श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी भविष्यात शहराच्या दोन्ही बाजूला रेल्वे स्टेशन व तिकीट घर असणे आवश्यक-गुलाटी
श्रीरामपूर शहराची रचना दोन विभागांमध्ये विभागलेली आहे रेल्वेच्या अलीकडे आणि रेल्वेच्या पलीकडे असे दोन भाग श्रीरामपूर शहराचे आहेत आणि दोन्ही बाजूने शहर झपाट्याने वाढत आहे. बेलापुर रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व प्लॅटफॉर्म क्रमांक 2 असे दोन प्लॅटफॉर्म असून दररोज येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या 30 गाड्यांची आहे रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी रेल्वेच्या पलीकडील बाजूस रेल्वे स्टेशन व तिकीट घर अधिकृत एकच प्रवेशद्वार देण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आल्यास दादर ने चढून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आपल्या जवळ असलेल्या सामानाने जावे लागते बऱ्याच वेळेस तर रेल्वे येण्याच्या ऐन वेळी रेल्वे कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे अलाउन्ससिंग करण्यात येते त्यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ उडते व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वाढत असलेल्या शहराची रचना पाहता पुढील भविष्यासाठी दोन्ही बाजूला रेल्वे स्टेशन तसेच तिकीट घर असणे अत्यंत आवश्यक आहे तरच शहराचा विकास होणार आहे म्हणून रेल्वेच्या पलीकडील बाजूस प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर त्वरित रेल्वे स्टेशन व तिकीट घर उभारणी करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी व नगरसेवक राजेश अलघ यांनी केंद्रीय
रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सदर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाजूच्या रेल्वे पलिकडील रेल्वे स्टेशनची निर्मिती मागणी त्वरित मान्य होण्यासाठी शहरातील व्यापारी तसेच रेल्वे पलीकडे राहणारे गोंधवणी परिसर शिरजगाव परिसर खबड्डी तसेच संत लूक हॉस्पिटल परिसर कॉलेज पाठीमागील तसेच वार्ड नंबर दोन संपूर्ण परिसर येथील सर्व नागरिकांची एक मोठी मागणी असून या मागणीने जोर धरला असल्याचे रवींद्र गुलाटी यांनी सांगितले. याबाबत परिसरातील सर्व नागरिक तसेच राजकीय/ बिगर राजकीय वेगवेगळ्या संघटना तसेच व्यापारी यांचा एक शिष्टमंडळ रेल्वे सल्लागार समितीचे श्री रणजीत श्रीगोड यांना सोबत घेऊन लवकरच रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे खासदार सदाशिव लोखंडे खासदार सुजय विखे स्थानिक आमदार लहू कानडे तसेच सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर व सोलापूर डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे नगरसेवक राजेश अलघ यांनी यावेळी सांगितले.