बेलापुर (प्रतिनिधी )-प्रवाशासाठी सुरक्षित व सुखरुप सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरुच असुन या संपास शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठींबा दर्शविला असुन शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेवुन संपावर तोडगा काढावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.संघटनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्या संपूर्ण राज्यात एस टी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांंचा शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरुच आहे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत या आंदोलनामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झालेली आहे खाजगी प्रवासी वहातुक करणारे सर्व सामान्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत सर्व सामान्यांना परवडणारी ही एकमेव सोय असतानाही शासनाने त्यांच्या मगणीकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यांचे आंदोलन लांबल्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेषकरुन विद्यार्थी दिव्यांग तसेच जेष्ठ नागरीक यांना मोठ्या सांकटाला तोंड द्यावे लागत आहे तरी शासनाने त्यांच्या योग्य मागण्यांची दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहै या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे तालुकाध्यक्ष बाबा कराड देविदास बटुळे श्रीकांत मोडके राजेंद्र वाल्हेकर ज्ञानदेव ठाकरे रामकिसन फुंदे शिवाजी काळे विठ्ठल गव्हाणे विक्रम गरड डी आर उंदरे एस टी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप लबडे जगन्नाथ पवार रसाळ आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment