रांजणखोलच्या सुरेश रामटेके यांचा प्रामाणिकपणा सापडलेला मोबाईल केला परत.

श्रीरामपूर प्रतिनिधी - ऐन दिवाळीच्या धामधुमीत गर्दीमध्ये सापडलेला सॅमसंग कंपनीचा पंचवीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत करण्याचा प्रामाणिकपणा रांजणखोल येथील सुरेश रामटेके यांनी दाखवला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची हकीकत अशी कि श्रीरामपूर तालुका गुरुमाऊली मंडळाचे कार्याध्यक्ष शाम पटारे हे आपली पत्नी स्वाती सह लक्ष्मीपूजनासाठी शिक्षक बँकेत जात होते. वाटेत मुलाला मिठाई घ्यावी म्हणून ते मेन रोडवर गेले आणि मिठाई घेऊन शिक्षक बँकेकडे रवाना झाले. त्याच वेळी सौ. यांना एक फोन आला. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी आपला फोन पर्समध्ये टाकला आणि त्या गाडीवर बसल्या. परंतु अनावधानाने तो


फोन पर्स ऐवजी खाली जमिनीवर पडला. त्यावेळी मेन रोडवर सकाळी दिवाळीच्या खरेदीची मोठी गर्दी असल्याने हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्याच वेळी रांजणखोल येथील टेलरिंग काम करणारे कारागीर सुरेश रामटेके व त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा ओम हे फटाके खरेदीसाठी मेन रोडवर आलेले होते.  चिरंजीव ओमला तो मोबाईल सापडला . त्याने तो वडिलांकडे दिला . त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका माणसाला हा मोबाईल तुमचा आहे का असे विचारले . त्याने नाही म्हणून सांगितले . त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शाम पटारे यांनी त्या नंबर वर फोन केला असता सुरेश रामटेके यांनी तो फोन घेतला . मोबाईल माझ्याकडे असून तो रोडवर सापडल्याचे त्यांनी सांगून कुठे आणून देऊ असा प्रश्न केला. पटारे यांनी आपण शिक्षक बँकेत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळामध्ये सुरेश रामटेके आपल्या मुलासह शिक्षक बँकेत गेले व तो मोबाईल सौ स्वाती शाम पटारे यांना परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे तेथे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख यांचे हस्ते बुके देऊन सुरेश रामटेके यांचा सत्कार करण्यात आला तसेच चिरंजीव ओम याला प्रामाणिकपणाचे बक्षीसही देण्यात आले. यावेळी बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल ,जगन्नाथ विश्वास ,

बाळासाहेब पाटोळे, गणेश पिंगळे, सुजित बनकर, ज्ञानदेव चौधरी, अनंत गोरे, श्री व सौ नारायणे, शाखाधिकारी फैय्याज पठाण, बापू भोर, किरण बैरागी उपस्थित होते.

ऐन दिवाळी सणाच्या गडबडीमध्ये एकीकडे मोबाईल चोर्‍या मोठ्या प्रमाणात होत असतांना प्रामाणिकपणे मोबाईल परत करून सुरेश रामटेके यांनी समाजात अजूनही प्रामाणिक लोक शिल्लक आहेत याचा प्रत्यय आणून दिला. त्याबद्दल त्यांचे माजी गट शिक्षणाधिकारी के एल पटारे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, जि प सदस्य बाबासाहेब दिघे, मुळा प्रवराचे संचालक अंबादास ढोकचौळे,राजूभाई इनामदार,अर्जुन बडोगे,राजू गायकवाड, शिवाजी भालेराव, दिपक शिंदे, चंद्रकांत बनकर,विजय शेळके,अमोल कल्हापुरे, रवि कांबळे, शाकिर शेख,

चंद्रकांत मोरे, सुनिल बागूल,अनिल ओहोळ,विजय काटकर, मारुती वाघ,संजय वाघ, प्रविण बडाख, सुरेश नागुडे आदींनी अभिनंदन केले आहे.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget