श्रीरामपूर प्रतिनिधी:-श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर यांचे विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून, बलात्कार सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे Dy.s.p.संदीप मिटके यांच्याकडे होता. गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने यात काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या प्रमाणे Dy.s.p.संदीप मिटके यांनी
आपल्या नेहमीच्या शैलीत आरोपीला कुठल्याही प्रकारे सहानुभूती न दाखवता आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली.Dy.s.p संदीप मिटके यांनी केलेल्या कारवाईमुळे कायदा हा सर्वांसाठी समान व तसेच योग्य कारवाई झाल्याचे समाधान श्रीरामपुर मधील जनतेकडून व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.
Post a Comment