Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपापसात होणारे मतभेद हे वादाचे मुख्य कारण असुन या कारणामुळेच न्यायालयात खटले जास्त तर न्यायाधिशांची संख्या कमी त्यामुळे न्यायालयावर कामाचा ताण येत असल्याचे मत तदर्थ जिल्हा न्यायाधिश १ व सहाय्यक सत्र न्यायाधिश बी बी तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.  मा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील कार्यक्रमानुसार तालुका विधी सेवा समीती श्रीरामपुर वकील संघ व बेलापुर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी शिबीराच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्यायाधीश

बी बी तोष्णीवाल म्हणाले की मतभेदातून होणारे वाद हे जागेवरच मिटले पाहीजे त्या करीता मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे दिवाणी फौजदारी महीला विषयक कौटुंबिक वाद मध्यस्थामार्फत सोडविले जातील त्यामुळे वेळेची बचत होईल कायद्याने आता मुलाप्रमाणेच मुलींनाही समान अधिकार दिलेले आहेत अनेकांना आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाता येत नाही त्यांना कायदेविषयक ज्ञान देण्याकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन असे उपक्रम वर्षभर सुरु राहणार असल्याचे न्यायाधीश तोष्णीवाल यांनी सांगितले २ रे सह दिवाणी न्यायाधीश सौ एस व्ही मोरे शिबीरार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की  समाजात महीलावरील अत्याचारात दररोज वाढ होताना दिसत आहे केवळ अशिक्षित लोक हे गुन्हे करतात असे नाही सुशिक्षित कायद्याचे ज्ञान असणारे लोकही गुन्हे करत आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बालविवाहचा कायदा झालेला असतानाही बालविवाह होतात ही शोकांतीका आहे महीलांना पोटगीचा अधिकार दिलेला आहे अनेक कायदे हे नागरीकांच्या भल्यासाठी केले जातात परंतु काही ठिकाणी त्याचा गैरवापर केला जातो या सर्वावर नियंत्रण आणावयाचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मुलावर कुटुंबावर चांगले संस्कार करण्याची गरज असल्याचे मत न्यायाधीश सौ एस व्ही मोरे यांनी व्यक्त केले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.पी पी गटणे पोलीस निरीक्षक संजय सानप अँड एस आर बिहाणी अँड .जगन्नाथ राठी ,अँड.सुहास चुडीवाल ,अँड. मनिषा वर्मा ,अँड. पंकज म्हस्के,अँड.ईजाज शेख अँड अविनाश भोकरे ,अँड वैभव खंडागळे ,अँड.अमोल भोकरे ,अँड सुनिल कपुर ,अँड .सुनिल शेळके मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान विधी व न्याय समितीचे दिलीप थोरात संदीप शेरमाळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे निखील तमनर हरीष पानसंबळ गणेश भिंगारदे कामगार तलाठी हडोळे मिलींद दुधाळ अरुण आमोलीक दादा कुताळ मोहसीन सय्यद नितीन नवले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा विष्णूपंत डावरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर अँड जिवन पांडे यांनी सूत्रसंचलन केले शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-बेलापूर येथील गुप्तधना मुळे जीव गमविणाऱ्या सुनील गायकवाड यांच्या गरीब कुटुंबांला मदत करण्याच्या उद्देशाने मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे आर पीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष संदीप मगर  यांच्या वतीने तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान घरपोहोच करण्यात आले. या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की बेलापूरातील सुनिल गायकवाड याच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यांना चार लहान लहान मुली आहेत कुटुंबाचा सुनिल एकमेव आधार होता त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे काही मंडळी आम्हाला बाहेरची म्हणतात पण त्यांच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली असुन त्या कुटुंबाला मदत करणे सोडाच मानसिक आधार देण्यासही कुणी पुढे आले नाही गाव पुढारी म्हणवणारेच त्या कुटुंबाला दोष देत आहेत तुम्हाला मदत करता येत नसेल तर करु नका तुमच्यातील माणूसकी संपली असली तरी आमच्यात अजुन जिवंत आहे  यात कुणाचा पोटशूळ उठण्याचे कारण नाही या मजुराच्या तोंडचा घास पळविणारेच साप साप म्हणून डांगोरा पिटत आहे असेही ते म्हणाले  त्याप्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नानासाहेब मांजरे मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे मनविसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे आदी उपस्थित होते,किराणा सामान देवुन या गरीब कुटुंबाला छोटासा आधार देण्याचा प्रयत्न मनसे, आर पी आय, भिम शक्ती, यांच्या वतीने करण्यात

आला, गायकवाड कुटुंब अतिशय गरीब व प्रामाणिक आहे  त्यांना छोटी छोटी मुले असल्याकारणाने सर्व दानशूरांनी व राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करावी असे अवाहनही  मनसे भिमशक्ती आरपीआय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- गुप्तधन खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड यांच्या आत्महत्या प्रकरणी खटोड बंधुंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे      येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने रवीवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना गळफास घेवुन आत्महत्या केली होती त्या नंतर मयताची पत्नी वंदना गायकवाड हीने पोलीसात तक्रार दाखल केली होती की खोदकाम करताना गुप्त धन सापडले होते त्या वेळी या गुप्त धनाचा बोभाटा न करण्यासाठी खटोड बंधुनी सुनिल यास अकरा लाख रुपये कबुल केले होते पैकी १ लाख २८ हजार रुपये दिले होते बाकीचे पैसै मागीतले असता शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने श्रीरामपुर शहर पोलीसाकडे दिलेल्या तक्रारीत केला होता  या बाबत राजेश खटोड व हनुमंत खटोड यांनी अटकपूर्व जामीन मिळावा या करीता न्यायालयात अर्ज दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधिश नांदगावकर यांनी खटोड बंधुचा तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे   या बाबत  मयत सुनिल गायकवाड यांने अँफिवड्यूट करुन दिले होते तसेच हयात असताना वेळोवेळी पैसे मागणी बाबत कुठलेही लेखी अथवा तोंडी पुरावे नाही. पैसे मागणी बाबत कुठलाही पुरावा  नाही सापडलेले गुप्तधन शासनाकडे जमा केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मयत सुनिल गायकवाड याने लेखी दिले होते त्या नंतर खटोड बंधु विरुध्द त्याने पोलीसाकडे तक्रार देखील दाखल केलेली नाही त्यामुळे मयताच्या पत्नीने केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हणणे अँड एन जी खंडागळे व अँड वैभव खंडागळे यांनी मांडले त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती नांदगावकर यांनी खटोड बंधुंना तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे खटोड हे राजकीय  सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्यामुळे तालुक्याचे लक्ष न्यायालयाकडे लागले होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर येथे नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नानासाहेब बच्छाव यांची भेट घेऊन त्यांच्या आगमनाचे स्वागत करून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री बरकत आली शेख यांच्यासमवेत पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार व तिरंगा न्यूज चैनल चे संपादक असलम बिनसाद आदींनी श्री नानासाहेब बच्छाव यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली असुन या प्रकरणाशी खटोड बंधुचा कुठलाही संबध नसुन त्यांचेवर दाखल झालेला खोटा मागे घेण्यात यावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली आहे.या बाबत बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मयत सुनिल गायकवाड याने काही महीन्यापूर्वी खटोड यांच्याकडे झाडे लावण्यासाठी खोदकाम करण्याचे काम घेतले होते त्या वेळी खोदकाम करताना काही प्रमाणात चांदीची नाणी सापडली होती ती रितसर काऱ्यवाही करुन तहसीलदार यांच्या ताब्यात देण्यात आली होती या बाबत विनाकारण वावड्या उठविण्यात आल्या होत्या मयत गायकवाड याने गळफास घेवुन आत्महत्या केली त्या वेळी घरी कुणीही नव्हते त्याचे पती पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे पत्नी माहेरी गेलेली होती घरी कुणीही नसताना त्याने कौटुंबिक वादातुन आत्महत्या केली असावी परंतु काही बाहेर गावच्या पुढाऱ्यांनी व पत्रकारांनी या प्रकरणास वेगळे वळण देवून खटोड बंधुवर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले ते गुप्तधन तहसीलदार यांच्या ताब्यात दिल्यानंतरही मयत गायकवाड याने प्रतिज्ञापत्र करुन दिले होते त्या नंतर मयत सुनिल गायकवाड व खटोड बंधुचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे संपर्क आलेला नाही गायकवाड याच्या आत्महत्येशी खटोड बंधु किंवा त्या गुप्तधनाचा कोणताही संबध नाही मयत सुनिल याने सुसाईड नोटही लिहलेली नाही त्यामुळे त्याच्या आत्महत्येशी खटोड बंधुंचा कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबध नाही मयत सुनिल गायकवाड याने या बाबत पोलीसांना कसलाही तक्रार अर्ज दिलेला नाही गावातील शांतता भंग व्हावी या करीता बाहेरील काही पुढाऱ्यांनी मयताच्या पत्नीला खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असुन या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्हाला सनदशिर मार्गाने आंदोलन करावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांना  निवेदन देताना सुनिल मुथा सुधीर नवले अँड शरद सोमाणी  भरत साळूंके अजय डाकले अशोक पवार जावेद शेख शेषराव पवार ज्ञानदेव वाबळे जाकीर शेख प्रकाश जाजू प्रसाद खरात प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण दत्ता कुऱ्हे उपस्थित होते.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-अमृतवाहिनी प्रवरा नदीस यंदाच्या पावसाळ्यात पहिलेच पाणी आले.  बेलापूरच्या गावकरी मंडळ व ग्रामस्थांनी प्रवरामाईचे जलपूजन करुन आपला आनंद व्यक्त केला.प्रवरा नदिच्या पाण्यावर बेलापूर पंचक्रोशीतील शेती व बाजारपेठ अवलंबून आहे.भंडारदरा व निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदिला पाणी येते.यंदा सप्टेंबर महिना सुरु होवूनही नदी वाहती न झाल्याने चिंतेचे वातावरण होते.माञ वरुणराजाच्या कृपेने धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस होवून धरणे भरली आणि प्रवरा नदिला यंदा पहिल्यांदाच पूर आला.                          प्रवरेला पाणी आल्याचे समजताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गावकरी मंडळ व  ग्रामस्थांनी प्रवरेला आलेल्या पाण्याचे पूजन केले.बेलापूरचे माजी उपसरपंच प्रकाश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड,पत्रकार देविदास देसाई अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कु-हे,तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे आदिंची भाषणे झाली.

याप्रसंगी शरद नवले,रणजित श्रीगोड,जालिंदर कु-हे,महेंद्र साळवी,अभिषेक खंडागळे, शरद देशपांडे, साहेबराव वाबळे,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,देविदास  देसाई,नवनाथ कुताळ,दिलीप दायमा,सुहास शेलार,किशोर कदम,पुरुषोत्तम भराटे,चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,शफिक बागवान,बाळासाहेब दाणी,शांतीलाल हिरण,भरतलाल सोमाणी,रावसाहेब अमोलिक, विशाल आंबेकर,महेश कु-हे,सचिन वाघ,राजेंद्र वारे,जमशेद पटेल, अन्वर सय्यद,सतिश व्यास,तस्वर बागवान,श्रीहरी बारहाते,संजय रासकर,अजीज शेख,बाळासाहेब शेलार,अल्ताफ शेख,शफीक आतार,रफिक शेख,रोहित शिंदे,युनूस आतार,मारुती गायकवाड,अन्सार पटेल,विनायक जगताप,मोकाशी दादा,अशोक शेलार,बाबा शेख,विजय हुडे,लहानू नागले,जिना शेख,दादासाहेब कुताळ, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण,जब्बार आतार,दिलीप अमोलिक, कुंदन कुताळ,सुरेश अमोलिक,सिकंदर पठाण,मोहन सोमाणी,सागर ढवळे,निसार बागवान,संजय गोरे,निसार नालबंद,मच्छिंद्र खोसे,सुभाष शेलार,प्रशांत मुंडलिक,मास्टर हुडे,सद्दाम आतार,साईनाथ शिरसाठ,गणेश बंगाळ, अकबर सय्यद, किरण गागरे,अकिल पटेल,सौरभ कापसे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील मूळ उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट  परिसरात राहणार्‍या अक्षय अनिल पावसे या 25 वर्षीय भावी डॉक्टरने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.काल सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अशोकनगर परिसरात एका एक्सपे्रस रेल्वे खाली तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. अक्षय तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता. हा तरुण मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अक्षयच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget