Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुरच्या सुजाण नागरीकांनी बहुमताने गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली आता गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आता गावाच्या विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.  दरवर्षी प्रमाणे गणपती गल्ली बेलापुर येथे अंगारकी चतुर्थी निमित्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी सत्काराला उत्तर देताना नवले बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  दिलीप काळे पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे माजी सरपंच भरत साळूंके सुनील मुथा  रणजीत श्रीगोड डाँक्टर सुधीर काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मंडळाचे संस्थापक कै .मनोज श्रीगोड  यांना अदरांजली  अर्पण करण्यात आली  त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमान्य मंडळाचे उपेंद्र कुलकर्णी सतीश काळे डाँक्टर सुधीर काळे योगेश शिंदे राजु काळे रघुनाथ वाघ शशिकांत औटी भगीरथ मुंडलीक राजु सुर्यवंशी आदिंसह लोकमान्य महीला मंचच्या महीलांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी जनता अघाडीचे नेते आबासाहेब नवले रविंद्र खटोड प्रफुल्ल डावरे राजाभाऊ काळे योगेश दायमाप्रभात कुऱ्हे समर्थ शिंदे विनीत दायमा आभिषेक बैरागी सुभाष अमोलीक  हरिप्रसाद मंत्री बाबुलाल मंत्री सुनिल डाकले प्रसाद कुलकर्णी रवि कडू मुस्ताक शेख प्रंशात मुंडलीक योगेश दायमा किशोर खरोटे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेंद्र कुलकर्णी यांनी केले तर किरण बैरागी यांनी आभार मानले.


शिर्डी (प्रतिनिधी)-7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आलेले असून करोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्यात आलेले होते. संस्थानच्यावतीने श्री साईप्रसादालय व लाडू प्रसाद वाटप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बानायत यांनी दिली.श्रीमती बानायत म्हणाल्या, जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 05 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. पुन्हा राज्य शासनाने दिनांक 07 ऑक्टोंबर 2021 पासून काही अटी शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संस्थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्याबाबात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा, अहमदनगर यांनी आदेश पारित केलेले होते.मात्र साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून श्री साईप्रसादालय सुरु करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार संस्थानच्यावतीने दिनांक 08 नोव्हेंबर 2021 व दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास अनुसरुन दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येवुन भाविकांसाठी श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे.उद्या शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्यात येणार असून सर्व साईभक्तांनी कोवीड-19 च्या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.



श्रीरामपूर : नजीकच्या काळात होवू घातलेल्या विविध निवडणूकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये या करिता राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून जास्तीत जास्त नवमतदारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात अनिल पवार यांनी म्हटले आहे की,०१ जानेवारी २०२२ वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार म्हणून यादीत नाव समविष्ट करू शकतो.नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमले आहेत.०५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत,तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी ,पत्रकार,सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी असे आवाहनही  अनिल पवार यांनी केले आहे.

आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ मध्ये होत असून यासाठी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दिनांक २७ व २८ नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आले आहे.यात नाव नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणे शक्य आहे.सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक उगले स्वतंत्रपणे निवडणूक शाखेत मदतकक्ष उभारून मतदारांच्या शंकांचे निरसन करत आहेत.दि. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ. अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवाशासाठी सुरक्षित व सुखरुप सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरुच असुन या संपास शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठींबा दर्शविला असुन शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेवुन संपावर तोडगा काढावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्या संपूर्ण राज्यात एस टी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांंचा शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरुच आहे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झालेली आहे खाजगी प्रवासी वहातुक करणारे सर्व सामान्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत सर्व सामान्यांना परवडणारी ही एकमेव सोय असतानाही शासनाने त्यांच्या मगणीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांचे आंदोलन लांबल्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेषकरुन विद्यार्थी दिव्यांग तसेच जेष्ठ नागरीक यांना मोठ्या सांकटाला तोंड द्यावे लागत आहे तरी शासनाने त्यांच्या योग्य मागण्यांची दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहै या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे तालुकाध्यक्ष बाबा कराड देविदास बटुळे श्रीकांत मोडके राजेंद्र वाल्हेकर ज्ञानदेव ठाकरे रामकिसन फुंदे शिवाजी काळे विठ्ठल गव्हाणे विक्रम गरड डी आर उंदरे एस टी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप लबडे जगन्नाथ पवार रसाळ आदिंच्या सह्या आहेत.



श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे.याकरिता दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीच्या” वतीने गांधी पुतळा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.आज दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी उपोषणाच्या 05 व्या दिवशी सकाळच्या सुमारास एक उपोषणकर्ते श्री.योगेश सोनार यांची प्रकृती खालावल्याने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

         ह्या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ या आमरण उपोषणाची 05 व्या दिवशी योग्य ती दखल घेतली. श्रीरामपूर चे तहसीलदार मा.श्री.प्रशांत पाटील,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.संजय सानप व श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.मधुकर साळवे यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट दिली व “ सर्व अवैध धंदे बंद केले असून कोठे अवैध धंदे चालू झाले तर तुम्ही त्या अवैध धंद्यांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू” अशा स्वरूपाचे लेखी पत्र चंद्रशेखर(चंदू) आगे यांना प्रशासनाने दिले.

त्यामुळे आमरण उपोषणाची योग्य ती दखल घेतल्यामुळे व पोलिसांनी लेखी पत्र देऊन कोणी अवैध धंदे चालू केले तर निदर्शनास आणुन द्यावे त्यांच्यावर कारवाई करू असे लेखी पत्र दिल्याने “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”चे उपोषणकर्ते चंद्रशेखर आगे व दीपक संत यांनी यावेळेस उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.यावेळी उसाचा रस उपोषणकर्त्यांना पाजुन प्रशासनाने या उपोषणाला पूर्णविराम दिला. दरम्यान साखर कामगार रुग्णालयात दाखल असलेले उपोषणकर्ते शिवप्रहार प्रतिष्ठान चा मावळा श्री.योगेश सोनार यांची प्रकृती स्थिर असल्याचे कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.जगधने यांनी सांगितले आहे.

आज रोजी उपोषण स्थळी स्वर्गीय अप्पासाहेब गांगड मित्र मंडळाच्या वतीने भेट देण्यात आली.



श्रीरामपूर:- Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 7800  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248  लिटर   व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450  किलो गुळ एक टेंपो व  एक दुचाकी असा एकूण 6,43,955  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे . त्यानुसार,

1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती  श्रीरामपूर

2)  सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर

3)  भीमराव काळे रा अशोक नगर ता  श्रीरामपूर

4)   दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर

5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर

6)  अशोक काशिनाथ शिंदे( फरार)

7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)

8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व  राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर   यांचेविरुध्द  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), (  इ) नुसार P.C.  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  मा.गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I.  हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया काल न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून सदरचा निकाल बुधवार दि. 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.पंचायत समितीचे सभापती पद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला.पंचायत समितीच्या सभापती संगिता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि. 9 नोव्हेंबर रोजी या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.पंचायत समितीत 50 टक्क्यापेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेसच्यावतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले,व कल्याणी कानडे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अ‍ॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत्त पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला.वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड.समीम बागवान यांनी काम पाहिले 



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget