राहुरी प्रतिनिधी दि.14 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे उपविभागीय कृषी अधिकारी श्री विलास नलगे व तालुका कृषी अधिकारी श्री महेंद्र ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी राहुरी अंतर्गत माहेगाव, पाथरे खुर्द, तिळापुर,मांजरी,वळण व पिंपरी वळण या गावांमध्ये क्रॉपसॅप योजने अंतर्गत हरभरा पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी महाडीबीटी अंतर्गत प्रलंबित घटकांचा निपटारा तसेच कांदा चाळ मोका तपासणी व उभारणी मार्गदर्शन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना मोका तपासणी, ई पीक पाहणी बाबत जागरूकता, तसेच हरभरा व कांदा पीक उत्पादन तंत्रज्ञान व किड व रोग नियंत्रण तसेच व्हेज नेट, अनार नेट व ग्रेप नेट नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले. त्यानंतर महाडीबीटी योजने मध्ये कालमर्यादा असल्याने विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी वेळेत कागदपत्रे भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री भिमराज गडदे, आकाश गोरे व मंगेश बनकर उपस्थित होते तसेच शेतकरी सर्वश्री गोरक्षनाथ लोखंडे, यमाजी जाधव, शुभम लोखंडे, सुदाम शेळके, अण्णासाहेब कोळेकर,अनिल मोरे, सुनील विटनोर,दादासाहेब लहारे, वैभव झरे, सागर शिंदे, सुखदेव आघाव,अनिल शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी श्री प्रशांत डहाळे यांनी केले याबाबत आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तात्काळ संपर्क साधावा.
.
Post a Comment