गटविकास अधिकाऱ्यांच्या अश्वासनामुळे बेलापुरातील ते उपोषण स्थगीत.
बेलापुर (प्रतिनिधी )-ग्रामपंचायतीचा जसजसा वसुल होईल त्या प्रमाणे मागासवर्गीय निधी व इतर निधीचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येईल आसे अश्वासन गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी दिल्यामुळे आपल्या उचित मागण्यासाठी दलीत बांधवांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय १५% फंडातील निधीतुन मागासवर्गीय कुटुंबाला लाभ न दिल्याच्या निषेधार्थ विजय शेलार संजय शेलार भाऊसाहेब तेलोरे यांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक जावेद शेख अय्याज सय्यद अकील बागवान अनिल पवार हारुन शेख भुषण चंगेडीया यांनी उपोषणास पाठींबा दर्शविला होता प्रज्ञा तेलोरे सिमा हिरण जाईबाई तेलोरे मिना पारखे हिराबाई मोरे सिमा तेलोरे दामीनी गायकवाड चंदाबाई खरात सुभीद्रा खरात लता तेलोरे बेबी अमोलीक मंगल साठे रोहण शेलार रमेश शेलार विजु तेलोरे नितीन तेलोरे राहुल तेलोरे हे ही उपोषण कर्त्याबरोबर उपोषणास बसले होते दलीत समाजाने आपल्या योग्य मागण्यासाठी सुरु केलेल्या उपोषणाची आमदार लहु कानडे यांनी तातडीने दखल घेवुन या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस टि पी ओ आर डी अभंग हे बेलापुर येथे आले त्यांनी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्याशी चर्चा केली त्या वेळी निधी अभावी मागासवर्गीयांच्या निधीचे वाटप करता आले नसल्याचे तगरे यांनी गटविकास अधिकारी धस यांच्या निदर्शनास आणून दिले त्या वेळी जसा निधी उपलब्ध होईल तसे १५ % मागासवर्गीय निधीचे वाटप करण्यात येईल असे अश्वासन गटविकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्यांना दिले या अश्वासनावर उपोषणकर्त्याचे समाधान झाल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.