अशोक सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास मुरकुटेंची सत्ता. सर्व जागा जिंकल्या,

बेलापुर  (देविदास देसाई )-संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ भानुदास मुरकुटे .प्रणित लोकसेवा विकास आघाडीचे सर्व २१उमेदवार सरासरी दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आले.लक्षवेधी ठरलेल्या टाकळीभान गटातील शेतकरी संघटनेच्या डॉ .वंदना मुरकुटे यांचाही चुरशीच्या लढतीत ५००मतांनी पराभव झाला .श्री.मुरकुटे यांनी लागोपाठ सातव्यांदा एकहाती विजय मिळवून अशोक कारखान्यावरचे निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे .                      अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडी विरुध्द शेतकरी संघटना अशी दुरंगी लढत झाली.तालुका लोकसेवा आघाडीला श्री.करण ससाणे यांनी पाठींबा दिला होता.तर शेतकरी संघटनेला श्री.अविनाश आदिक, तसेच आंमदार कानडे गटाचे ज्ञानेश्वर मुरकुटे व सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांचे समर्थन होते.टाकळीभान गटात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे विरोधात त्यांच्या स्नुषा डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी उमेदवारी केल्याने ही निवडणुक लक्षवेधी ठरली होती.माञ डॉ.वंदना मुरकुटेंसह शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांच्या पदरी अपयश आले.माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी सलग सातव्यांदा एकहाती विजय मिळवून ईतिहास रचला आहे.शेतकरी संघटनेने या निवडणूकीत जिवाचे रान केले होते या निवडणूकीत तालुक्यातील सर्व नेते मंडळी पहील्यांदाच एकाच व्यासपिठावर दिसली होती निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप हे अपेक्षित होतेच परंतु या निवडणूकीत झालेला प्रचार हा देखील  चर्चेचा विषय ठरला या निवडणूकीत मतदारांनी पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या हाती सत्ता दिली त्याचे कारणही तसेच आहे . तालुक्यात व तालुका शेजारील असलेल्या कारखान्याची काय अवस्था आहे जर तीच अवस्था अशोकची झाली तर आपले काय होणार त्यामुळे खंबीर नेतृत्व व कारखान्याची धुरा सांभाळण्याची ताकद असणारे मुरकुटे यांना पुन्हा एकदा सभासदांनी भरभरुन मतदान केले व सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या शेतकरी संघटनेला अपेक्षा होती की या वेळेस कारखान्यात प्रवेश करणार ,पण ती अपेक्षा फोल ठरली . लोकसेवा विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.सर्वसाधारण वर्गःसर्वश्री.भानुदास मुरकुटे,रावसाहेब थोरात,कोंडीराम उंडे,हिंमतराव धुमाळ,यशवत बनकर,प्रफुल्ल दांगट,भाऊसाहेब उंडे,ज्ञानेश्वर शिंदे,पुंजाहरी शिदे,ज्ञानदेव पटारे,आदिनाथ झुराळे,विरेश गलांडे,रामभाऊ कसार,ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब आदिक. सोसायटी मतदार संघःसोपानराव राऊत          महिला राखीवःशितल गवारे,हिराबाई साळुंके इतर मागास प्रवर्गःअमोल कोकणे  अनुसुचित जातीःयशवंत रणनवरे व अनुसुचित जमाती प्रवर्गःयोगेश विटनोर.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget