Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भारतीय जवान व पोलीस बांधवाच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी बेलापुर येथील ध्वजस्तंभाजवळ भारत मातेच्या प्रतिमेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले मेजर मारुती पुजारी देविदास देसाई शरद देशपांडे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड  माजी सरपंच भरत साळूंके,बाजार समिती संचालक सुधीर नवले, विलास मेहेत्रे अशोक पवार  या मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभावर पणत्या पेटविण्यात आल्या या वेळी मोहसिन सय्यद अजिज शेख विशाल आंबेकर गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव

वाबळे भिमराज हुडे दिलीप दायमा,अजीज शेख, मधुकर औचिते,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक, जिना शेख, बाबूलाल पठाण,शहानवाज सय्यद,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे मयुर साळूंके जयेंद्र खटोड राजेश सुर्यवंशी शशिकांत तेलोरे गोपाल जोशी विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव सुभाष शेलार विजय कोठारी निशिकांत लखोटीया प्रभात कुऱ्हे गोपाल सोमाणी महेश उंडे रामेश्वर कोतकर प्रशांत मुंडलीक महंत काळे योगेश जाधव सुमित सोमाणी साईनाथ शिरसाठ राम कुऱ्हे सुरेश जाधव आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर शशिकांत तेलोरे यांनी आभार व्यक्त केले.


श्रीरामपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संधी देणारे एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. या शाळा मागील दीड वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे कमी अधिक प्रमाणात चालू बंद अवस्थेत आहेत. नेहमी शाळेत बागडणारी विद्यार्थी अशा काळात घरी थांबून उबगली आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागून राहिली आहे.दरम्यानच्या काळात ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांना संधी मिळत त्या त्यावेळी विद्यार्थी शाळेत येण्याचा प्रयत्न करत.

एरव्ही दिवाळीच्या सुटीत शाळेकडे कधीही न फिरकणारी विद्यार्थी यावेळी मात्र दिवाळीच्या दिवशी चक्क शाळेत उपस्थित राहून दीपोत्सव साजरा केला.उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाचा दीपोत्सव शाळेत उपस्थित राहून आपल्या सवंगड्यासोबत साजरा केला. 

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी घरीं साजरी न करता शाळेतच दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.प्रमुख्याने कृतिशील शिक्षक शकील बागवान यांनी विद्यार्थ्यांना तसे आवाहनही केले होते.त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत मोठ्या आनंदमयी वातावरणात शाळेत दीप प्रज्वलन केले.ज्याप्रमाणे घरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने दीपप्रज्वलन करतात त्याच उत्साहाने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःसोबत पणत्या आणि इतर साहित्य घेऊन आले आणि शाळेच्या अर्थात ज्ञानमंदिराच्या प्रांगणात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केले.वर्गासमोर छानशी रांगोळी काढून सुशोभित केले.वर्गाला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधली.दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असताना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सभापती संगीता शिंदे,उपसभापती बाळासाहेब तोरणे,जिल्हा पारिषद सदस्य  शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,डॉ.वंदनाताई  मुरकुटे, सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओहोळ,जितेंद्र भोसले,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षणविस्ताराधिकारी संजीवन दिवे,मंदा दुरगुडे,केंद्रप्रमुख मंगल गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,मुख्याध्यापिका लता पालवे व पालक आदींनी विद्यार्थ्यांच्या  या कार्याचे कौतुक केले.शाळेतील शिक्षकवृंद मेघा साळवे,डॉ.राज जगताप,संघमित्रा रोकडे,संतोष जमदाडे आदींनी या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले व सहकार्य केले. 



अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागाचे अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले होते. या अतिदक्षता विभागाला आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे. 

आज जिल्हा रुग्णालयातील नवीन अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागाचे फायर ऑडिट झालेले नव्हते. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटना माहिती होताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली. तसेच धुराचे लोटही उठले. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 10 रुग्णांचा यात मृत्यू झाला. ऐन भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना स्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकुमार देशमुख आदींनी भेट दिली. रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


मृतांची नावे -रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे  अशी मृतांची नावे आहेत.



श्रीरामपूर प्रतिनिधी - ऐन दिवाळीच्या धामधुमीत गर्दीमध्ये सापडलेला सॅमसंग कंपनीचा पंचवीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत करण्याचा प्रामाणिकपणा रांजणखोल येथील सुरेश रामटेके यांनी दाखवला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची हकीकत अशी कि श्रीरामपूर तालुका गुरुमाऊली मंडळाचे कार्याध्यक्ष शाम पटारे हे आपली पत्नी स्वाती सह लक्ष्मीपूजनासाठी शिक्षक बँकेत जात होते. वाटेत मुलाला मिठाई घ्यावी म्हणून ते मेन रोडवर गेले आणि मिठाई घेऊन शिक्षक बँकेकडे रवाना झाले. त्याच वेळी सौ. यांना एक फोन आला. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी आपला फोन पर्समध्ये टाकला आणि त्या गाडीवर बसल्या. परंतु अनावधानाने तो


फोन पर्स ऐवजी खाली जमिनीवर पडला. त्यावेळी मेन रोडवर सकाळी दिवाळीच्या खरेदीची मोठी गर्दी असल्याने हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्याच वेळी रांजणखोल येथील टेलरिंग काम करणारे कारागीर सुरेश रामटेके व त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा ओम हे फटाके खरेदीसाठी मेन रोडवर आलेले होते.  चिरंजीव ओमला तो मोबाईल सापडला . त्याने तो वडिलांकडे दिला . त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका माणसाला हा मोबाईल तुमचा आहे का असे विचारले . त्याने नाही म्हणून सांगितले . त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शाम पटारे यांनी त्या नंबर वर फोन केला असता सुरेश रामटेके यांनी तो फोन घेतला . मोबाईल माझ्याकडे असून तो रोडवर सापडल्याचे त्यांनी सांगून कुठे आणून देऊ असा प्रश्न केला. पटारे यांनी आपण शिक्षक बँकेत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळामध्ये सुरेश रामटेके आपल्या मुलासह शिक्षक बँकेत गेले व तो मोबाईल सौ स्वाती शाम पटारे यांना परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे तेथे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख यांचे हस्ते बुके देऊन सुरेश रामटेके यांचा सत्कार करण्यात आला तसेच चिरंजीव ओम याला प्रामाणिकपणाचे बक्षीसही देण्यात आले. यावेळी बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल ,जगन्नाथ विश्वास ,

बाळासाहेब पाटोळे, गणेश पिंगळे, सुजित बनकर, ज्ञानदेव चौधरी, अनंत गोरे, श्री व सौ नारायणे, शाखाधिकारी फैय्याज पठाण, बापू भोर, किरण बैरागी उपस्थित होते.

ऐन दिवाळी सणाच्या गडबडीमध्ये एकीकडे मोबाईल चोर्‍या मोठ्या प्रमाणात होत असतांना प्रामाणिकपणे मोबाईल परत करून सुरेश रामटेके यांनी समाजात अजूनही प्रामाणिक लोक शिल्लक आहेत याचा प्रत्यय आणून दिला. त्याबद्दल त्यांचे माजी गट शिक्षणाधिकारी के एल पटारे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, जि प सदस्य बाबासाहेब दिघे, मुळा प्रवराचे संचालक अंबादास ढोकचौळे,राजूभाई इनामदार,अर्जुन बडोगे,राजू गायकवाड, शिवाजी भालेराव, दिपक शिंदे, चंद्रकांत बनकर,विजय शेळके,अमोल कल्हापुरे, रवि कांबळे, शाकिर शेख,

चंद्रकांत मोरे, सुनिल बागूल,अनिल ओहोळ,विजय काटकर, मारुती वाघ,संजय वाघ, प्रविण बडाख, सुरेश नागुडे आदींनी अभिनंदन केले आहे.



आज दिवाळी आली असून कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विविध सवलती द्वारे विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्यावर स्टॉल्स लावल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे शहरातील बस स्थानक रस्त्यावर इतर महत्त्वाच्या बाजारपेठे मध्ये मेन रोड,शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, व गावातील काही मुख्य बाजारपेठ या ठिकाणी कपडे, आकाश कंदील, फटाके, पणत्या, रांगोळी, सुगंधी तेल ,उटणे आदींचे स्टॉल मोठ्या

प्रमाणात उभारले आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठी खरेदी साठी विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजे दीपावली या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते विविध प्रकारचे तयार कपडे बालगोपाळांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य किराणा दुकान,

फराळाचे साहित्य मिठाईची दुकाने फटाके,आकाशकंदील, पूजेचे साहित्य, रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून मुख्य रस्त्यावर गर्दी वाढत आहे त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे शहरातील मेन रोड या ठिकाणी झाडू, लक्ष्मी मूर्ती, पणत्या विक्रेत्यांनी आपली कला दाखवत मोठ्या प्रमाणात स्टॉल मांडले आहेत विविध आकारातील आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकटच सर्वच सणांवर कोसळले होते. कोरोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मोबाईल, टीव्ही, वॉटर प्युरिफायर, आटाचक्की,मायक्रोवेव ओव्हन, वाशिंग मशीन, फ्रिज आधी घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक फायनान्सला पसंती देताना दिसत आहेत यामुळे घरगुती वस्तूंचा दुकाने मध्ये सुद्धा खरेदी व विक्री ची मोठी झुंबड दिसत आहे.


अहमदनगर (प्रतिनिधी )जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसतानाही आरोग्य सेवा देणारे बोगस डॉक्टर आता जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत. जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां शोेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. दर्शना धोंडे, मनपा आरोग्य अधिकारी राजुरकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनील पोटे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब सांळुके आदी उपस्थित होते.


श्रीरामपुर:-नगरसेवक राजेंद्र पवार चॅम्पियन शिप जिल्हास्तरीय 2019 22 श्रीरामपुर संस्कार स्पोर्ट्स क्लब आयोजित मार्शल आर्ट तिसरी जिल्हास्तरीय टूर्नामेंट याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार तसेच संस्कार स्पोर्ट्स क्लब अकॅडमीचे कलीम बिनसाद, प्रवीण कुदळे, आकाश शिंदे हे मंचावर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमात 130 होऊन अधिक मुलांनी सहभाग नोंदविला यामध्ये जास्त करून मुलींचा सहभाग जास्त होता कार्यक्रम हा यशस्वीरीत्या संपन्न.

व्हिडिओ पाहण्याकरिता फोटो क्लिक करा




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget