Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी - शहरातील शिवाजी रोड हरी कमल प्लाझा येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे कै.ओम प्रकाश गुलाटी हॉल  मध्ये  स्ट्रायकर जिमचे उद्घाटन केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा निमंत्रित तसेच मा. उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांच्या हस्ते पार पडले  त्याप्रसंगी गुलाटी बोलत होते रवींद्र गुलाटी पुढे बोलताना म्हणाले की आजची तरुण युवा पिढी कुसंगती मुळे वेगळ्या मार्गाने जात असून तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने  वाढलेले दिसून येत आहे  व्यसनांमध्ये  गांजा अफीम  दारू सह इतर औषधी द्रव्य तसेच इंजेक्शनचा वापर करणाऱ्यांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहणी दरम्यान निर्देशनास येत आहे ऑनलाइन औषधे प्रणाली समाजासाठी घातक ठरत असून  नशा येणाऱ्या औषध द्रवे तसेच दिवसभर गुंगीत राहण्यासाठी सिरिंज द्वारे घेण्यात येणारे इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत असल्याने अश्या नशा करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे पालकांना आपल्या तरुण मुलांना सदर व्यसनापासून दूर करण्यासाठी  व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून मोठा खर्च करून ही कुठलाही उपयोग होत नसून मुले व्यसन केंद्रात जाऊन आल्यानंतरही इंजेक्शन व्यसनाची सवय जात नसल्याने युवक व्यसनाधीन झालेले दिसून येत आहेत  या व्यसनाच्या मार्ग अत्यंत भयंकर असून  नशा येणाऱ्या औषधी द्रव्य व इंजेक्शन्स  व्यसना मुळे भविष्यात  युवकांना शरीराचे अनेक साइड इफेक्ट्स भोगावे लागणारे आहेत  युवकांच्या या व्यसनामुळे बरेच कुटूंबे अडचणीत येऊन उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहिले  आहेत अश्या नशेबाज  व्यसन करणाऱ्या कुसंगती पासून युवकांनी दूर राहण्याचे तसेच व्यायामासाठी जिम जॉईन करण्याचे आवाहन गुलाटी यांनी यावेळी केले. केमिस्ट व  ड़्गीस्ट असोसिएशन ही व्यापारी संस्था समाज सेवेशी  जोडलेली संस्था असून नेहमीच समाजसेवेत अग्रेसर आहे शहरातील युवकांना विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना या जिम च्या माध्यमातून तसेच *नशा विरोधी प्रबोधनातून* चांगला लाभ मिळणार असल्याचे सांगून केमिस्ट असोसिएशनचे हे स्तुत्य समाजसेवेचे उपक्रम असल्याचे केमिस्ट असोसिएशनचे झोनल अध्यक्ष श्री शशांक रासकर यांनी  यावेळी सांगितले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत केमिस्ट असोसिएशन चे नाशिक झोन अध्यक्ष श्री शशांक रासकर, सुजित राऊत .ओम नारंग, जालिंदर भवर   बाळासाहेब  धीरंगे, राकेश सहानी निलेश परदेशी  स्ट्रायकर जिमचे संचालक व ट्रेनर तेजस शेलार  ओम धनगे, ॲड.अजय धाकतोडे,गणेश ससाणे,अर्जुन तिरमखे आदी उपस्थित होते शेवटी तेजस शेलार यांनी आभार मानले.


अहमदनगर प्रतिनिधी - गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून प्रभारी असलेल्या नगर शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार अनिल कातकडे यांनी स्वीकारला आहे. शहरातील वाढत्या चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची उकल करण्यात आलेले अपयश त्याचबरोबर पोलीस ठाण्यात वाढती गटबाजी रोखण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी कातकडे यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक ते उपअधीक्षक पदोन्नतीनंतर त्यांची नगर शहरासाठी नियुक्ती झाली आहे. पोलीस ठाण्यातील कामाचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्याचा उपयोग शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाण्यासाठी ते करतील, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर शहरातील चोरीच्या घटना, घरफोड्या, सावेडी उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.दुसरीकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तसेच शहरातील अवैध बायोडिझेल, कत्तलखाने, जुगार, दारूविक्री, गुटखा विक्री या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक पोलीस ठाण्याला आदेश देत किंवा स्वत: पथक स्थापन करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यापुढे आहे. चोर्‍या आणि अवैध धंद्यांबरोबर तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, अत्याचार अशा गुन्ह्यांत देखील वाढ झाली आहे. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यांच्या तपासाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान उपअधीक्षक कातकडे यांच्यासमोर आहे.


अहमदनगर प्रतिनिधी - करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना हद्दीत कारवाई करण्यात येत आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ओमिक्रॉन आणि कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक प्रतिबंध लागू केले आहेत. याबाबतची नियमावलीही जाहीर झाली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही प्रभारी अधिकार्‍यांना आपापल्या हद्दीत या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलिसांची सकाळ-संध्याकाळ कारवाई सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून दंड वसूल केला जात आहे.शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात तोफखाना पोलिसांनी रविवारी सकाळपासून नाकेबंदी करीत विनामास्क वाहनचालकांना अडवून दंड वसूल केला. गेले दोन ते तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवसांत सुमारे 53 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.



श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून नगरपालिकेचे काही माजी पदाधिकारी पदाचा गैरवापर करताना आढळून येत आहे. त्यांचा हस्तक्षेप त्वरीत बंद करावा, या मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासकिय अधिकारी अनिल पवार यांना दिले आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेष संदर्भ क्रमांक 1 अन्वये अंतर्भूत केलेल्या 317 (3) कलम मधील तरतुदीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपली असल्याने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी कार्यरत असलेल्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने माजी पदाधिकार्‍यांना जसे की नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या दालनासमोर नावाच्या पाट्या त्वरित काढून घेण्यात याव्यात.आजही माजी नगराध्यक्षा यांचे स्वीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. नगरपालिका कर्मचार्‍यांना धमकावत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कारभारावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून सदर व्यक्तींना नगरपालिका आवारात मज्जाव करण्यात यावा. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचे दालन तसेच समिती हॉल व जनरल मिटींग हॉल बंद करण्यात यावे. अशा आशयाचे विनंती निवेदन प्रशासकिय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छललारे, श्रीनिवासन बिहाणी, दिलीप नागरे,हाजी मुजफ्फर शेख, मनोज लबडे, श्रीमती भारती परदेशी, मिराताई रोटे, आशाताई रासकर यांच्या सह्या आहेत.


अहमदनगर-  जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसून, एकंदरीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माझ्या संकल्पनेतील टुप्लस योजना सर्वच पोलिस ठाण्यात  प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई केलीच, पण त्याच्या गुन्हेगारी हालचालीवर पोलिस प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवाता आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके, नूतन नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे हे उपस्थित होते.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज  पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाईसाठी अहमदनगर जिल्हयात २०११ पासून प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली.  योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधीत टुप्लस योजनेसाठी लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर आणि स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर येथे एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार यांची टुप्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून  मालाविषक ज्या दोनदोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०११ पासून माहीती संकलित करण्यात आली. शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०१५ पासून माहीती संकलित करण्यात आली.  संकलित केलेली माहीती टु प्लस पथकामार्फत टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली.अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीस ३८४९ (मालाविषयक-१९१४,शरीरविषयक -१९२७) आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये  समावेश करून त्यांची संकलित केलेली  माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.जानेवारी २०११ पासून ते आजपावेतो दैनंदिन अटक आरोपीमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक १९२७ ) आरोपी टुप्लस योजनेमध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली आहे.जानेवारी २०२१ पासून ते आजरोजी पर्यंत दैनंदिन अटक आरोपींमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक,५१०) आरोपी निष्पन्न करण्यात करण्यात आले असून आजपोवतो ४८४३ आरोपी वेबसाईटवर माहिती  भरण्यात आलेली आली आहे. ४८ ४३ आरोपीमध्ये मालाविरुद्ध एकूण २४०६ गुन्हेगार आहेत.  शरीराविरुध्द २४३६ गुन्हेगार आहेत. मालाविरूध्द गुन्हे करणारे २४०६ गुन्हेगारांमधून ५७० सराईत , प्रोफेशनल, व्यवसाईक गुन्हेगार निवडून त्यांची माहिती प्रोफेशनल क्रिमिनल वेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. अशा टुप्लस वेबसाईटवर सामाविष्ठ ४८४३ आरोपींमधून आजपावेतो मालाविषयक २५० व शरीरविषयक १५१ अशा एकूण ४०१ टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या आहे.  ज्या क्रियाशिल टोळया आहेत, अशा टोळयांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.आरोपींचे मेळावे घेतली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये  जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस ३८४१ आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये समावेश करण्यात आला.  अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपीचे मेळावे घेण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी समाज प्रबोधनकार कायदातज्ञ व्यक्ती, न्यायाधिश यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. काही ठिकाणी  स्वतः भेट देवून आरोपींना मार्गदर्शन केले. मेळाव्यात   आरोपीचे फोटो, फिंगर प्रिंट तसेच इतर माहीतीचे फॉर्म भरुण घेण्यात आले, असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.


मुंबई,नाशिक-गेल्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्याच्या चिंतेत भर पडलेली असतानाचा नाशिकमध्येही काल (दि ३०) ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे....राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टास्क फोर्स आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे  यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला  केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी  लागू करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.करोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील असेही काल मध्यरात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. राज्यात काल(दि ३०) एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर बेलापुर रोडवर असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या नेहे यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास आडीच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला                                              या बाबत मिळालेली माहीती अशी की सर्व प्रथम चोरट्यांनी प्रकाश पाटील नाईक याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु आवाजाने युवराज नाईक यांना जाग आली त्यांनी तातडीने घरातील सर्व लाईट लावले त्यामुळे चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला स्थानीक नागरीकांनी चोरट्यांना

पहाताच पोलीसांना फोन केला पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथुन पुढे सरकले त्या नंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम् साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवीला तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली दोन ते तीन लाथात तो लाकडी दरवाजा उघडला गेला चार जणांनी घरात प्रवेश केला एक जण बाहेर पहारा देत होता घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते त्यांना एका बाजुला बसवुन चोरट्यांनी घरात उघका पाचक केली घरातील सोन्याची अंगठी पपोत गळ्यातील मनीमंगळसूत्र कानातील झुबे असा चार तोळे दागीने व ५७ हजार रुपये रोख घेवुन चोरट्यांनी अवघ्या दहा मिनीटात तेथुन पोबारा केला पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले त्यामुळे त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला परंतु तोपर्यत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर कुऱ्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ हे पोलीस त्या दिशेने गेले परंतु तोपर्यत दरोडेखोर पसार झाले होते काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले अहमदनगर गुन्हा अन्वेषनची टिमही घटनास्थळी पोहोचली श्वानपथक तसेच ठसे तज्ञांनाही बोलविण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली चोरटे मराठीत बोलत होते पुष्पा नेहे यांच्या कानातील दागीना लवकर निघाला नाही त्या वेळी निघत नसेल तर राहु द्या काढु नका असेही दरोडेखोर म्हणाले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget