Latest Post

अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागाचे अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले होते. या अतिदक्षता विभागाला आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे. 

आज जिल्हा रुग्णालयातील नवीन अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागाचे फायर ऑडिट झालेले नव्हते. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटना माहिती होताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली. तसेच धुराचे लोटही उठले. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 10 रुग्णांचा यात मृत्यू झाला. ऐन भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना स्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकुमार देशमुख आदींनी भेट दिली. रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


मृतांची नावे -रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे  अशी मृतांची नावे आहेत.



श्रीरामपूर प्रतिनिधी - ऐन दिवाळीच्या धामधुमीत गर्दीमध्ये सापडलेला सॅमसंग कंपनीचा पंचवीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत करण्याचा प्रामाणिकपणा रांजणखोल येथील सुरेश रामटेके यांनी दाखवला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबतची हकीकत अशी कि श्रीरामपूर तालुका गुरुमाऊली मंडळाचे कार्याध्यक्ष शाम पटारे हे आपली पत्नी स्वाती सह लक्ष्मीपूजनासाठी शिक्षक बँकेत जात होते. वाटेत मुलाला मिठाई घ्यावी म्हणून ते मेन रोडवर गेले आणि मिठाई घेऊन शिक्षक बँकेकडे रवाना झाले. त्याच वेळी सौ. यांना एक फोन आला. फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी आपला फोन पर्समध्ये टाकला आणि त्या गाडीवर बसल्या. परंतु अनावधानाने तो


फोन पर्स ऐवजी खाली जमिनीवर पडला. त्यावेळी मेन रोडवर सकाळी दिवाळीच्या खरेदीची मोठी गर्दी असल्याने हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्याच वेळी रांजणखोल येथील टेलरिंग काम करणारे कारागीर सुरेश रामटेके व त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा ओम हे फटाके खरेदीसाठी मेन रोडवर आलेले होते.  चिरंजीव ओमला तो मोबाईल सापडला . त्याने तो वडिलांकडे दिला . त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका माणसाला हा मोबाईल तुमचा आहे का असे विचारले . त्याने नाही म्हणून सांगितले . त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शाम पटारे यांनी त्या नंबर वर फोन केला असता सुरेश रामटेके यांनी तो फोन घेतला . मोबाईल माझ्याकडे असून तो रोडवर सापडल्याचे त्यांनी सांगून कुठे आणून देऊ असा प्रश्न केला. पटारे यांनी आपण शिक्षक बँकेत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळामध्ये सुरेश रामटेके आपल्या मुलासह शिक्षक बँकेत गेले व तो मोबाईल सौ स्वाती शाम पटारे यांना परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे तेथे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख यांचे हस्ते बुके देऊन सुरेश रामटेके यांचा सत्कार करण्यात आला तसेच चिरंजीव ओम याला प्रामाणिकपणाचे बक्षीसही देण्यात आले. यावेळी बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल ,जगन्नाथ विश्वास ,

बाळासाहेब पाटोळे, गणेश पिंगळे, सुजित बनकर, ज्ञानदेव चौधरी, अनंत गोरे, श्री व सौ नारायणे, शाखाधिकारी फैय्याज पठाण, बापू भोर, किरण बैरागी उपस्थित होते.

ऐन दिवाळी सणाच्या गडबडीमध्ये एकीकडे मोबाईल चोर्‍या मोठ्या प्रमाणात होत असतांना प्रामाणिकपणे मोबाईल परत करून सुरेश रामटेके यांनी समाजात अजूनही प्रामाणिक लोक शिल्लक आहेत याचा प्रत्यय आणून दिला. त्याबद्दल त्यांचे माजी गट शिक्षणाधिकारी के एल पटारे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,पत्रकार लालमोहम्मद जहागीरदार, जि प सदस्य बाबासाहेब दिघे, मुळा प्रवराचे संचालक अंबादास ढोकचौळे,राजूभाई इनामदार,अर्जुन बडोगे,राजू गायकवाड, शिवाजी भालेराव, दिपक शिंदे, चंद्रकांत बनकर,विजय शेळके,अमोल कल्हापुरे, रवि कांबळे, शाकिर शेख,

चंद्रकांत मोरे, सुनिल बागूल,अनिल ओहोळ,विजय काटकर, मारुती वाघ,संजय वाघ, प्रविण बडाख, सुरेश नागुडे आदींनी अभिनंदन केले आहे.



आज दिवाळी आली असून कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विविध सवलती द्वारे विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये व्यापाऱ्यांनी रस्त्यावर स्टॉल्स लावल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे शहरातील बस स्थानक रस्त्यावर इतर महत्त्वाच्या बाजारपेठे मध्ये मेन रोड,शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, व गावातील काही मुख्य बाजारपेठ या ठिकाणी कपडे, आकाश कंदील, फटाके, पणत्या, रांगोळी, सुगंधी तेल ,उटणे आदींचे स्टॉल मोठ्या

प्रमाणात उभारले आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठी खरेदी साठी विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजे दीपावली या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते विविध प्रकारचे तयार कपडे बालगोपाळांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य किराणा दुकान,

फराळाचे साहित्य मिठाईची दुकाने फटाके,आकाशकंदील, पूजेचे साहित्य, रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून मुख्य रस्त्यावर गर्दी वाढत आहे त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे शहरातील मेन रोड या ठिकाणी झाडू, लक्ष्मी मूर्ती, पणत्या विक्रेत्यांनी आपली कला दाखवत मोठ्या प्रमाणात स्टॉल मांडले आहेत विविध आकारातील आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकटच सर्वच सणांवर कोसळले होते. कोरोणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मोबाईल, टीव्ही, वॉटर प्युरिफायर, आटाचक्की,मायक्रोवेव ओव्हन, वाशिंग मशीन, फ्रिज आधी घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक फायनान्सला पसंती देताना दिसत आहेत यामुळे घरगुती वस्तूंचा दुकाने मध्ये सुद्धा खरेदी व विक्री ची मोठी झुंबड दिसत आहे.


अहमदनगर (प्रतिनिधी )जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसतानाही आरोग्य सेवा देणारे बोगस डॉक्टर आता जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत. जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां शोेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. दर्शना धोंडे, मनपा आरोग्य अधिकारी राजुरकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनील पोटे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब सांळुके आदी उपस्थित होते.


श्रीरामपुर:-नगरसेवक राजेंद्र पवार चॅम्पियन शिप जिल्हास्तरीय 2019 22 श्रीरामपुर संस्कार स्पोर्ट्स क्लब आयोजित मार्शल आर्ट तिसरी जिल्हास्तरीय टूर्नामेंट याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार तसेच संस्कार स्पोर्ट्स क्लब अकॅडमीचे कलीम बिनसाद, प्रवीण कुदळे, आकाश शिंदे हे मंचावर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमात 130 होऊन अधिक मुलांनी सहभाग नोंदविला यामध्ये जास्त करून मुलींचा सहभाग जास्त होता कार्यक्रम हा यशस्वीरीत्या संपन्न.

व्हिडिओ पाहण्याकरिता फोटो क्लिक करा




बेलापुर  (प्रतिनिधी  )-अनेकाच्या जिवन प्रवासात साथ देणारी लालपरी अर्थात एसटी बसचे अस्तित्व धोक्यात आले असुन एसटी महामंडळ डबघाईस येण्यास कोण जबाबदार ?असा सवाल प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केला आहे          या बाबत बोलताना श्रीगोड म्हणाले की अनेकाचे प्रपच भवितव्य हे एसटी बसवर अवलंबुन आहे

एस टी महामंडळ राज्याची जीवन वाहिनी आहे त्यावर सर्वजण अवलंबून असतो असा कोणी नाही की  त्याने एस टी मधून प्रवास केला नाही एस टी मुळे ग्रामीण भागातील मुले व मुली सवलतीमुळे शिकले आज ते शासनात मोठे अधिकारी व पुढारी बनले 1948 नंतर  प्रथमच एसटी महामंडळाची इतकी वाईट अवस्था झाली आहे एस टीच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा व्हावी असे कुणालाच वाटत नाही  युती काळातील  विरोधीपक्ष नेत्यांनी   विधान सभेतील 7 वा आयोग देण्याची   भाषणे ठोकली होती  त्यावेळी सत्तारूढ पक्षातील लोकप्रतिनिधी गप्प होतें त्यावेळी  एस  टी विषयी पुळका दाखविणारे आज मंत्री आहेत कर्मचारी आत्महत्या करीत असताना ते गप्प आहेत म्हणजे महाविकास आघाडी चे लोकप्रतिनिधी डोळ्यास पट्टी बांधून बसले आहे शेतकरी आत्महत्या आपण पहात आलो आता एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत या घटनेस जबाबदार कोण आहे याचे मंथन करण्याची वेळ आलेली आहे एसटी महामंडळावर त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ का यावी हे एक कोडेच आहे    यात एकच दिसून येते की एस टी जिवंत राहावी असे कोणालाच वाटत नाही  एस टी बंद  पडली तर  गरीब प्रवासी  विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होणार आहे  मी या निमित्ताने विंनती करतो की अजूनही वेळ आहे  प्रवासी व अधिकारी सेवक यांनी संघटित होऊन जनशक्तीचा दबाव गट तयार करण्याची गरज आहे  अनावश्यक होणारी उधळपट्टी ला प्रशासनाने विरोध करण्याचे धाडस दाखविले पाहिजे अपघात सहायत्ता  विश्वस्त योजना कारभार पारदर्शक करावा  500 कोटी रुपये गुंतवणूक करून दरवर्षी व्याज जमा करावे पण अधीकारी दिशाभूल करतात याचे वाईट  वाटते एस टी मजबूत करण्यासाठी प्रवासी व कर्मचारी हितासाठीच संघटित होवुन एसटी वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी असे अवाहनही श्रीगोड यांनी केले आहे.


बेलापूर(वार्ताहर)सहकारी संस्था सामाजिक  संस्था असल्याने कारभार पाहणाऱ्या प्रतिनिधींनी सभासदांभिमुख सचोटीने कार्यक्षम कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेलापूर सेवा सहकारी सोसायटी होय,असे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक व श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काढले.

बेलापूर बुद्रुक सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ९३३ सभासदांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी पंधरा किलो साखर, पंधरा टक्के लाभांश आणि मिठाई तसेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनसचे वितरण शुभारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर होते.

यावेळी बोलताना गुजर म्हणाले की,बऱ्याचदा चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने गैरकारभारामुळे सहकार क्षेत्र बदनाम होताना दिसते.मात्र बेलापूर सोसायटीने सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहुन कारभार केल्यामुळे आज संस्था विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.या क्षेत्रात विश्वास जागवून तो वृद्धिंगत करण्याची गरज आहे.

बाजार समितीचे संचालक व संस्थेचे मार्गदर्शक सुधीर नवले यांनी  संस्थेचे कामकाज आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरूण पा. नाईक यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी  संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर पा. खंडागळे, विलास मेहेत्रे, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,आदींनी आपल्या मनोगतातून सुचना केल्या.

यावेळी सर्वश्री त्र्यंबकराव कु-हे,शेषराव पवार, प्रकाश नाईक, द्वारकानाथ बडधे, अजय डाकले, दत्ता कु-हे,गोरक्षनाथ कु-हे,विश्वनाथ गवते,प्रकाश कु-हे,जालिंदर गाढे, ज्ञानदेव वाबळे, पंडितराव बोंबले,प्रकाश मेहेत्रे,सोपान कु-हे,एस. के. कु-हे ,दीपक निंबाळकर, चंद्रकांत नाईक, पत्रकार अशोक गाडेकर,मारुतराव राशीनकर,प्रा. ज्ञानेश गवले,देविदास देसाई,सुहास शेलार, दीपक क्षत्रिय, दिलीप दायमा बाळासाहेब भांड, भाऊसाहेब तेलोरे, विजय शेलार, बंटी शेलार, बाळासाहेब लगे, अय्याज शेख, वैभव कु-हे,संजय गोसावी,सचिव विजय खंडागळे आदींसह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.साखर, लाभांश, बोनस व मिठाई मिळुन संस्थेच्या वतीने सुमारे अकरा लाख रुपयांचे सभासदांना वाटप करण्यात आले.संस्थेचे चेअरमन अनिल नाईक यांनी प्रास्ताविक केले तर व्हा चेअरमन कलेश सातभाई यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget