Latest Post

शिर्डी (प्रतिनिधी)येथिल श्री साई संस्थानच्या रुग्णालयात कार्यरत असताना डॉक्टर अभिमन्यू कडू या वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर टाकून संस्थानांच्या नियमाचे उल्लंघन केल्या बद्दल त्यांच्यावर  कारवाई करून त्यांना संस्थान सेवेतून बडतर्फ करावे.या मागणीचे निवेदन  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांना देण्यात आले आहे.श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेफ जमादार यांनी निवेदन श्री साईबाबा संस्थान कार्यालयात दिले आहे. साई संस्थांनला दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभिमन्यू कडू हे कार्यरत असून ते एमबीबीएस आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर शासनाच्या नियमाप्रमाणे

एमबीबीएस असल्या कारणाने शासना कडून कोव्हीड केअर सेंटर टाकण्यासाठी मंजुरी घेतली व श्रीरामपूर येथे इतर काही डॉक्टर मित्रांच्या साथीने कोव्हीड केअर सेंटर सुरू केले. मात्र साई संस्थांनमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला असे दुसऱ्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन करून कुठेही इतर रुग्णालयात वैद्यकीय सेवा करणे किंवा कोव्हीड केअर सेंटर टाकता येत नसतानाही त्यांनी ते टाकले व या कोव्हीड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल करून अव्वाच्या सव्वा रुपये कमावले. यासंदर्भात संस्थानने या डॉक्टर अभिमन्यू कडू यांना (मेमो)नोटीसही दिली होती. त्यानंतर डॉक्टर कडू यांनी एक डिसेंबर 2021 रोजी संस्थान रूग्णालयातील नोकरीचा राजीनामा  दिला होता. मात्र तदनंतर 20 दिवसांनी परत 20 डिसेंबरला 2021 हा दिलेला राजीनामा त्यांनी माघारी घेतला व परत ते संस्थान रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र संस्थांनच्या कोणताही कर्मचारी, अधिकाऱ्यास संस्थान आस्थापनेवर नेमणूक होताना लेखी घेतले जाते व त्यास संस्थांन शिवाय दुसऱ्या इतर ठिकाणी काम करण्यास मनाई असते. असा नियम असताना डॉक्टर अभिमन्यू कडू यांनी या नियमाचे उल्लंघन करत स्वतःच्या नावावर श्रीरामपूर येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू केले व त्यातून मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा बिले आकारून कमाई केली .यासंदर्भात साई संस्थान प्रशासनाने संस्थांनच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल डॉक्टर अभिमन्यू कडू यांना चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व संस्थानच्या रुग्णालयातून त्यांना बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी या निवेदनातून श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीचे जोयेब जामदार यांनी केली आहे.


श्रीरामपूर - श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आल्याने त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे.आंबेजोगाई येथे देखील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द होती. आज गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी स्वाती भोर यांनी दिपाली काळे यांच्याकडून श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.


श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी DySp मिटके यांना  याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये प्रदान करण्यात आले.Dy.s.p.संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34,   पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले

आहे.अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.दि. 15/09/2018 च्या 3 ते 4 दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे   बाकड्या जवळ सायकल खेळत असताना आरोपी क्र.1 अफसर लतीफ सय्यद हा पीडित मुलीला बंद घराच्या छतवर् घेऊन गेला तिला विवस्त्र करून हाताने मारहाण केली व् तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी आरोपी क्र 2 मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी  अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस  पुन्हा सायंकाळी चे वेळेस त्यात ठिकाणावरील  बाकड्या जवळून उचलून त्यांच्या  घराच्या छतावर नेले आरोपीने पीडित   मुलीस जीवे मारण्याची भीती   दाखवून  तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच कोणाला काही सांगू नको नाहीतर मी तुझा जीव घेईल  असे म्हणून घरी पाठवून दिले त्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादी हि तिला दवाखान्यात चल असे म्हणाली असता पीडित मुलगी  घाबरलेली होती फिर्यादी हिस काही सांगत नव्हती हे पाहून फिर्यादीने तिच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले व पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तीन दिवसापूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले फिर्यादीने सदर घटनेबाबत तिच्या पतीला सांगितल्यानंतर ते पीडित मुलीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी घेऊन गेले सदर घटनेबाबत आरोपीविरुद्ध भा द वि क ३७६( ए)( बी) ३५४,३२३,५०६सह् ३४ तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा( पॉक्सो)२०१२ चे कलम५( एम),६ व१७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता प्रथम या गुन्ह्याचा तपास Psi.विशाल  सणस यांच्याकडे  होता या. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.pसंदीप मिटके  यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी  आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे  संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि 20 वर्षे सश्रम कारावास व ५००००रु दंड आणि दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्र. 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरावली बाबा दर्गाजवळ तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे   17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना  साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. 

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके आणि त्यांचे पथकातील परिविक्षाधीन Dysp पुनम पाटील,PSIविशाल सणस, PSI जया तारडे, ASI भालसिंग, HC सुयोग सुपेकर, PC याकूब सय्यद आदींनी केला.



 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-निसार्गाच्या ऋतुमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच शासनाने खताच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांना जोरदार धक्का दिला असुन खताच्या किमती कमी करण्याची मागणी केली जात आहे            वातावरणात वेळोवेळी बदल होत असतानाही आपला जिव मुठीत धरुन शेतकऱ्यांनी कांदा गहु हरबरा ज्वारी पिके घेतली अनेकांनी फळबागा धरलेल्या आहेत वातावरणात झालेल्या बदलामुळे फवारणी करुन वैतागलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक जोरदार झटका दिला असुन रासायनिक खताच्या किमतीत ५० रुपयापासुन १९५ रुपयापर्यत वाढ केलेली आहे आगोदरच वाढता उत्पादन खर्च व कमी उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झालेली असतानाच खताच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती करावी तर कशी करावी असा प्रश्न शेताकऱ्यांना पडला आहे रब्बी हंगामातील खताची मागणी वाढलेली असतानाच शासनाने खताच्या किमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोसळले आहे.२४;२४;० ची गोणी १५४०रुपयांना मिळत होती आज तीची किंमत १७०० रुपये झाली आहे .१०;२६;२६ ची गोणी पुर्वी १४५० रुपयांना मिळत होती आता तीच गोणी १६४० रुपयांना मिळणार आहे .१२;३२;१६ ही खताची गोणी १४७०रुपयांना मिळत होती आता तीची किंमत १६४० रुपये झाली आहे पोटँशची किमंत पुर्वी १०१५ रुपये होती आता तीच किमत १८७५ रुपये झाली आहे .१६;२०;०;१३ या खताच्या गोणीतही ५० रुपयांनी वाढली आहे .त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे शासनाने खताच्या किमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गँस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महीलेचेही आज निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या  दोनवर पोहोचली आहे                       बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून गेला या वेळी लागलेल्या आगीत शशिकांत शेलार ज्योती शशिकांत शेलार यश

शशिकांत शेलार नमश्री शशिकांत शेलार हे चौघेही गंभीर जखमी झाले होते त्यांना प्रथम साखर कामगार हाँस्पिटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते तेथे उपचार सुरु असताना मुलगी नमश्री हीचे चार दिवसापूर्वीच निधन झाले होते तर यश यास दवाखान्यातुन घरी सोडण्यात आले होते शशिकांत व त्याची पत्नी ज्योती हीच्यावर उपचार सुरुच होते या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी पंन्नास हजार रुपयापर्यत आर्थिक मदत मिळवुन दिली होती आज या दुर्घटनेतील सौ ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचार सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे त्यांचेवर बेलापुर येथील शेलार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बेलापुर  (देविदास देसाई )-संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ भानुदास मुरकुटे .प्रणित लोकसेवा विकास आघाडीचे सर्व २१उमेदवार सरासरी दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आले.लक्षवेधी ठरलेल्या टाकळीभान गटातील शेतकरी संघटनेच्या डॉ .वंदना मुरकुटे यांचाही चुरशीच्या लढतीत ५००मतांनी पराभव झाला .श्री.मुरकुटे यांनी लागोपाठ सातव्यांदा एकहाती विजय मिळवून अशोक कारखान्यावरचे निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे .                      अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडी विरुध्द शेतकरी संघटना अशी दुरंगी लढत झाली.तालुका लोकसेवा आघाडीला श्री.करण ससाणे यांनी पाठींबा दिला होता.तर शेतकरी संघटनेला श्री.अविनाश आदिक, तसेच आंमदार कानडे गटाचे ज्ञानेश्वर मुरकुटे व सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांचे समर्थन होते.टाकळीभान गटात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे विरोधात त्यांच्या स्नुषा डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी उमेदवारी केल्याने ही निवडणुक लक्षवेधी ठरली होती.माञ डॉ.वंदना मुरकुटेंसह शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांच्या पदरी अपयश आले.माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी सलग सातव्यांदा एकहाती विजय मिळवून ईतिहास रचला आहे.शेतकरी संघटनेने या निवडणूकीत जिवाचे रान केले होते या निवडणूकीत तालुक्यातील सर्व नेते मंडळी पहील्यांदाच एकाच व्यासपिठावर दिसली होती निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप हे अपेक्षित होतेच परंतु या निवडणूकीत झालेला प्रचार हा देखील  चर्चेचा विषय ठरला या निवडणूकीत मतदारांनी पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या हाती सत्ता दिली त्याचे कारणही तसेच आहे . तालुक्यात व तालुका शेजारील असलेल्या कारखान्याची काय अवस्था आहे जर तीच अवस्था अशोकची झाली तर आपले काय होणार त्यामुळे खंबीर नेतृत्व व कारखान्याची धुरा सांभाळण्याची ताकद असणारे मुरकुटे यांना पुन्हा एकदा सभासदांनी भरभरुन मतदान केले व सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या शेतकरी संघटनेला अपेक्षा होती की या वेळेस कारखान्यात प्रवेश करणार ,पण ती अपेक्षा फोल ठरली . लोकसेवा विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.सर्वसाधारण वर्गःसर्वश्री.भानुदास मुरकुटे,रावसाहेब थोरात,कोंडीराम उंडे,हिंमतराव धुमाळ,यशवत बनकर,प्रफुल्ल दांगट,भाऊसाहेब उंडे,ज्ञानेश्वर शिंदे,पुंजाहरी शिदे,ज्ञानदेव पटारे,आदिनाथ झुराळे,विरेश गलांडे,रामभाऊ कसार,ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब आदिक. सोसायटी मतदार संघःसोपानराव राऊत          महिला राखीवःशितल गवारे,हिराबाई साळुंके इतर मागास प्रवर्गःअमोल कोकणे  अनुसुचित जातीःयशवंत रणनवरे व अनुसुचित जमाती प्रवर्गःयोगेश विटनोर.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) इंडियन काँग्रेस ब्रिगेड दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या पदावर महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच राजनीति समाचार या वृत्तपत्राचे व वेब पोर्टल चे संपादक शेख बरकत अली यांची कॉंग्रेस पक्षाबरोबर ची निष्ठा व प्रेम पहाता इंडियन काँग्रेस ब्रिगेड दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी छत्रपाल सिंह हो माझी अध्यक्ष व संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजावत यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अध्यक्ष मी रेषा तिर्की यांनी शेख बरकत आली यांना महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या पदावर नियुक्त केले आहे शेख बरकत आली यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे

शेख यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ तसेच राजनीति समाचार उद्योग समूह च्या वतीने शेख फकीर महंमद, बी. के. सौदागर,अमीर जहागीरदार, राज मोहम्मद के शेख, राज मोहम्मद आर शेख, असलम बिन साद, संदीप पवार फिरोज पठाण, नासीर पठाण, विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, रियाज खान पठाण, मोजम भाई शेख, अब्दुल्ला चौधरी, इदरीस भाई शेख, शानू बेगंपुरे, दस्तगीर शहा, सुभाष राव गायकवाड, रियाज खान, इब्राहिम शेख, गुलाब वायरमन, इम्रान एस शेख, उस्मान भाई शेख, वहाब खान, असलम रंगरेज, मन्सूर पठाण, सुखदेव केदारे, राहुल गायकवाड रवींद्र केदारे, सूर्यकांत गोसावी, इलियास छोटू मिया शेख, खलील शेख, दादा साहेब मोरे, मुजम्मिल शेख, हाजी शकील भाई शेख, कालिदास अनावडे, विजय खरात, रवींद्र जगताप, राहुल कोळगे, हनीफ भाई शेख ,अकबर भाई शेख, अफजल खान, मिलिंद शेंडगे, म. हनीफ तांबोळी, मुदासिर पटेल सज्जाद पठाण, जमीर शेख, रवींद्र उनवणे, एजाज सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद अली, सय्यद सलीम भाई शेख, मोहम्मद गौरी, शफिक शेख, सार्थक साळुंके, अनिस भाई शेख, असलं भाई शेख, निसार शेख, अन्वर पठाण, सौ समिना रफिक शेख, सौ कल्पना काळे, कुमारी अश्विनी अहिरे, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget