श्रीरामपूर (वार्ताहर)जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांचा सत्कार शिर्डी व कोपरगाव येथील पत्रकारांनी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात जाऊन केला, बुधवार दिनांक 20 10 2021 रोजी पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शेख बरकत आली यांचा सत्कारार्थी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख बरकत अली हे होते अध्यक्ष स्थानाची सूचना
कासम शेख यांनी मांडली त्यास अनुमोदन नरेंद्र पाटील यांनी दिले या सत्काराच्या कार्यक्रमास पत्रकार विजय खरात ,रवींद्र जगताप, संदीप गोरे, अनिल गांगुर्डे ,राहुल कोकणे, एजाज भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, राज मोहम्मद शेख, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद ,पेपर मास्टर अकबर शेख, रियाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार खरात, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील ,आदींनी शाल श्रीफळ बुके व हार देऊन बरकत अली यांचा सत्कार केला उपस्थितांसमोर शेख बरकत अली, रवींद्र जगताप, नरेंद्र पाटील, कासम भाई शेख, असलम बिन साद ,एजाज सय्यद आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय भाषणात शेख बरकत आली यांनी सांगितले की राहता व शिर्डी येथील पत्रकारांनी मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार केला असून विशेषता त्यांनी त्यांच्या परिसरातील गोरगरीब अन्याय पीडित व तळागाळातील लोकांच्या कामाची जबाबदारी आपल्यावर टाकली असून ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून त्यांची विश्वास पुरती करू ज्या प्रमाणे आपण गेल्या 29 वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून अन्याय पीडित जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करीत असून विशेषता पत्रकारांवर बातमी छापल्या च्या रोष आत्मक भूमिकेतून ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत अगर त्यांच्यावर दावे दाखल झाले आहेत व पत्रकारांना मारहाण झाली आहे अशा ठिकाणी पत्रकार संघाचा ग्रुप त्यांच्या पाठीशी उभा राहून अशा संकटातून त्यांची सुटका करतो व त्यांना न्याय मिळवून देतो अशा पद्धतीने आपण मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार रवींद्र जगताप यांनी आपल्या भाषणात सध्या ओबीसी, एसटी, एन टी व अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांची दुर्दशा झालेली असल्याचे सांगून या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असल्याने अशा समाजातील पीडित जनतेकडे मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून शेख यांनी न्याय निवाडा केल्यास त्यांच्यावरील अन्याय नक्कीच थांबतील असे ते म्हणाले या बैठकीस बेलापूर व श्रीरामपूर भागातील पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार रामगड येथील पत्रकार राज मोहम्मद शेख यांनी मानले.
Post a Comment