श्रीरामपुर:-नगरसेवक राजेंद्र पवार चॅम्पियन शिप जिल्हास्तरीय 2019 22 श्रीरामपुर संस्कार स्पोर्ट्स क्लब आयोजित मार्शल आर्ट तिसरी जिल्हास्तरीय टूर्नामेंट याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माननीय नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार तसेच संस्कार स्पोर्ट्स क्लब अकॅडमीचे कलीम बिनसाद, प्रवीण कुदळे, आकाश शिंदे हे मंचावर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमात 130 होऊन अधिक मुलांनी सहभाग नोंदविला यामध्ये जास्त करून मुलींचा सहभाग जास्त होता कार्यक्रम हा यशस्वीरीत्या संपन्न.
व्हिडिओ पाहण्याकरिता फोटो क्लिक करा
बेलापूर बुद्रुक सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ९३३ सभासदांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी पंधरा किलो साखर, पंधरा टक्के लाभांश आणि मिठाई तसेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनसचे वितरण शुभारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर होते.
यावेळी बोलताना गुजर म्हणाले की,बऱ्याचदा चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने गैरकारभारामुळे सहकार क्षेत्र बदनाम होताना दिसते.मात्र बेलापूर सोसायटीने सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहुन कारभार केल्यामुळे आज संस्था विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे.या क्षेत्रात विश्वास जागवून तो वृद्धिंगत करण्याची गरज आहे.
बाजार समितीचे संचालक व संस्थेचे मार्गदर्शक सुधीर नवले यांनी संस्थेचे कामकाज आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अरूण पा. नाईक यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर पा. खंडागळे, विलास मेहेत्रे, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,आदींनी आपल्या मनोगतातून सुचना केल्या.
मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडत असते. कोरोना चे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने सदरची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर
बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढ नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार मध्ये महिला मोठ्या संख्येने खरेदी करता येत असतात हे ध्यानात घेता कापड बाजारांमध्ये अतिरिक्त महिला पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे असे DySP संदीप मिटके यांनी कळविले.
व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे. बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप व Dysp संदीप मिटके यांनी कापड बाजारांमध्ये पायी फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. सदरच्या बैठकीस आमदार संग्राम जगताप, Dysp संदीप मिटके, PI संपत शिंदे,PI ज्योती गडकरी,PI भोसले, API देशमुख, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे संभव काठेड, कुणाल नारंग, ईश्वर बोरा , प्रतीक बोगवत , विजय गुगळे, विक्रम मुथा, आनंद मुथा, रवी कितनी, धीरज पोखर्णा, केतन मुथा, संजय चोपडा, विशाख वैद्य, प्रकाश बायड, संजय बोगावत , रवी कराचीवाला , धीरज मुनोत , दीपक नावालानी उपस्थित होते.