पारनेरला १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा उध्वस्त अहमदनगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई!
अहमदनगर-पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यामध्ये अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठी धडाकेबाज कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा उध्वस्त करण्यात आलाय.
एलसीबीचे पो. नि. कटके यांच्या पथकातल्या पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक संदीप पवार, संतोष लोंढे, पो. काँ. जालिंदर माने, कमलेश पाथरुट, राहूल सोळुंके, सागर सुलाने आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. दि. १ आणि २ आक्टोबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पो. नि. कटके यांना अवैध दारुसाठ्याविषयीची माहिती मिळाली होती. या कारवाईत सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संतोष मधुकर साळवे, अनिल सिताराम विधाटे, पंडा रामभाऊ खांडवे, दत्तात्रय तिकोले, नितीन मारुती साळवे, संभाजी विठ्ठल गव्हाणे या गुन्हेगारांचा समावेश आहे.