ( रा.भिगवण ता. इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या.याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर वय-३० वर्षे (रा. जांभळकरवस्ती, राशिन) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३७९, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली.

बेलापूर(वार्ताहर)  समाजसेवेसाठी सतत अग्रेसर असणाऱ्या व नावातही जनसेवा असणाऱ्या  जनसेवा पतसंस्थेच्या वतीने येथील अंथुरुणावर खिळून पडलेल्या सत्यम बाळासाहेब काळे या तरुण रुग्णाला पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची प्रदान करण्यात आली असुन या खुर्चीमुळे त्या तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .


चार दिवसांपूर्वी गावातील निलेश कुलकर्णी या तरुणाने मतिमंद सत्यम या गॅंगरिंगमुळे पाय काढलेल्या रुग्णाला व्हील चेअरच्या मदतीची मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास चायल यांच्याकडे केली होती. त्यानुसार चायल यांनी  मित्रांकडून निधी संकलन सुरु केले होते. मात्र दरम्यान त्यांनी हा विषय येथील प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांना भेटुन यासंबंधी विनंती केली. त्यावर लुंकड यांनी लागलीच पंचवीस हजार रुपये किंमतीची अद्यावत दुचाकी खुर्ची देण्याची तयारी दर्शविली.त्यानुसार  कैलास चायल यांच्या प्रयत्नाने अखेर निराधार आणि अंथरुणावर खिळून पडलेल्या सत्यमला जनसेवा पतसंस्थेच्या वतीने ही दुचाकी खुर्ची   पतसंस्थेचे संचालक प्रवीण लुंकड, अमित लुंकड,कैलास चायल, व्यवस्थापक राहुल दायमा,प्रा. ज्ञानेश गवले,प्रा. डॉ. माधव पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आली.

या खुर्चीमध्ये कमोड सुविधा असुन झोपण्यासाठी बेड, आराम करण्यासाठी गरजेनुसार खाली वर करण्याची सुविधा आहे.जनसेवा पतसंस्थेच्या वतीने सत्यमला दाखविलेल्या मदतीमुळे त्याचे जिवन नक्कीच उजळुन निघणार आहे

यावेळी सर्वश्री निलेश कुलकर्णी, रोहित गागरे ,बाळासाहेब काळे बंधु आदी उपस्थित होते.या सुविधेबद्दल ग्रामस्थांनी जनसेवा पतसंस्थेला धन्यवाद दिले आहेत.

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - येथील मोरया डान्स ॲकेडमी मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो स्पर्धेत कुु. अवनी सलालकर हिने लहानगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑनलाईन डान्स स्पर्धेमध्ये देखील यश संपादन केले.

मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद यांनी श्रीरामपूरात डान्स क्लास सुरू करून मुलामुलींच्या कलागुणाला संधी निर्माण करून दिली आहे. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी अर्जूनभाऊ दाभाडे, मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद, बाळासाहेब गायकवाड, राहूल शिरसाठ, शिक्षक नेते नवनाथ अकोलकर, शेख, सौ. प्रतिमा साळुंके, सौ प्रियंका गंगवाल, सौ वैशाली गायकवाड, सौ. विना सुखदरे, सौ संगिता अकोलकर, श्रीमती अमृता अकोलकर आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. सौ प्रियंका गंगवाल यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


अहमदनगर प्रतिनिधी-महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्‍यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्‍या वंदना अशोक भिंगारदिवे या रविवारी सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना नितीन शेलार त्यांच्या घरात घुसला. तुमचा मुलगा कुठे आहे? असे म्हणत शेलार याने वंदना भिंगारदिवे यांना गावठी कट्टा दाखविला. वंदना यांच्यासह त्यांचा मुलगा अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची माहिती अक्षय याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार सतीश भांड, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, राजू शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, संदीप थोरात, राजेंद्र केकान, राजेंद्र फसले यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत नितीन शेलार याला ताब्यात घेतले. वंदना भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी - भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्ताने अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आयोजन करणार असुन त्या अनुषगांने दि.१५ ऑगस्ट-२०२२ रोजी पर्यंतच्या पुढील ५५ आठवडयामध्ये प्रत्येक आठवडयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे पुढील कार्यक्रमाची ५५ आढवड्याचे नियोजन  अ.क्र कार्यक्रम १.) | स्वच्छता अभियान पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे २.) वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे 3). | आरोग्य शिबीर पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस वसाहत येथे ४). जनजागृती कोरोना संदर्भान्वये पोलीस स्टेशन स्तरावर कोरोना जगजागृती ५). जनजागृती गुटखा,मावा,तंबाखुजन्य पदार्थ सेवन न करणेबाबत ६).माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व | माध्यमिक विदयालयास अंमलदार यांनी भेट देवुन स्त्री अत्याचार व स्वसरंक्षणार्थ भेटी व जनजागृती माहीती व जगजागृती करणे ७). | सायबर /अर्थिक गुन्हे माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व | विषयी जगजागृती | अंमलदार यांनी भेट देवुन सायबर गुन्हे व अर्थिक गुन्हे | विषयी माहीती व जगजागृती करणे ८). | रस्ता सुरक्षा अभियान माध्यमिक व महाविदयालयांना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवुन रस्ता सुरक्षा अभियान विषयी माहीती व जगजागृती करणे सदरचे कार्यक्रम आयोजन मा.पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,श्री.मनोज पाटील मा अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर साहेब श्रीरामपुर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री.संजय सानप पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.)1)  लक्ष्मण परसराम बिरसने रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर 

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

36,700/-  रु. कि.चे 525 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,28,750/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dysp संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp  संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश  औटी, PC नितीन शिरसाठ आदींनी केली.

शिर्डी (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या सहा महिन्यात तीन छापे टाकून चार जणांना रंगेहात पकडले आहे. एवढी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मात्र तरीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गांभीर्याने ही गोष्ट अद्यापही घेतली नसल्याचे निदर्शनास येत असून यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने या लाचलुचपत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून यांच्यावरही पोलीस महासंचालकांच्या सूचने प्रमाणे कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये हप्ते घेण्याच्या ऑडिओ क्लिप वरून पोलीस निरीक्षक साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. तसेच या संदर्भात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असतानाच मात्र येथिल  श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच घेतली. हे प्रकरण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असताना याकडे वरिष्ठ पोलिसांचे दुर्लक्ष होते की काय? अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक संजय दुधाडे यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला .त्याच प्रमाणे संजय रघुनाथ काळे यांनीही श्रीरामपूरशहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी संजय काळे या पोलिस कर्मचाऱ्याने  11 ऑगस्ट 20 21 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार रुपये लाच स्विकारली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सुनील उत्तमराव वाघचौरे व गणेश हरी ठोकळ यांनी तक्रारदार यांच्याकडे घराच्या भिंतीवरून चे वाद झाले त्या बदल्यात पोलीस ठाण्यात सहकार्य करण्यासाठी तक्रार दाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच मागितली मात्र दहा हजार रुपये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 जानेवारीला 20 22 ला रंगेहात पकडले. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .असे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन छाप्या मध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रकरणी लाच घेताना रंगेहात पकडले आहे . या पोलिसांवर कारवाई झाली. मात्र यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे होते. कारण महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व  नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांनीही प्रत्येक जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले होते की,ज्या पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अधिकारी लाच घेतील त्या  संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी, पोलिस निरीक्षक ही त्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल व या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडल्यानंतर तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र श्रीरामपूर येथे सहा महिन्यात तीन ट्रेकमध्ये चार पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तेथील पोलिस निरीक्षकांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget