Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गँस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महीलेचेही आज निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या  दोनवर पोहोचली आहे                       बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून गेला या वेळी लागलेल्या आगीत शशिकांत शेलार ज्योती शशिकांत शेलार यश

शशिकांत शेलार नमश्री शशिकांत शेलार हे चौघेही गंभीर जखमी झाले होते त्यांना प्रथम साखर कामगार हाँस्पिटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते तेथे उपचार सुरु असताना मुलगी नमश्री हीचे चार दिवसापूर्वीच निधन झाले होते तर यश यास दवाखान्यातुन घरी सोडण्यात आले होते शशिकांत व त्याची पत्नी ज्योती हीच्यावर उपचार सुरुच होते या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी पंन्नास हजार रुपयापर्यत आर्थिक मदत मिळवुन दिली होती आज या दुर्घटनेतील सौ ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचार सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे त्यांचेवर बेलापुर येथील शेलार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बेलापुर  (देविदास देसाई )-संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ भानुदास मुरकुटे .प्रणित लोकसेवा विकास आघाडीचे सर्व २१उमेदवार सरासरी दोन हजार मतांच्या फरकाने निवडून आले.लक्षवेधी ठरलेल्या टाकळीभान गटातील शेतकरी संघटनेच्या डॉ .वंदना मुरकुटे यांचाही चुरशीच्या लढतीत ५००मतांनी पराभव झाला .श्री.मुरकुटे यांनी लागोपाठ सातव्यांदा एकहाती विजय मिळवून अशोक कारखान्यावरचे निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे .                      अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडी विरुध्द शेतकरी संघटना अशी दुरंगी लढत झाली.तालुका लोकसेवा आघाडीला श्री.करण ससाणे यांनी पाठींबा दिला होता.तर शेतकरी संघटनेला श्री.अविनाश आदिक, तसेच आंमदार कानडे गटाचे ज्ञानेश्वर मुरकुटे व सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांचे समर्थन होते.टाकळीभान गटात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे विरोधात त्यांच्या स्नुषा डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी उमेदवारी केल्याने ही निवडणुक लक्षवेधी ठरली होती.माञ डॉ.वंदना मुरकुटेंसह शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांच्या पदरी अपयश आले.माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी सलग सातव्यांदा एकहाती विजय मिळवून ईतिहास रचला आहे.शेतकरी संघटनेने या निवडणूकीत जिवाचे रान केले होते या निवडणूकीत तालुक्यातील सर्व नेते मंडळी पहील्यांदाच एकाच व्यासपिठावर दिसली होती निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप हे अपेक्षित होतेच परंतु या निवडणूकीत झालेला प्रचार हा देखील  चर्चेचा विषय ठरला या निवडणूकीत मतदारांनी पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या हाती सत्ता दिली त्याचे कारणही तसेच आहे . तालुक्यात व तालुका शेजारील असलेल्या कारखान्याची काय अवस्था आहे जर तीच अवस्था अशोकची झाली तर आपले काय होणार त्यामुळे खंबीर नेतृत्व व कारखान्याची धुरा सांभाळण्याची ताकद असणारे मुरकुटे यांना पुन्हा एकदा सभासदांनी भरभरुन मतदान केले व सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या शेतकरी संघटनेला अपेक्षा होती की या वेळेस कारखान्यात प्रवेश करणार ,पण ती अपेक्षा फोल ठरली . लोकसेवा विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.सर्वसाधारण वर्गःसर्वश्री.भानुदास मुरकुटे,रावसाहेब थोरात,कोंडीराम उंडे,हिंमतराव धुमाळ,यशवत बनकर,प्रफुल्ल दांगट,भाऊसाहेब उंडे,ज्ञानेश्वर शिंदे,पुंजाहरी शिदे,ज्ञानदेव पटारे,आदिनाथ झुराळे,विरेश गलांडे,रामभाऊ कसार,ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब आदिक. सोसायटी मतदार संघःसोपानराव राऊत          महिला राखीवःशितल गवारे,हिराबाई साळुंके इतर मागास प्रवर्गःअमोल कोकणे  अनुसुचित जातीःयशवंत रणनवरे व अनुसुचित जमाती प्रवर्गःयोगेश विटनोर.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) इंडियन काँग्रेस ब्रिगेड दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या पदावर महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच राजनीति समाचार या वृत्तपत्राचे व वेब पोर्टल चे संपादक शेख बरकत अली यांची कॉंग्रेस पक्षाबरोबर ची निष्ठा व प्रेम पहाता इंडियन काँग्रेस ब्रिगेड दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी छत्रपाल सिंह हो माझी अध्यक्ष व संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजावत यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अध्यक्ष मी रेषा तिर्की यांनी शेख बरकत आली यांना महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या पदावर नियुक्त केले आहे शेख बरकत आली यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे

शेख यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ तसेच राजनीति समाचार उद्योग समूह च्या वतीने शेख फकीर महंमद, बी. के. सौदागर,अमीर जहागीरदार, राज मोहम्मद के शेख, राज मोहम्मद आर शेख, असलम बिन साद, संदीप पवार फिरोज पठाण, नासीर पठाण, विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, रियाज खान पठाण, मोजम भाई शेख, अब्दुल्ला चौधरी, इदरीस भाई शेख, शानू बेगंपुरे, दस्तगीर शहा, सुभाष राव गायकवाड, रियाज खान, इब्राहिम शेख, गुलाब वायरमन, इम्रान एस शेख, उस्मान भाई शेख, वहाब खान, असलम रंगरेज, मन्सूर पठाण, सुखदेव केदारे, राहुल गायकवाड रवींद्र केदारे, सूर्यकांत गोसावी, इलियास छोटू मिया शेख, खलील शेख, दादा साहेब मोरे, मुजम्मिल शेख, हाजी शकील भाई शेख, कालिदास अनावडे, विजय खरात, रवींद्र जगताप, राहुल कोळगे, हनीफ भाई शेख ,अकबर भाई शेख, अफजल खान, मिलिंद शेंडगे, म. हनीफ तांबोळी, मुदासिर पटेल सज्जाद पठाण, जमीर शेख, रवींद्र उनवणे, एजाज सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद अली, सय्यद सलीम भाई शेख, मोहम्मद गौरी, शफिक शेख, सार्थक साळुंके, अनिस भाई शेख, असलं भाई शेख, निसार शेख, अन्वर पठाण, सौ समिना रफिक शेख, सौ कल्पना काळे, कुमारी अश्विनी अहिरे, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



प्रतिनिधी - उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी धडक कारवाई करून सुमारे ३४ लाख६७ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, कर्जत श्रीगोंदे जाणारे रस्त्यावर एक आयशर टेम्पो विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी कार्यालयीन पोलीस पथक तयार करून कारवाई करीता पथक रवाना केले.पथक कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर गस्त करीत असताना राक्षसवाडी गावच्या शिवारात एक केसरी रंगाचा आयशर टेम्पो (एम एच१२क्यू डब्लू९६०८) असा मिळून आल्याने त्याच्याकडे पोलीस पथकाने अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गीताराम आनंदा लंके रा. निघोज ता. पारनेर) असे सांगितले.सदर माला बाबत तुझ्याकडे परवाना आहे का? अशी चौकशी पोलिस पथकाने केली असता टेम्पो स्वतःच्या मालकीचा असून त्यावरील नंबर चुकीचा आहे असे त्याने सांगितले पोलीस पथकाने सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये मागील बाजूस कोंबड्या खाली टाकण्याचे खत त्याचे गोण्या व मागील बाजूस विदेशी दारू चे खोके आढळून आल्याने पोलीस पथकाने हा माल कोणाचा आहे विचारले असता त्याने हे दारूचे बॉक्स प्रकाश शेळके (पूर्ण नाव माहीत नाही)रा. निघोज ता. पारनेर यांच्या घरी घेऊन चाललो असल्याचे सांगितले आहे.त्यानंतर सदर पोलीस पथकाने टेम्पो मुद्देमाल कर्जत पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. यात एकूण 380 विदेशी दारूचे खोके जप्त करण्यात आले आहे.यात आयशर टेम्पोसह ३४ लाख ६७हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गीताराम लंके यास ताब्यात घेतले.तसेच आयशर टेम्पोच्या मूळ नंबरची माहिती घेतली असता.तो(एमएच.१६सीडी.३६९९)असल्याचे समजते आहे.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात पोकॉ. सागर जंगम यांच्या फिर्यादीवरून भादवि. कलम ४२०,३४मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(अ),८३नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस अंमलदार हृदय घोडके, सागर जंगम, संतोष साबळे, इरफान शेख आदींच्या पथकाने केली आहे.



राहुरी प्रतिनिधी दि.14 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे उपविभागीय कृषी अधिकारी श्री विलास नलगे व तालुका कृषी अधिकारी श्री महेंद्र ठोकळे यांच्या   मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी राहुरी अंतर्गत माहेगाव, पाथरे खुर्द, तिळापुर,मांजरी,वळण व पिंपरी वळण या गावांमध्ये क्रॉपसॅप योजने अंतर्गत हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी महाडीबीटी अंतर्गत प्रलंबित घटकांचा निपटारा  तसेच कांदा चाळ मोका तपासणी व उभारणी मार्गदर्शन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना मोका तपासणी, ई पीक पाहणी बाबत जागरूकता, तसेच हरभरा व कांदा पीक उत्पादन तंत्रज्ञान व किड व रोग नियंत्रण तसेच व्हेज नेट, अनार नेट व ग्रेप नेट नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले. त्यानंतर महाडीबीटी योजने मध्ये कालमर्यादा असल्याने विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी वेळेत कागदपत्रे भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री भिमराज गडदे, आकाश गोरे व मंगेश बनकर उपस्थित होते तसेच शेतकरी सर्वश्री गोरक्षनाथ लोखंडे, यमाजी जाधव, शुभम लोखंडे, सुदाम शेळके, अण्णासाहेब कोळेकर,अनिल मोरे, सुनील विटनोर,दादासाहेब लहारे, वैभव झरे, सागर शिंदे,  सुखदेव  आघाव,अनिल शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी श्री प्रशांत डहाळे यांनी केले याबाबत आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा.



.

अहमदनगर- शहरातील माळीवाडा परिसरातील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. सनि सुरजसिंग भोंड, चिक्या उर्फ रोहीत निवृत्ती मेहेत्रे व सोनु सुरजसिंग भोड अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि विवेक पवार, पोसई मनोज महाजन,सफौ मुनफन, चापोहेकाँ सतिष भांड, चासफौ अस्लम पठाण, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश कवाष्टे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना मुकुंद दुधाळ, पोकाँ अभय कदम, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ सोमनाथ राऊत, पोकाँ अतुल काजळे, पोकाँ याकुब सय्यद, पोकाँ संदीप थोरात, पोकाँ कवळे, पोकाँ केकान, पोकाॅ कैलास शिरसाठ, मपोकाॅ पुनम नरसाळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि १३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.३० वा च्या सुमारस पोलीस नियंत्रण कक्ष येथून वायरलेसव्दारे कॉल आला, माळीवाडा वेस येथील एसबीआयचे एटीएम हे कोणी तरी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार वायरलेस ड्युटी करीता असलेल्या मपोकाँ पुनम नरसाळे यांनी तात्काळ सदरचा संदेश पोलीस स्टेशनचे व्हाट्सअॅप ग्रुपवर प्रसारीत केला. संदेश मिळताच पोनि संपतराव शिंदे यांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होणे बाबत आदेश दिले. तेथे कोतवाली पथकाने तात्काळ ठिकाणी जाऊन पाहणी करता आरोपी सनि सुरजसिंग भोंड (वय २५ वर्ष रा संजयनगर काटवन खंडोबा अहमदनगर) हा SBI एटीएम मशीनचा खालील भाग हाताने ओढताना मिळून आला, त्यास जागीच ताब्यात घेतले. तसेच फरार आरोपी यांचा गुन्हे पथकातील कर्मचारी यांनी शोध घेतला असता चिक्या उर्फ रोहीत निवृत्ती मेहेत्रे (वय २५ वर्ष रा माळीवाडा हाजी सुलेमान गल्ली अहमदनगर), सोनु सुरजसिंग भोड (वय २२ वर्ष रा संजयनगर काटवन खंडोबा अ.नगर) हे मिळून आले आहेत. या घटनेबाबत पोना योगेश कवाष्टे यांनी दिलेल्या फियादी वरुन गुन्हा रजि क्रं ३७/२०२२ भादवि ३७९,५११,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पोना गणेश धोत्रे हे करीत आहेत.



अहमदनगर  प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील संतोष पठारे यांची पल्सर मोटार सायकल चोरीप्रकरणी नगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी पसार झाला आहे. पठारे यांची पल्सर बेलवांडी फाटा येथून ११ जानेवारीला चोरीस गेली होती. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ही मोटरसायकल चोरी सोमनाथ आव्हाड याने केल्याची माहिती नगर एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. तो पांढरीपुल येथे येणार असल्याची माहितीही त्यांना खबर्‍याने दिली.त्यानंतर त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे , हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप पवार, मनोज गोसावी, संदीप दरंदले, लक्ष्‍मन खोकले, सागर सासणे यांच्या पथकाने पंढरपूर येथे सापळा लावून सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धन नगर, तपोवन रोड, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील अशोक संजय गीते याला ताब्यात घेतले. तिसरा आरोपी सुधीर कडूबाल सरकाळे (रा. शहर टाकळी, शेवगाव) हा पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या आव्हाड व गीते यांच्या ताब्यातून दोन पल्सर आणि तीन रॉयल इनफिल्ड बुलेट अशा ४ लाख ८० हजार रुपयांच्या पाच मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले आहेत.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget