सोशल मिडीयातुन सोशल वर्क मयताच्या कुटुंबीयांना मिळाला तीन लाख रुपये मदतीचा हात.
सविस्तर असे कि, तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुटुंबातील तरुण कै.विलास देसाई हा दोन महिन्यापूर्वी महावितरण विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिटकून दुर्दैवी निधन झाले होते त्याच्या वडिलांचे अकरा महिन्यापूर्वीच निधन झाले होते, त्यात घरामधील एकटा कमवता असलेला तरुण मुलगा गेल्याने मयत विलासची आई, पत्नी, २ मुली व १ मुलगा यांच्यापुढे आभाळ च फाटले होते.मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने पत्रकार देविदास देसाई व कृष्णा देसाई यांनी सुचविल्या प्रमाणे नाशिक येथील गणगोत ग्रुपचे ॲडमिन राहुल क्षीरसागर व नाऊर येथील पत्रकार संदिप जगताप ग्रुप ॲडमिन असलेले स्वामी सहजानंद भारती या ग्रुपच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या सह पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष देविदास देसाई यांच्या सर्वांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख 89 हजार इतकी रोख रक्कम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून थोर देणगीदारांच्या सहकार्याने जमा करण्यात आली. तसेच ठाणे येथील उद्योजक मंगेश जी नवले यांनी मयत विलासच्या घराला छत नसल्याने तत्परतेने ३० हजाराची मदत करून घरावरील अँगल , पत्रे व इतर वस्तु घेऊन दिल्याने मोठा आधार निर्माण झाला.