श्रीरामपूर (प्रतिनिधी)- मा.नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे युवा शहर उपाध्यक्ष फजल शेख यांनी संजय नगर परिसरातील मुळे प्राथमिक शाळा श्रीरामपूर ईदगाह रोड या ठिकाणी व्हॅक्सिनेशन शिबिर घेतले. या ठिकाणी नगरसेवक राजेंद्र पवार यांच्याने नेतृत्वाखाली व त्यांच्या सहकारी टीमच्या सहाय्याने संजय नगर इदगाह परिसर या भागातील नागरिकांना
लसीकरणासाठी घरोघरी जाऊन विनंती व जनजागृती करून त्यांची नोंदणी करून त्यांना कोरोना चे सर्व नियमांसह लाइन लावून व्हॅक्सिनेशन करून घेताना नगरसेवक राजेंद्र पवार सह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी 3 वाजेपर्यंत 350 च्या पुढे नागरिकांना व्हॅक्सिनेशन करून घेतले या कामाबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुकच केले यावेळी
नगरपालिका यांच्या वतीने रोहिणी उंडे आयेशा पठाण आरोग्य विभाग सौरभ जाधव तर आशा सेवीका रोहिणी पारखे, रेखा त्रिभुवन, तरंनुम खान ,हिना पठाण, यांनी खुप चांगल्याप्रकारे सेवा दिली सुरज सोनवणे,जावेद ईनामदार,अबूबकर बिनसाद ,शशिकांत खरात, सलीम पठाण ,अक्षय साळवे ,शुभम पवार, समी ईनामदार,सचिन गवळी व नगरपालिका चे आरोग्य विभाग कर्मचारी यांनी नागरिकांना उपस्थित राहून चांगली सुविधा दिली.
Post a Comment