अहमदनगर प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील संतोष पठारे यांची पल्सर मोटार सायकल चोरीप्रकरणी नगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी पसार झाला आहे. पठारे यांची पल्सर बेलवांडी फाटा येथून ११ जानेवारीला चोरीस गेली होती. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ही मोटरसायकल चोरी सोमनाथ आव्हाड याने केल्याची माहिती नगर एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. तो पांढरीपुल येथे येणार असल्याची माहितीही त्यांना खबर्याने दिली.त्यानंतर त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे , हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप पवार, मनोज गोसावी, संदीप दरंदले, लक्ष्मन खोकले, सागर सासणे यांच्या पथकाने पंढरपूर येथे सापळा लावून सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धन नगर, तपोवन रोड, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील अशोक संजय गीते याला ताब्यात घेतले. तिसरा आरोपी सुधीर कडूबाल सरकाळे (रा. शहर टाकळी, शेवगाव) हा पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या आव्हाड व गीते यांच्या ताब्यातून दोन पल्सर आणि तीन रॉयल इनफिल्ड बुलेट अशा ४ लाख ८० हजार रुपयांच्या पाच मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
Post a Comment